अलीकडे वेगळ्या धाटणीच्या भूमिकांमध्ये दिसणारा अभिनेता अर्जुन रामपाल आता लवकरच ‘लंडन फाइल्स’ या थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेल्या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. Voot Select वरील या आगामी वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.प्रदर्शित झाल्यावर लगेच या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. प्रेक्षकांना हा ट्रेलर आवडलाय. सचिन पाठक दिग्दर्शित आणि जार पिक्चर्स निर्मित, ‘लंडन फाइल्स’ या सहा भागांच्या सस्पेन्स थ्रिलर वेब सिरीजमध्ये अर्जुन रामपाल, पूरब कोहली, गोपाल दत्त आणि सपना पब्बी हे प्रमुख भूमिकेत आहेत. या वेब सिरीजचे चित्रीकरण युनायटेड किंगडममध्ये झाले आहे. लंडन फाइल्स 21 एप्रिल 2022 पासून Voot Select वर बघता येणार आहे.
Table of Contents
पूरब कोहली- अर्जुन रामपाल या दोघांची टक्कर
उत्तम ओरिजिनल सिरीजची घोडदौड यशस्वीपणे चालू ठेवत Voot सिलेक्टने आणखी एक चांगली सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस आणली आहे. ‘लंडन फाइल्स’ ही एक इन्व्हेस्टिगेटिव्ह थ्रिलर मालिका आहे जी लंडन शहरात घडते. या सिरीजमध्ये अर्जुन रामपाल ओम सिंग या गुप्तहेराची भूमिका साकारतो आहे. हा गुप्तहेराची खासियत म्हणजे तो खुनाच्या गुन्ह्यांचे तपास करण्यात तरबेज आहे. आता ओम सिंगकडे एका हरवलेल्या व्यक्तीची केस आली आहे. स्वतःच्या वैयक्तिक समस्यांशी लढा देत, ओमला मीडिया मोगल अमर रॉयच्या हरवलेल्या मुलीची केस स्वीकारण्यास भाग पाडले जाते. ओम सिंग या गुन्ह्याचा तपास कसा करतो हे बघणे मनोरंजक ठरेल. यामध्ये अमर रॉयची भूमिका पूरब कोहलीने केली आहे. अमर रॉय कठोर इमिग्रेशन विरोधी विधेयकाला समर्थन देतो त्यामुळे समाजाच्या काही घटकांसाठी तो एक फूट पाडणारा मनुष्य आहे . जसजसा ओम या प्रकरणाचा तपास सुरू करतो, तसतसे एक-एक भयानक रहस्य समोर येत जाते. तपासाच्या दरम्यान अनेक दडवून ठेवलेली रहस्ये आणि ओमचा भूतकाळ उघड होतो.
लंडन फाइल्स ही मालिका मी केलेल्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा वेगळी – अर्जुन रामपाल
खुर्चीत खिळवून ठेवणाऱ्या आणि सस्पेन्सने परिपूर्ण, लंडन फाइल्समध्ये गोपाल दत्त, सपना पब्बी, मेधा राणा, सागर आर्य आणि इवा जेन विलिस यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेबद्दल एका मुलाखतीत बोलताना अर्जुन रामपाल म्हणाला, “लंडन फाइल्स ही मालिका मी केलेल्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा वेगळी आहे. खरं तर मला असे वाटते की असा कोणताही प्रोजेक्ट मी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय दोन्ही प्लॅटफॉर्मवर आजतागायत पाहिला नाही. हा विषय पहिल्यांदाच हाताळला जातोय. “
“ओम एका हाय-प्रोफाइल प्रकरणाचा तपास करत असताना सर्वसामान्य व्यक्तीला रोज भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचा शोध घेतो. डिटेक्टिव्ह ओमचे पात्र हे अनप्रेडिक्टेबल, सदोष आणि गुंतागुंतीचे आहे. मी हे कबूल केलेच पाहिजे की या व्यक्तिरेखेचा माझ्यावरही वैयक्तिकरित्या थोडाफार प्रभाव पडला आहे. ही पटकथा, संपादन, छायाचित्रण, सर्वांचे परफॉर्मन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतील याची मला खात्री आहे. संपूर्ण टीमने या वेब सिरिजच्या माध्यमातून जे साध्य केले आहे त्याचा मला खूप अभिमान आहे. आता मी सर्वात महत्त्वाच्या भागाची, म्हणजेच प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहे.” तर पूरब कोहलीने शेअर केले की, “रॉक ऑननंतर अर्जुनसोबत पुन्हा काम करायला मिळणे हा माझ्यासाठी एक खूप छान अनुभव होता. या मालिकेत माझी भूमिका विशेष असली तरी ही वेगळी भूमिका साकारणे मनोरंजक होते. अमर रॉय या पात्राला भरपूर ग्रे शेड्स आहेत.”
एक आकर्षक कथा व प्रतिभावान कलाकार असलेली लंडन फाइल्स 21 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade