आरोग्य

अस्थमाची लक्षणे (दमा लक्षणे) जाणून घ्या (Asthma Symptoms In Marathi)

Dipali Naphade  |  Jun 15, 2021
Asthma Symptoms In Marathi

वाढते प्रदूषण, तणाव याचा केवळ वातावरणातच नाही तर माणसाच्या शरीरावरही अधिक परिणाम होत असतो. केवळ बाहेरूनच नाही तर आतूनही माणूस पोकळ होत जातो. प्रदूषित वातावरणाचा सर्वात वाईट परिणाम हा श्वसनतंत्र अर्थात श्वासावर होत असतो. त्यामुळेच श्वासाशी संबंधित अनेक आजार होत असतात. याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजेच अस्थमा अर्थात दमा. प्रदूषित वातावरणासह दमा होण्याची अनेक कारणे आहेत. या लेखातून सर्वात महत्त्वाचे म्हणजे दमा लक्षणे, दमा कारणे आणि उपचार (asthma treatment in marathi) याविषयी आपण माहिती घेणार आहोत. दम्याची अनेक लक्षणे (asthma symptoms in marathi) आहेत, पण त्याआधी दमा म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. अस्थमा हा आतड्यांशी आणि श्वासाशी संबंधित आजार आहे. श्वास घेण्यासाठी त्रास होणे हे याचे प्रमुख लक्षण आहे. यामध्ये वायुमार्ग संकुचित झाल्याने आतड्यांपर्यंत आणि हृदयापर्यंत श्वास आणि ऑक्सिजन व्यवस्थित पोहचू शकत नाही. त्यामुळे खोकला आणि छातीत त्रास होणे सुरू होते. कोणत्याही वयात हा आजार होऊ शकतो. सर्वात जास्त हा आजार लहान मुलांमध्ये दिसतो. याची लक्षणे नक्की कोणती आहेत ते जाणून घेऊया. 

दम्याची लक्षणे (Asthma Symptoms In Marathi)

Asthma Symptoms In Marathi

दम्याची लक्षणे अर्थात अस्थमाची अनेक लक्षणे आहेत. तसंच दमा लक्षणे असलेल्या व्यक्तींनी सध्याच्या कोविड काळात विशेष काळजी घ्यावी. आता या लक्षणापैकी नक्की कशाचा कसा परिणाम होतो ते आपण जाणून घेऊया.

कफ (Cough)

कफ हे दम्याचे पहिले लक्षण आहे. साधारणतः खोकला झाला की किमान एक आठवड्यात बरा होतो. पण जरा तुम्हाला अस्थमाचा त्रास असेल तर नुसता खोकलाच नाही तर कफही छातीमध्ये साचून राहतो. यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊन कफ निघण्यासही त्रास होतो. श्वास घेताना खूपच त्रास होतो आणि या दरम्यान त्वचादेखील वरखाली होऊ लागते. 

व्यायाम करताना श्वास घेण्यास त्रास होणे (Problem To Take A Deep Breath)

व्यायाम करताना स्टॅमिनाची अत्यंत गरज असते. पण व्यायाम करताना पहिल्या काही मिनिट्समध्ये जर दम लागालया लागला तर तुम्हाला अस्थमा असण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे असं नियमित होत असेल तर तुम्ही वेळीच अस्थमाचे परीक्षण करून घ्यावे. तसंच श्वास घेताना जर तुम्हाला अस्थमा असेल तर एक वेगळा आणि विशिष्ट आवाज येतो. झोपेतही तुमच्या आजूबाजूच्यांना तुमच्या आवाजातील ही घरघर जाणवते. 

ओठ आणि चेहरा निळा पडणे (Colour Change Of Lips)

सहसा आपल्या सर्वांचे ओठ हे नैसर्गिकरित्या गुलाबी रंगाचे असतात. पण तुमच्या चेहऱ्यात आणि ओठात निळेपणा येऊ लागला असेल तर तुम्हाला अस्थमाचा त्रास सुरू झाला असल्याचे हे लक्षण आहे. अस्थमामुळे श्वास घ्यायला त्रास तर होतोच पण याचा आपल्या त्वचेवरही तितकाच गंभीर परिणाम होतो. असे लक्षण दिसून आले तर त्वरीत तुम्ही डॉक्टरांना संपर्क साधावा. 

सतत चिंतीत राहणे (Pulse Problem)

सतत काहीतरी भीतीदायक आहे असं वाटत राहणे हेदेखील अस्थमाचे एक लक्षण आहे. दमा लक्षणे अनेक आहेत. पण हे लक्षण तुम्हाला पटकन जाणीव करून देऊ शकते. कारण अचानक प्रत्येक गोष्टीबाबत चिंता करणे आणि सतत आपल्या शरीराचे पल्स वाढले आहेत असं जाणवणे हेदेखील दम्याचे लक्षण आहे. 

सातत्याने घाम येणे (Sweating)

घाम सर्वांनाच येतो. पण सतत काहीही न करताही घाम येणे अथवा घामाचे अति प्रमाण असणे हेदेखील दम्याचे एक लक्षण आहे. घामाने सतत भिजायला होणे आणि त्यामुळे श्वास घ्यायलाही त्रास होणे हे दम्याचे लक्षण आहे. अस्थायी स्वरूपात श्वास घेण्यास त्रास होतो. 

छातीत सतत दुखणे (Chest Pain)

जर तुम्हाला सतत छातील दुखत असेल आणि छाती अधिक जड झाल्यासारखी वाटत असेल तर तुम्हाला नक्कीच अस्थमाचा त्रास आहे. छातीत सतत भीती वाटून आणि सतत पल्स वाढल्यामुळे दुखणे चालू राहते. त्यामुळे तुम्ही वेळीच डॉक्टरांकडून याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. 

श्वासाचा त्रास (Breathing Issue)

दम्याचा त्रास चालू झाला असेल तर तुम्ही कोणतेही काम केले तरी तुम्हाला पटकन थकायला होते आणि श्वास घ्यायला कधीही त्रास होतो. तुम्ही नेहमीप्रमाणे पटकन श्वास घेऊ शकत नाही. तसंच तुम्हाला कोणत्याही कामात धापा टाकायला झाल्यासारखे वाटते आणि सतत थकवा जाणवतो. 

दमा कारणे आणि उपचार (Causes And Treatment For Asthma)

दमा लक्षणे नक्की काय आहेत आपण जाणून घेतले. पण दमा नक्की का होतो याची कारणेही जाणून घ्यायला हवीत. तरच त्यावर नीट उपचार करता येतात.

दमा कारणे आणि उपचार

यावर उपचार करायचे झाले तर नक्की कोणते उपचार करू शकता ते जाणून घेऊया. अनेक घरगुती उपचारदेखील यासाठी करता येतात. पण त्याआधी नक्की कोणते उपचार आपण करू शकतो ते पाहूया. 

होमिओपॅथिक उपचार – अस्थमाच्या आजारावर अनेक प्रकारचे उपचार करता येतात. त्यापैकी एक म्हणजे होमिओपॅथिक औषधे. एनसीबीआयच्या शोधानुसार, अस्थमासाठी व्यक्तीच्या लक्षणाच्या अनुसार होमिओपथी अथवा आइसोपथी (अलर्जीमुळे दमा असल्यास) हा उत्तम उपाय आहे. यामुळे दमा अर्थात अस्थमा लवकर बरा होऊ शकतो. 

आयुर्वेदिक उपचार – आयुर्वेदामध्ये दमाच्या उपचारासाठी अनेक औषधे आहेत, ज्याच्या सेवनाचा सल्ला देण्यात येतो. यामध्ये मध, वासा, गाईचे तूप इत्यादी समाविष्ट आहे. हे सर्व श्वासासंबंधी आजारामध्ये अधिक चांगले ठरते. त्यामुळे तुम्ही दम्यासाठी याचा उपयोग करून घेऊ शकता. 

अॅलोपथिक उपचार – अलोपॅथिकमध्ये अस्थमा उपचार तीन स्टेप्समध्ये करण्यात येतो. ज्यामध्ये शॉर्ट टर्म मेडिसिन, कंट्रोल मेडिसिन आणि इमर्जन्सी केअरदेखील यामध्ये समाविष्ट आहे. 

दमासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Asthma In Marathi)

दमासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय करू शकता. त्यापैकी काही उपाय आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. तुम्हीही त्याचा नक्की उपयोग करून पाहा. 

मध आणि हळद (Honey And Turmeric)

साहित्य 

कसे वापरावे 

कसे ठरते फायदेशीर 

दमा साठी घरगुती उपायासाठी मधाचा उपयोग करून घेता येतो. श्वासासंबंधी उपायांसाठी मध हा सर्वात जुना आणि नैसर्गिक उपाय आहे. मधामध्ये असणारे अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटिबॅक्टेरियल गुण हे दम्यापासून सुटका करून देण्यास मदत करतात. तर हळदीमध्ये असणारे करक्युमिन तत्व दम्यापासून आराम देतात. वास्तविक करक्युमिनमध्ये अँटिइन्फ्लेमेटरी प्रभाव असतो. जो वायुमार्गाने सूज कमी करण्यास फायदेशीर ठरतो. याशिवाय हळदीमध्ये अँटिबॅक्टेरियल असल्याने दम्याच्या त्रासापासून सुटका मिळते. 

आले (Ginger)

साहित्य 

कसे वापरावे 

कसे ठरते फायदेशीर 

आल्यामध्येदेखील अँटिइन्फ्लेमेटरी गुण असतात. आल्याचे सेवन हे श्वसनप्रमाणी निरोगी ठेवण्यासाठी उत्तम ठरते. एनसीबीआयच्या एका शोधानुसार आल्याचा उपयोग हा वायुमार्गाने सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. ज्यामुळे अस्थमाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत मिळते. आल्याचा वापर तुम्ही नियमित केल्यास, तुम्हाला दम्याच्या त्रासापासून सुटका मिळू शकते.

लसूण (Garlic)

साहित्य 

कसे वापरावे 

कसे ठरते फायदेशीर 

अस्थमा असल्यास, लसणाचा उपयोगही तुम्ही घरगुती उपायांमध्ये करू शकता. वास्तविक यामध्येही अँटिइन्फ्लेमेटरी गुण आढळतात. यामध्ये असणाऱ्या या गुणांमुळे अस्थमापासून आराम मिळतो. रोज सकाळी लसूण आणि मध खाल्ल्यानेही फायदे होतात. 

कॉफी (Coffee)

साहित्य

एक कप गरम कॉफी 

कसे वापरावे 

कसे ठरते फायदेशीर 

कॉफी पिणे हादेखील अस्थमावरील एक घरगुती उपाय असू शकतो. कॉफीमधील कॅफीन हे संकुचित वायुमार्ग उघडण्याचे काम करते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुम्ही कॉफीचा आधार घ्या. 

इसेन्शियल ऑईल (Essential Oil)

साहित्य 

कसे वापरावे 

कसे ठरते फायदेशीर 

श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुम्ही याचा वापर करावा. हा बंद नाक उघडण्यासाठी उत्तम घरगुती उपाय आहे. युकेलिप्टस तेलामध्ये एउकल्यप्टॉल नावेचे महत्त्वपूर्ण तत्व असते. जे नाकातील बलगम काढून टाकण्यास मदत करते. तर लव्हेंडर ऑईलमध्ये बलगम नियंत्रित करण्याची ताकद आहे. हे सुगंधित तेल आरामदायी असून तुम्हाला झोप देण्यास मदत करतात. लव्हेंडर तेलामुळे उत्तम इलाज होतो. 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. दम्याचे प्रकार नक्की कोणकोणते आहेत?

अलर्जिक अस्थमा अर्थात दमा – जेव्हा प्रदूषित वातावरणामुळे अलर्जी आणणारा एलरजेन नावाचे तत्व शरीरात जाते तेव्हा अलर्जिक अस्थमाला सुरूवात होते. एक्सरसाईज इंड्युस अस्थमा – जेव्हा कोणताही व्यायामाच्या प्रकारामुळे अस्थमा होतो त्याला एक्सरसाईज इंड्युस अस्थमा असे म्हटले जाते कफ वेरिएंट अस्थमा – या प्रकारच्या अस्थमामध्ये साधारणतः श्वासन संक्रमणामुळे त्रास सहन करावा लागतो असे दिसून आले आहे ऑक्युपेशनल अस्थमा वा दमा – जेव्हा अवस्था कोणत्याही विशेष काम केल्याने होतो तेव्हा त्याला ऑक्युपेशनल अस्थमा म्हटले जाते. पशुपालक, शेतकीर, न्हावी अथवा लाकडाचे काम करणाऱ्यांना शक्यतो हा अस्थमा दिसून येतो.

2. अस्थमा अथवा दमा बरा होतो का?

अस्थमा हा आजार एकदा तुम्हाला झाला की, तो पूर्णतः काढून टाकता येत नाही. मात्र त्यावर उपचार करून नियंत्रण नक्की मिळवता येते.

3. अस्थमाचे काही साईड इफेक्ट्स आहेत का?

तुम्ही जर अलॉपॅथिक औषधांचे सेवन करत असाल तर तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. यामध्ये हृद्याचे ठोके वाढून तुम्हाला हृदयाचा झटका येणे हा धोकाही उद्भवतो.

तुम्हालाही जर यापैकी काही लक्षणे जाणवत असतील तर वेळीच तुम्ही डॉक्टरांना संपर्क साधा. तसंच तुम्हाला दम्याचा त्रास होत असेल तर आम्ही दिलेले घरगुती उपाय नक्की वापरून पाहा. लेख आवडल्यास, शेअर करा. 

Read More From आरोग्य