मनोरंजन

के एल राहुलसोबत अथिया शेट्टी लवकरच करतेय लग्न

Leenal Gawade  |  May 4, 2022
के एल राहुलसोबत अथिया शेट्टी लवकरच करतेय लग्न

 लग्नाचा सीझन जसा सुरु झाला आहे तसे सेलिब्रिटींच्या लग्नाच्या बातम्या कानी येऊ लागल्या आहेत. नुकतेच मराठी इंडस्ट्रीमधील राणा दा  म्हणजे हार्दिक जोशी आणि पाठक बाई म्हणजेच अक्षया देवधर यांचा साखरपुडा पार पडला. तर दुसरीकडे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हिचा मुलगा विराजस आणि शिवानी रांगोळे यांचा विवाह पार पडला. बॉलिवूडमध्येही लग्नाचा मौसम सुरु झाला आहे. सध्या अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के एल राहुल यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे असे सूत्रांकडून कळत आहे. अथियाचे वडील अभिनेता सुनील शेट्टी याने लग्नाच्या तयारीला हिरवा कंदील दिल्याचे देखील सांगितले जात आहे. चला जाणून घेऊया हे लग्न होणार तरी कधी?

या महिन्यात उडणार लग्नाचा बार

अथिया शेट्टी आणि के एल राहुल लग्न कधी करतील असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. त्यांच्या लग्नाबद्दल अनेक चर्चा होत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अथियाचे वडील अभिनेता सुनील शेट्टी याने लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे. लग्नासाठी केटरर्स, डेकोरेशन या सगळ्यासाठी के एल राहुल खूपच जास्त उत्सुक आहे. आता राहिला विषय हे लग्न कधी होणार आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार येत्या डिसेंबर महिन्यात अथिया लग्न करणार असल्याचे समजत आहे. या लग्नाला अजून बराच वेळ असला तरी देखील या तयारीला सुरुवात झाल्याचे देखील सांगितले जात आहे. 

असणार हे लग्न एकदम ग्रँड

अथियाच्या लग्नाची तयारी पाहता हे लग्न एकदम ग्रंँड लग्न असणार आहे असा अंदाज आहे. अजून हे लग्न कुठे, कसे आणि ती काय घालणार आहे याचा कोणताही खुलासा झालेला नाही. इतकेच नाही तर या लग्नासाठी ती कोणत्या डिझायनरला निवडणार हे देखील अद्याप माहीत झालेले नाही. पण हे लग्न ग्रँड असणार आहे यात काहीही शंका नाही.

असा झाला नात्याचा खुलासा

क्रिकेटरसोबत एखाद्या अभिनेत्रीचे रिलेशनशीप असणे आता काही नवे राहिलेले आहे. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटरशी लग्न केलेले आहे. के एल राहुल सोबतच्या अथियाच्या नात्याचा खुलासा हा तिच्या सोशल मीडियावरील फोटोवरुन झाला होता. अनेकदा एकमेकांसोबत फिरताना हे दोघे कॅप्चर झाले होते. इतकेच नाही तर त्यांचे अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले होते. अथियाच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या फोटोवर आय लव्ह यु ही कमेंट करुन सगळ्यांना थक्क केले होते. अशाप्रकारे त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाले होेते. 

आता या दोघांच्या लग्नाचा बार कधी उडेल अशी सगळ्यांना प्रतिक्षा आहे. 

Read More From मनोरंजन