Festival

गुढीपाडवा 2021 : अंगणी उभारा गुढी.. वर्षभर रहा सुखी

Aaditi Datar  |  Apr 5, 2021
गुढीपाडवा 2021 : अंगणी उभारा गुढी.. वर्षभर रहा सुखी

चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या सणाचं महत्त्व महाराष्ट्रात फार आहे. याच दिवसात सुरू होतं ते नऊ दिवसांचं चैत्र नवरात्राचं पर्व. जर तुमची इच्छा असेल की, येणाऱ्या नवीन वर्षात तुम्हाला कोणत्याही संकटांचा सामना करावा लागू नये. तर नववर्षाच्या पहिल्या दिवशी काय करावं हे अवश्य जाणून घ्या.

चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या पहिल्या तिथीला सूर्योदयासोबत प्रारंभ होतं ते नववर्ष आणि चैत्रातलं नवरात्र. गुढीपाडव्याच्या दिवशी परंपरेनुसार,आपल्या घरासमोर किंवा घराच्या छतावर गुढी उभारली जाते. लाकडाची काठी, चांदी किंवा पितळीचा तांब्या, साखरेची माळ, रेशमी वस्त्राचा वापर करून गुढी उभारली जाते. या गुढीला कडुनिंबाची पानं, आंब्याचं डहाळ आणि फुलांनी सजवलं जातं. त्याची पूजा करून गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. गुढी उभारण्यामागे नेमका विचार कोणता?  तर असं म्हणतात की, नववर्षाच्या पहिल्या दिवशी गुढी उभारल्याने तुमच्या कुटुंबात वर्षभर सुख-समृद्धी कायम राहते. 

गुढीपाडव्यासाठी खास मंत्र

गुढीपाडव्याला पूजा करताना खालील मंत्राचं उच्चारण करावे. ओम ब्रम्हध्वजाय नम: असा मंत्र म्हणावा आणि पूजा करावी. गुढीला नमस्कार करावा. 

या मंत्रामागील धारणा अशी आहे की, ज्या दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टीची निर्मिती केली. त्या चैत्रातल्या दिवसाला नववर्ष मानले जाते. असंही म्हणतात की, चैत्र प्रतिपदेच्या दिवशी दुर्गा देवी प्रकट झाली आणि देवीच्या सूचनेवरून ज्या दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टीची निर्मिती केली तो दिवस हाच. म्हणून महाराष्ट्रात आणि हिंदू धर्मात गुढीपाडव्याच महत्त्व अधिक आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी करा हे उपाय वर्षभर राहील समृद्धी

Read More From Festival