बॉलीवूड

अनेक या चित्रपटात आयुषमान खुराना दिसणार अंडरकव्हर कॉपच्या भूमिकेत

Vaidehi Raje  |  Apr 21, 2022
ayushmann khurrana in anek

आयुषमान खुराना हा असा एक अभिनेता आहे जो आपल्या चित्रपटांद्वारे सामाजिक समस्या मांडण्यासाठी आणि रूढीवादी कल्पना तोडण्यासाठी ओळखला जातो. आता तो त्याच्या आगामी चित्रपटात एका गुप्त पोलिसाच्या अवतारात दिसणार आहे. हा चित्रपट एक राजकीय ऍक्शन थ्रिलर आहे. आयुषमानने नेहमीच त्याच्या विनोदी कौशल्याने, जबरदस्त अभिनयाने आणि देसी बोलीच्या उत्तम जाणिवेने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. आता  तो आता अंडरकव्हर कॉपच्या अवतारात सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

आयुषमानने सांगितले त्याच्या भूमिकेविषयी 

आगामी ‘अनेक’ या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना आयुष्मान खुराना म्हणाला, “प्रेक्षक मला या अवतारात पहिल्यांदाच पाहणार आहेत. मी याआधी देखील पोलिसाची भूमिका केली आहे पण अंडरकव्हर पोलिसाची भूमिका करण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. जोशुआ हा स्मार्ट आणि हुशार आहे. त्याला परिस्थितीतून आपला मार्ग कसा शोधायचा हे माहित आहे आणि केवळ शारीरिक क्षमतेनेच नाही तर त्याच्या तीक्ष्ण बुद्धीची मदत घेऊन तो वाईट लोकांशी लढू देखील शकतो. जोशुआचे पात्र रंगविण्यास मी खूप उत्साहित होतो कारण मला असे काहीतरी करण्याची संधी मिळाली जी मी यापूर्वी कधीही केले नव्हते. प्रत्येक चित्रपटात नवीन अनुभव दिल्याबद्दल मी माझ्या प्रेक्षकांचा ऋणी आहे.” 

तो पुढे म्हणाला, “एक अंडरकव्हर पोलिस म्हणून, जोशुआमध्ये गुप्तहेराचे आदर्श गुण आहेत आणि ते पात्र रंगवण्यासाठी मला  माझी शारीरिक आणि मानसिक कौशल्ये विकसित करण्याची गरज आहे. त्याच्या निरीक्षण कौशल्यापासून ते शत्रूशी लढण्याच्या क्षमतेपर्यंत, जोशुआ या पात्राचा प्रवास प्रत्येकाला खिळवून ठेवतो.अनेक या चित्रपटाच्या दुनियेत फिट बसण्यासाठी त्यातील ऍक्शन सीन्स रॉ आणि खरे दिसणे आवश्यक होते. आणि अनुभवने ज्या प्रकारच्या दृश्यांची कल्पना केली होती, ते करून दाखवण्यासाठी मला योग्य प्रमाणात मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळाले.”

अनेकच्या रिलीजसाठी प्रचंड उत्सुक – अनुभव सिन्हा 

अनेक या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक अनुभव सिन्हा म्हणाले की, “अनेकच्या रिलीजसाठी मी खूप उत्सुक आहे कारण या चित्रपटात प्रेक्षकांना खूप काही बघायला मिळणार आहे. आयुषमानने त्याचा संपूर्ण जीव ओतून जोशुआ हे पात्र रंगवले आहे. ही भूमिका त्याच्यापेक्षा चांगली इतर कोणीच करू शकले नसते. तो केवळ एक उत्तम अभिनेताच नाही तर या चित्रपटात अंडरकव्हर पोलिस म्हणून हे सगळे थरारक ऍक्शन सीन्स करताना तो खरोखरच निर्भय होता. हे सगळे सीन्स त्याने अगदी उत्कृष्टरित्या पार पाडले. “

‘अनेक’ हा एक राजकीय अ‍ॅक्शन थ्रिलर आहे. या चित्रपटात आपल्याला सर्व विविधतांमधून बाहेर येऊन एक भारतीय म्हणून एकत्र येण्यासाठी खरोखर काय आवश्यक आहे यावर प्रश्न उपस्थित केला आहे. आणि एक माणूस संपूर्ण राष्ट्राला एकत्र आणण्याच्या मोहिमेवर असताना काय काय करतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आयुषमान खुरानाच्या ‘अनेक’ चित्रपटाचे  बरेचसे शूटिंग ईशान्य भारतात केले गेले आहे.  भूषण कुमार यांच्या T-Series आणि अनुभव सिन्हा यांच्या बनारस मीडियावर्क्सद्वारे निर्मित हा चित्रपट 27 मे 2022 रोजी प्रदर्शित होत आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड