DIY लाईफ हॅक्स

लहान बाळ खात नाहीत? हे पदार्थ नक्की करा ट्राय

Leenal Gawade  |  May 2, 2022
लहान बाळांना खाऊ घालण्याच्या आयडियाज

 लहान बाळांना जेवू घालणे हे जगातील सगळ्यात कठीण असे काम असे प्रत्येक नवीन झालेल्या आईला वाटते. कारण लहान बाळांना काय खायला आवडते हे कधीच कळत नाही. कधी त्यांना गोड आवडते कधी तिखट. अशावेळी पालकांची चांगली त्रेधातिरपीट उडते. बाळांना पौष्टिकही खाऊ घालायचे आणि त्यांच्या आवडीचेही. असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर लहान मुलांना खाऊ घालता येतील असे काही पदार्थ आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. जे मुलांना नक्कीच आवडती आणि त्यांना पोषणही मिळेल. चला करुया सुरुवात 

मालपुआ

मालपुआ

बाळांना गोड खायला नक्कीच आवडते. अशावेळी गोड मालपुआ हा एक उत्तम असा पर्याय आहे. गोड मालपुआ बनवणे देखील तितकेच सोपे असते. गव्हाचे बॅटर बनवून त्यात गुळ घालून त्यांना धिरड्याप्रमाणे ते काढायचे असतात. याची चव अधिक वाढवण्यासाठी तुम्ही हा तूपामध्ये करा. तुमच्या लहानग्याला नक्कीच त्याची चव आवडेल. एखाद्यावेळी गोड खाण्याचा काही हट्ट असेल  किंवा सहजज नाश्त्याला म्हणून तुम्हाला हे द्यायला हरकत नाही. 

चिकन सूप किंवा फ्राय

ज्यांच्या घरी चिकन चालते अशा मुलांना चिकनची सवय अगदी लहानपणापासून लावणे चांगले. चिकन किंवा मटण यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. मुलांना याचे सूप किंवा चिकन अगदी थोड्याशा चटपटीत मसाल्यात फ्राय करुन देता आले तरी देखील अधिक चांगले.  त्यामुळे तुम्ही मुलांना जेवणात चिकन फ्राय किंवा सूप द्या. हे देताना तुम्ही त्यांना किती जेवण वाढताय याचे देखील भान ठेवा. बाळ खातयं म्हणून त्याला उगाचच जास्त जेवण वाढून त्याचा कोठा वाढवू नका. 

मऊभात खिचडी

आता तुम्हाला वाटेल मुलं मऊ भात खायलाच नको म्हणतात. अशावेळी मऊभात खिचडी कशाला? तुम्हाला मुलांना खिचडीच करुन द्यायची आहे. पण लहान मुलांसाठी आपण ती बनवताना थोडी बेताने म्हणजे पुचट बनवतो. पण असे करुन नका. थोडीशी चटपटीत अशी बनवली की ती मुलांना खायला आवडते. लहान मुलांसाठी आपण जी खिचडी करतो. त्याचा रंग हलकासा पिवळा असतो. पण मुलांना थोडी दालखिचडी सारखी मऊ खिचडी करुन द्या ते नक्कीच फस्त करतील.

उकडलेली अंडी

मासांहार चालत असलेल्यांना अंड हा देखील एक उत्तम पर्याय आहे. आम्लेट किंवा उकडलेले अंडे असे तुम्ही जरी मुलांना दिले तरी देखील ते आवडीने खातात. उकडलेली अंडी भात किंवा चपातीसोबत दिले तरी देखील मुलांना नक्कीच आवडू शकते. त्यामुळे तुम्ही एकदा तरी मुलांना उकडलेली अंडी खायला द्या. 

आता मुलांना काहीतरी वेगळे द्यायचे असेल तर तुम्ही खात असलेलेच पण थोडे फिके असे पदार्थ त्यांना द्या. त्यामुळे त्यांना जेवण जेवण्याची सवयही पटकन लागून जाते. 

Read More From DIY लाईफ हॅक्स