आरोग्य

फळांचे ज्यूस पिताय, सावधान! आरोग्यास हानिकारक

Leenal Gawade  |  Mar 20, 2022
फळांचे रस आरो्ग्यास हानिकारक तर नाही का

 फळ खायला आवडत नाहीत अशांना सगळ्या गोष्टी ज्यूस स्वरुपात पिणे खूपच जास्त आवडते. फळांचे रस आहारात समाविष्ट करणे काहीही वाईट नाही. फळांचे रस पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण वातावरणानुसार त्याचा शरीरावर परिणाम होत असतो. शिवाय तुम्ही कोणत्या वेळी त्याचे सेवन करता हे देखील जाणून घेणे तितकेचे गरजेचे असते. काही जणं केवळ चांगला आहार म्हणून त्याचा आहारात समावेश करतात. पण असे करु नका. कारण सगळेच रस तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचे नसतात. काहींचा त्रास तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतो. जाणून घेऊया ज्युस पिण्याचे काही असेही तोटे जे आरोग्यास ठरु शकतात त्रासदायक  

कोणत्या फळांचा रस करताय?

फळांचा रस

तुम्ही कोणत्या फळांचा रस तुमच्यासाठी करताय? तो पिताना त्यातील घटक तुम्हाला माहीत हवे. उदा. मोसंबी, लिंबू, अननस,कलिगंड, चिकू, सफरचंद, केळी अशा फळांचे रस केले जातात. या प्रत्येक फळामध्ये चांगले आणि वाईट घटक असतात. काही फळांचे रस हे नुसते एका फळांचे नसते. कधी कधी रस जास्त जाड करण्यासाठी त्यामध्ये इतर काही फळांचादेखील समावेश केला जातो. अशावेळी तुम्ही फळांचा कोणता रस पिताय? त्यामध्ये असलेल्या काही फळांनी ॲसिडीटी होण्याची शक्यता असते. विशेषत: लिंबू वर्गातील फळांमुळे ॲसिडीटी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुम्ही कोणत्या फळांचा रस पिताय ते देखील जाणून घ्या. 

फळांच्या रसासाठी वापरला जाणारा मिक्सर

फळांचा ज्युस घरी करुन पित असाल तर ठिक आहे. पण जर तुम्ही फळांचा रस बाहेरुन आणून पिताय तर तुम्ही तो रस पिताना मिक्सर स्वच्छ आहे की नाही ते तपासा. फळांचा रस हा जरी पाणी किंवा दूध वापरुन जरी बनवला जात असला तरी देखील त्याच्या मिक्सरला घाण लागलेली असते. फळांचा अर्क मिक्सरला चिकटून राहिला की मात्र ते कुजून जातात. ते तसेच जर वापरले तर ते रस खराबच होतात. त्यामुळे तुम्हीही घरी रस करत असाल किंवा बाहेरुन विकत घेत असाल तर तुमचे मिक्सरचे भांडे तपासा 

कोणत्या वेळी पिताय रस? 

फळ खाण्याची एक वेळ असते. अगदी त्याचप्रमाणे रस पिण्याची देखील एक वेळ आहे. तुम्ही कोणत्याही वेळी रस पिऊन चालत नाही. सकाळी उठल्यानंतर तुम्ही नाश्ता केला असेल त्यानंतर साधारण तासाभरानंतर तुम्ही रस पिऊ शकता ते अगदी चार पर्यंत तुम्हाला रस प्यायला काहीही हरकत नाही. त्यानंतर तुम्ही शक्यतो रस पिऊ नका. कारण त्यामुळे तुम्हाला जिरण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही रस पिताना वेळेचा विचार करा. 

रसाचे प्रमाण किती असावे?

तुम्ही पित असलेला फळांचा रस आरोग्यासाठी नक्कीच चांगला आहे. पण तो किती प्यायला हवा त्याचे देखील प्रमाण असायला हवे. दिवसातून एखादा ग्लास रस हा पुरेसा होतो. रसाचे अति सेवन हे देखील शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. त्यामुळे तुम्ही रस हा प्रमाणात घ्या. एखादा ग्लास रस हा तुमच्यासाठी आणि शरीरासाठी पुरेसा आहे. त्यामुळे त्याचे प्रमाण योग्य असू द्या. 

आता फळांचे रस पिताना तुम्ही सावध राहा आणि या काही गोष्टींचा विचार देखील नक्की करा.

Read More From आरोग्य