आरोग्य

 का करायला हवे मरिच्यासन, जाणून घ्या फायदे

Leenal Gawade  |  May 2, 2022
marichyasana_fb

योगासनांमध्ये अनेक योगांचा समावेश होतो. आरोग्यासाठी अनेक अंगाने फायदेशीर असलेली अशी आसनं करायला खूप जणांना आवडते. काही आसनं ही सोपी असतात. तर काही आसनं ही कठीण. पण योगामध्ये कठीण असे काही नाही. नियमित सरावाने तुम्हाला नक्कीच काही आसनं करता येतात.  असेच कठीण पण खूपच फायद्याचे आसन म्हणजे मरिच्यासन. या आसनाची माहिती सगळ्यांना असेलच असे सांगता येणार नाही. पण आसनांमध्ये अत्यंत महत्वाचे असे हे आसन आहे. आरोग्याला याचे अनेक फायदे मिळतात.योगावरील पुस्तके देखील आहेत ती तुम्हाला अधिक माहिती देऊ शकतात.
हल्लीची आपली लाईफस्टाईल पाहता अनेकांचे काम हे बसून असते. यामुळे खूप जणांना कंबरेचे त्रास जाणवतात. अकाली वृद्धत्व आल्याप्रमाणे अनेक तरुणांच्या पाठीत दुखणे, कंबर दुखणे असे त्रास वाढू लागले आहेत. पाठीचे दुखणे, कंबर दुखी अशा सगळ्या त्रासांपासून तुम्हाला सुटका मिळवून देण्यासाठी उत्तम असे आसन म्हणजे मरिच्यासन. हे आसन नेमके कसे करायचे ते आपण जाणून घेऊया.

असे करा मरिच्यासन

Marichyasana

पाठीच्या दुखण्यापासून तुम्हाला सुटका हवी असेल तर तुम्ही मरिच्यासन नियमित करायला हवे. 

मरिच्यासन कसे करावे ते आता आपण जाणून घेऊया 

  1. योगा मॅटवर पाय पसरुन बसावे. मान आणि पाठ सरळ असू द्या. 
  2. दोन्ही हात मांडीच्या बाजूला ठेवा. 
  3. उजवा पाय दुमडून तो जांघेपर्यंत ओढून घ्या. असे करताना त्याच्यामध्ये अंतर असायला हवे. 
  4. आता उजवा हात दुमडेल्या हाताच्या पुढून मागच्या दिशेला नेत डाव्या हाताने तो हात पकडायचा आहे. 
  5. आता एक मोठा श्वास घेऊन तुम्हाला वाकायचे आहे. गुडघ्यावर हनुवटी ठेवून पाच सेकंद ठेवायचे आहे. त्यानंतर परत वर उठायचे आहे. श्वास आत घेत सोडत हे करायचे आहे. 
  6. ही कृती दुसऱ्या पायाने देखील करायची आहे. 

Read More From आरोग्य