उन्हाळा सुरु झाला की, अगदी नाक्या नाक्यावर आपल्याला ताडी आणि नीराचे स्टॉल दिसू लागतात. खूप जणांना ताडी किंवा नीरा म्हटली, ती दारूच आहे असे वाटते. पण असे मुळीच नाही बरं का! ताडी आणि नीरा पिण्याची योग्य वेळ असते. त्यावेळी ती प्यायली तर त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात. तुम्हालाही कधीतरी नीरा किंवा ताडी चाखून बघायची इच्छा झाली असेल तर तुम्हाला त्याविषयीची सर्वकाही माहिती असायला हवी. चला जाणून घेऊया ही नीरा किंवा ताडी कशापासून बनवते. त्याचे फायदे आणि ते पिण्याची योग्य वेळ
ताडी किंवा नीरा कशापासून बनते?
ताडी /नीरा ही नारळाच्या झाडांच्या फुलांपासून बनवली जाते. या शिवाय खजुराच्या झाडाच्या फुलांपासून ही बनवली जाते. याची चव गोड असते. शिवाय यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण सगळ्यात जास्त असते. खूप जण आरोग्याला चांगली म्हणून ताडी /नीरा यांचे सेवन करतात.उन्हाळ्यात सगळीकडे ही उपलब्ध असते. तुमची तहान भागवण्यापासून तुम्हाला उत्तम आरोग्य देण्यापर्यंत ताडी /नीरा ही चांगली असते. याचे सेवन अगदी कोणीही करु शकते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कोणीही याचे सेवन केले तरी देखील चालू शकते. पण ताडी /नीरा पिण्याची एक विशिष्ट वेळ आहे ते तुम्ही जाणून घ्यायला हवी.
ताडी वेळेवर पिणे गरजेचे
ताडी /नीरा ही योग्य वेळी पिणे गरजेचे असते. सकाळी ताजी ताजी आलेली ताडी /नीरा प्याल तर तुम्हाला त्याचे फायदे मिळतात. त्याची चव गोड लागते. पण जशी उन्ह चढू लागता. तसे त्याचे रुपांतर हे एखाद्या दारुच्या चवीमध्ये होते. यामध्ये अल्कोहलचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ही चढते. ज्यांना मद्य प्राशनाची अजिबात सवय नसते. त्यांना ही सहन देखील होत नाही. जर तुम्हाला ताडी प्यायची असेल तर ती तुम्ही सकाळीच प्यायला हवी. तरच ती तुम्हाला लाभदायक ठरु शकते.
ताडी /नीरा पिण्याचे फायदे
अनेक जण या दिवसात अगदी आवर्जून याचे सेवन करायला सांगतात. कारण त्याचे फायदेच असे आहेत.
- मधुमेहींसाठी ताडी /नीरा उत्तम आहे. कारण त्यांच्या शरीरातील साखर संतुलित करण्याचे काम ती करते. ताडी /नीरा खूप गोड असते. पण त्या साखरेचा विपरित परिणाम मधुमेह असणाऱ्यांच्या शरीरावर होत नाही.
- ज्यांची शरीर प्रवृत्ती अगदीच कृश आहे. अशांसाठीही ताडी /नीरा उत्तम आहे. कारण यामध्ये असलेली साखर वजन वाढवण्यास मदत करते. ज्यांना वजन वाढवण्यासाठी गरज आहे. अशांना याचे सेवन करावे. फायदा होईल
- ज्यांना रक्ताची कमतरता आहे. अशांनी तर अगदी आवर्जून ताडी /नीरा प्यायला हवी. कारण त्याच्या सेवनामुळे रक्त वाढण्यास मदत मिळते.
- ज्यांना पोटाचे विकार आहेत. बद्धकोष्ठतेने जे हैराण असतील त्यांच्यासाठी ही फारच फायदेशीर आहे. कारण त्यामुळे तो त्रास कमी होतो.
- कावीळ झाल्यानंतरही अनेकदा नीरा पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे ताकद मिळण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
आता तुम्हाला कुठे स्टॉल दिसले तर तुम्ही नक्की ताडी किंवा नीरा यांचे सेवन करा.