आरोग्य

अनेक आजारांवर फायद्याचा आहे कावा (Kahwah Tea) असा बनवा घरी

Leenal GawadeLeenal Gawade  |  Aug 7, 2022
कावा चहा

 चहा तर आपण रोजच पितो.. हल्ली तर चांगल्या आरोग्यासाठी अनेक जण ग्रीन टी, ब्लॅक कॉफी असेही पितात. पण आज आम्ही ज्याची माहिती तुम्हाला देणार आहोत जो चहाचा एक प्रकार आहे. पण तो काही नव्याने शोधलेला नाही तर हा प्रकार काश्मिरी लोकांच्या आहाराचा भाग आहे. कडाक्याच्या थंडीत प्यायला जाणारा काव्हा, कावा याबद्दल आम्ही बोलत आहोत. मसालायुक्त असा चहा हा आरोग्यासाठी फारच फायद्याचा आहे असे सांगितले जाते. हाही एक डिटॉक्स (Detox Tea) करणारा चहा असून त्याच्या रोजच्या सेवनाने तुमच्या मसाला चाय सेवनाची सवय कमी होऊ शकते. इतकेच नाही तर या निरोगी सवयीमुळे तुमचे वजनही नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. पण काव्हा चहा म्हणजे नेमके काय? आणि त्याचे फायदे कोणते याविषयी जाणून घेऊया अधिक माहिती

कावा चहा

काव्हा टी

कावा चहाचा इतिहास जाणून घेताना एक गोष्ट लक्षात येते की, भारतातील काश्मिर, अफगाणिस्तान, इराण आणि मध्य आशियाच्या काही भागात अशा पद्धतीचा चहा हा प्यायला जातो. कावा या शब्दाचा अपभ्रंभ कावा, काव्हा, क्वावहा असा वेगवगेगळा केला जातो. दुसऱ्या शतकाता या असा चहाचा उल्लेख आठळतो. याचे मूळ कोणते याबाबतील फारशी स्पष्टता नसली तरी देखील अनेक जण याला काश्मिरच मूळ आहे असे मानतात. कारण कावा या शब्दाचा अर्थ कश्मिरमध्ये गोड चहा होतो.  सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी गरम मसाल्याचे उत्पादन घेतले जाते अशा ठिकाणी कावा चहा बनवला जातो. कावा चहामध्ये प्रामुख्याने दालचिनी,वेलची आणि केशर याचा समावेश केला जातो. त्यामुळेच हा चहा खूपच हेल्दी आणि फ्लेवरफुल लागतो. या चहाची चव ही फारशी रोजच्या चहासारखी नसली तरी देखील पोटाच्या आरोग्यासाठी हा चहा फारच लाभदायक असा आहे. 

कावा चहा पिण्याचे फायदे आणि तोटे

प्रत्येक गोष्टीचे काही ना काही फायदे तोटे असतात. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा विचार करणे जास्त गरजचेचे असते.चला जाणून घेऊया कावा चहाचे फायदे आणि तोटे 

  1. पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी कावा चहा हा खूपच फायद्याचा आहे. तुम्हाला पोटाचे काही वकार असतील तर तुम्ही कावा चहा प्यायला हाव .
  2. फॅच बर्न करण्यासाठी देखील हा कावा चहा हा फायद्याचा आहे. ज्यांना वजन कमी करायचे आहे अशांनी तर कावा चहा अगदी रोज हमखास प्यायला हवा. 
  3. कावा चहामध्ये विटामिन B असते. ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासही मदत मिळते. त्यामुळे हा चहा आजारांना दूर ठेवण्यास मदत करतो. 
  4. जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर अशावेळी कावा चहा प्यावा. त्यामुळे सर्दी बरी होण्यास मदत मिळते. 
  5. कावा चहा प्यायल्यामुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत मिळते. मरगळ जाऊन हा चहा तरतरीत ठेवतो. त्यामुळे याचे सेवन चांगले असते. 

कावा चहा बनवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी पाणी उकळून त्यामध्ये केशराच्या काड्या, वेलची, दालचिनी घालून चांगली उकळून घ्यावी. चहा गाळून तो गरम गरम सर्व्ह करा. 

पण हा चहा कितीही चांगला असला तरी देखील त्याचे जास्त सेवन केल्यामुळे अतिरिक्त प्रमाणात मसाला हा शरीरात जाऊ शकतो. जो उष्णता वाढवतो. त्यामुळे तुम्ही त्याचे सेवन बेताने करायला हवे. 

Read More From आरोग्य