आरोग्य

अत्यंत गुणकारी आहे मदारचे झाड, पानांचे आहेत औषधीय फायदे

Dipali Naphade  |  Oct 14, 2020
अत्यंत गुणकारी आहे मदारचे झाड, पानांचे आहेत औषधीय फायदे

मदार एक असे झाड आहे ज्याला आयुर्वेदामध्ये अत्यंत गुणकारी मानण्यात येते. मदारच्या झाडाला येणारी फुले ही साधारणतः दोन प्रजातीची असतात. ज्यामध्ये सफेद रंग आणि निळा रंग असतो. या वनस्पतीचा उपयोग बऱ्याच रोगांना  दूर करण्यासाठी होतो. तसंच बऱ्याच आयुर्वेदीक औषधांमध्येही याचा वापर करण्यात येतो. मदारचे नक्की काय फायदे आहेत ते आपण या लेखातून पाहणार आहोत. कोणत्या आजारांंवर मदार ठरते उपयोग ते जाणून घेऊया. 

बद्धकोष्ठासाठी गुणकारी

बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाी मदार अत्यंत फायदेशीर आहे आणि  याच्या मदतीने बद्धकोष्ठतेची समस्या दूरही करता येते. ज्या लोकांना ही समस्या आहे त्यांनी मदारची पानं घ्यावीत आणि ही पानं उन्हात सुकवावीत. नंतर ही पानं जाळून त्याचा जो धूर येईल तो प्रभावित  जागी घ्यावा. मदारच्या पानांचा हा धूर तुमची बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास उपयुक्त ठरतो. तसंच तुम्हाला होणारा त्रासही कमी होतो. याचा प्रयोग तुम्ही एक आठवड्यापर्यंत केल्यास, तुम्हाला योग्य परिणाम दिसून येईल.

सूज करते कमी

शरीराला ज्या ठिकाणी सूज आली असेल तिथे  तुम्ही मदारची पानं लावा. ही पानं लावल्याने सूज निघून जाण्यास मदत मिळते. मदारचे पान घेऊन त्या पानावर वरच्या बाजूला मोहरीचं तेल गरम करून लावा. सूज आलेल्या ठिकाणी हे पान रात्रभर लाऊन ठेवा.  सकाळी तुम्हाला सूज गेलेली दिसून येईल. तुम्ही हा  उपाय दिवसातून दोन वेळा केल्यास सूज पटकन निघून जाईल. 

वाचा – घरच्या झाडांची काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

गुढघ्यातील दुखणे होईल कमी

गुढघ्यातील दुखणे हे वयानुसार वाढते.  त्यावर काहीही इलाज नाही असंच सगळ्यांना वाटतं. पण असं अजिबात नाही. तुम्ही मदारच्या  पानांचा लेप गुडघ्याला लावा आणि कमाल पाहा. याचा लेप लावल्याने गुडघ्याचे दुखणे निघून जाते.  मदारच्या पानांचा लेप तयार करण्यासाठी तुम्हाला 4-5 मदारची पाने लागतील. ही पाने तुम्ही व्यवस्थित वाटून घ्या.  या पेस्टमध्ये तुम्ही थोडेसे मीठ आणि  मोहरीचे तेल मिक्स करा. त्यानंतर हा लेप गुडघ्यावर दिवसातून दोन ते तीन वेळा लावा. एक महिन्यापर्यंत हा  लेप तुम्ही नियमित लावत राहिल्यास, गुढघ्याच्या दुखण्यातून तुम्हाला सुटका मिळेल.  

पिंपळाची पानं ठरतात आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या याचे फायदे (Benefits Of Peepal Leaves)

श्वासासंबंधित समस्या होतील दूर

Shutterstock

मदारची फुले ही दम्याच्या रुग्णांसाठी वरदान ठरतात. तुम्ही मदारची काही फूलं उन्हात सुकवा आणि नंतर मिक्सरमधून त्याची पावडर करून घ्या. ही पावडर घेऊन त्यात मीठ मिसळा आणि दिवसातून एकदा गरम पाण्यात ही पावडर मिक्स करून तुम्ही हे पाणी प्या. तुमचा दम्याचा त्रास निघून जाण्यास मदत मिळते. 

वडाच्या झाडाचे आरोग्याला होतात अफलातून फायदे (Medicinal Uses Of Banyan Tree In Marathi)

खोकल्यासाठी फायदेशीर

Shutterstock

खोकला झाल्यास, तुम्ही मदारच्या फुलांची पावडर बनवून घ्या आणि ही पावडर हलक्या  गरम पाण्यात मिक्स करून प्या. ही पावडर खाऊन  तुमचा खोकला दूर होतो. सर्दी झाल्यासदेखील तुम्ही हा उपाय करून पाहू शकता. या दोन्हीसाठी मदार फायदेशीर ठरतो. 

फंगल संक्रमण झाल्यास उपयोगी

मदारच्या झाडातून निघणारा चिक हा आपल्या त्वचेसाठी उत्तम मानला जातो. त्वचेवर दाद अथवा कोणत्याही प्रकारचे फंगल संक्रमण झाल्यास, मदारच्या झाडाचा चिक त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी होतो. तर तुम्हाला जर कोणत्या किटकाने शरीरावर चावल्यास, हा चिक तुम्ही लावला तरीही ती जागा बरी होण्यास फायदेशीर ठरतो. या चिकामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स हे फंगल संक्रमणासाठी उपयोगी ठरते. 

‘या’ झाडाची विषारी पानं मधुमेहासाठी मात्र ठरतात वरदान

बहिरेपणावरदेखील उपाय

ज्या व्यक्तींना ऐकू येत नाही त्यांना मदारच्या पिवळ्या पानांचा उपयोग करून तुम्ही ही समस्या  दूर करू शकता. ही पिवळी पानं घेऊन पाण्यात उकळवा आणि याचा रस काढा. त्यानंतर याचे दोन ते तीन थेंब रोज कानात घाला. असं केल्याने बहिरेपणा निघून जातो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य