DIY लाईफ हॅक्स

फक्त सुंगधी फुल नाही तर मोगरा या कारणासाठी आहे फायदेशीर

Leenal Gawade  |  May 5, 2022
Mogra_fb

 मंद सुगंध देणारी मोगऱ्याची फुलं अनेकांच्या आवडीची असतील. साधारण एप्रिल महिना सुरु झाला की, मोगऱ्याची फुलं जास्त दिसू लागतात. हल्ली मोगऱ्याची शेती वर्षभर केली जाते. त्यामुळे ही फुलं थोड्या फार प्रमाणात का असेना मिळतात. पण या फुलांचा खरा सीझन हा खरा उन्हाळ्यातच असतो. केसांत ही फुलं माळण्यापलीकडे याचे काही उपयोग असतील असे तुम्हाला वाटते का?  असे वाटत असेल तर असे अजिबात नाही. सुगंधी द्रव्य आणि केसांची शोभा वाढवण्यापलीकडे ही याचे अनेक फायदे आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला करुया सुरुवात

 त्वचेसाठी मोगऱ्याचे फायदे

Mogra

 मोगऱ्याचे फुल त्वचेसाठी फारच फायद्याचे असते. ते नेमके कसे ते आता जाणून घेऊया. 

  1. ॲंटीसेप्टिक :  मोगऱ्यामध्ये अनेक अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत. त्यामुळे एखादी जखम झाली तरी देखील त्या बऱ्या होण्यास मदत मिळते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स किंवा इतर काही जखमा झाल्या असतील तर त्यावर मोगऱ्याचा अर्क काढून लावावा. त्यामुळे त्या जखमा बऱ्या होण्यास मदत मिळते. 
  2. त्वचा करते हायड्रेट : ज्यांना कोरड्या त्वचेचा त्रास असेल अशांनी तर मोगऱ्याचा उपयोग करायला हवा. मोगऱ्याचे पाणी किंवा मोगऱ्याची पेस्ट असेल तर ती चेहऱ्याला लावा. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळते. 
  3. डाग करा दूर :  चेहऱ्यावर पिंपल्स आल्यानंतर चेहऱ्यावर डाग तसेच राहून जातात. चेहऱ्यावर तसेच डाग राहून गेले असतील तर तुमच्यासाठी मोगरा हा खूपच चांगला. मोगऱ्याचा उपयोग केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत करते. 
  4. अँटी एजिंग: त्वचा तुकतुकीत आणि तरुण हवी असेल तर मोगऱ्याचे पाणी हे उत्तम असते. मोगऱ्याचे पाणी वापरल्यामुळे त्वचेतील कोलॅजन वाढते आणि त्वचा अधिक चांगली दिसू लागते.

असाही करु शकता मोगऱ्याचा वापर

आता मोगऱ्याच्या फुलाचा वापर स्किनकेअर म्हणून करायला अजिबात विसरु नका. 

Read More From DIY लाईफ हॅक्स