आरोग्य

संधिवात ते वजन कमी करण्यात फायदेशीर असलेल्या Sea Buckthorn Tea चे आश्चर्यकारक फायदे वाचा 

Vaidehi Raje  |  Jul 1, 2022
Benefits of Sea Buckthorn

चहा हे भारतातील सर्वात आवडत्या पेयांपैकी एक आहे. चहा पिण्याचे कितपत फायदे आहेत किंवा चहाचे अति प्रमाणात सेवन केल्याने नुकसान होऊ शकते का याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आढळतात. चहा हे करोडो लोकांसाठी अमृत आहे. शरीरात उर्जेचा प्रसार व्हावा म्हणून आणि आळस दूर करण्यासाठी लोक चहा घेतात. ज्यांना ऊर्जा हवी असते पण चहाचे साईड इफेक्ट्स नको असतात ते लोक ग्रीन टी, हर्बल टी, Chamomile Tea चा आश्रय घेतात. आणि सध्या ट्रेंडिंग असलेला सी-बकथॉर्नच्या पानांपासून तयार केलेला चहा देखील अतिशय फायदेशीर आहे. तुम्ही Sea- buckthorn चे नाव ऐकले आहे का? नावात sea असूनही, त्याचा समुद्राशी दुरान्वयेही  संबंध नाही. ही झाडे उत्तरांचल आणि हिमाचल प्रदेशातील अतिशय थंड, कोरड्या भागात आढळतात. अनेक जुन्या पुस्तकांमध्येही या रसाळ फळाचा उल्लेख करण्यात आला असून हे फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्यात ओमेगा फॅटी ऍसिड्स असतात.

आरोग्यासाठी फायदेशीर सी – बकथॉर्न 

सी-बकथॉर्न हे एकमेव असे फळ आहे ज्यामध्ये ओमेगा 7 फॅटी ऍसिड असते, जे अत्यंत दुर्मिळ आहे. यामध्ये  भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात. शतकानुशतके, या फळाचा त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे आणि सुखदायक प्रभावांमुळे चिनी औषधांमध्ये प्रामुख्याने वापर केला जात आहे. 

Benefits Of Sea Buckthorn

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर सी-बकथॉर्न 

हे आंबट-चविष्ट फळ पिकल्यानंतरच खाल्ले जाते. पिकल्यानंतर ते चविष्ट लागते. जॅम आणि वाइन बनवण्यासाठी या फळाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, परंतु आता त्याची पानांचाही वापर चहामध्ये केला जात आहे. वजन कमी करण्याच्या परिणामांसाठी हे फळ फिटनेस जगतात चांगलेच पसंत केले जात आहे. अभ्यासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे, तज्ज्ञ म्हणतात की सी बकथॉर्नच्या पानांपासून तयार केलेला हा चहा वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांसाठी खूप प्रभावी ठरू शकतो. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यापासून ते व्हिसरल फॅट जमा होण्यापासून रोखण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी याचा वापर केला जाऊ शकतो. 

अनेक औषधांमध्ये होतो वापर 

सी-बकथॉर्न ही एक प्रकारची औषधी वनस्पती आहे. त्याची पाने, फुले आणि फळे अनेक प्रकारची औषधे तयार करण्यासाठी वापरली जातात. तज्ज्ञांच्या मते त्याच्या पानांपासून बनवलेला चहा खूप फायदेशीर आहे. सी-बकथॉर्नवर केलेल्या एका अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की अनेक प्रकारच्या दीर्घकालीन आरोग्य समस्यांमध्ये त्याचा तुम्हाला विशेष फायदा होऊ शकतो. 

Benefits Of Sea Buckthorn

एक्झिमाचा त्रास कमी करण्यात फायदेशीर 

तज्ज्ञांच्या संशोधनात असे आढळून आले आहे की जे लोक सी-बकथॉर्न चहाचे सेवन करतात त्यांना एक्झिमा होण्याचा धोका कमी असतो. जर्नल ऑफ न्यूट्रिशनल बायोकेमिस्ट्रीमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे नमूद केले आहे की संशोधकांनी  ज्या लोकांनी दररोज सी बकथॉर्न चहाचे सेवन केले , चार महिन्यांत त्यांच्या एक्झिमच्या  लक्षणांमध्ये चांगलीच सुधारणा दिसून आली. संशोधकांचे म्हणणे आहे की आरोग्याच्या अनेक सामान्य समस्या टाळण्यासाठी या चहाचे सेवन  हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो कारण त्यात जीवनसत्त्वे A, B1, B2, B6, C, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आणि इतर ऍक्टिव्ह एलिमेंट्स देखील असतात.

सांधेदुखी होते कमी 

सी-बकथॉर्नच्या पानांमध्ये असलेल्या संयुंगांमध्ये दाह-विरोधी गुणधर्म असतात जे संधिवाताचा त्रास कमी करण्यास मदत करतात. भारतात केलेल्या एका अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले की संधिवातासारख्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी या चहाचे सेवन अत्यंत प्रभावी आहे. याच्या पानांचा अर्क आणि चहा शरीरातील दाह व सूज कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. 

परंतु याचे काही लोकांना साईड इफेक्ट्स जाणवू शकतात. त्यामुळे सी बकथॉर्नचे सेवन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य