आरोग्य

म्हणून रोज सकाळी भिजवलेले बदाम खाण्याचा दिला जातो सल्ला

Leenal Gawade  |  Dec 29, 2019
म्हणून रोज सकाळी भिजवलेले बदाम खाण्याचा दिला जातो सल्ला

चांगल्या आरोग्यासाठी अनेक चांगल्या सवयी अवलंबण्याचा प्रयत्न आपण करत असतो. सकाळी उठल्यापासून चांगल्या गोष्टी पोटात जाव्या यासाठी आपण अगदी चांगल्या नाश्त्यापासून सुरुवात करतो. चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही सकाळी उठून पाणी पित असाल… आल्याचा चहा पित असाल… किंवा कोमट पाण्यात लिंबू पिळून पाणी पित असाल… आणि काही जण तर सकाळी पाण्यात भिजवलेले बदाम खातात. तुम्हीही भिजवलेले बदाम खात असाल किंवा खाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला भिजवलेल्या बदामाचे फायदे माहीत हवेत. आज जाणून घेऊया भिजवलेल्या बदामाचे फायदे.

बदामाचा उपयोग कराल तर मिळेल सुंदर त्वचा आणि निरोगी आरोग्य (Benefits Of Almond In Marathi)

भिजवलेल्या बदामातून मिळतात हे फायदे

shutterstock

  1. बदामामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शिअम, झिंक, मॅग्नेशिअम, ओमेगा 3 असते. बदाम कोरडे असल्यामुळे त्यातील पोषक तत्व म्हणावी तशी मिळत नाही. पण बदाम भिजवल्यानंतर त्यातील पोषक घटक अधिक चांगल्या पद्धतीने मिळतात. म्हणजे कोरड्या सालीमुळे त्यातील मॉश्चर घटक तुमच्या शरीराला मिळतात. 
  2. आता बदाम भिजत घातल्यामुळे त्याच्या फायद्यामध्ये वाढ होते ते तुम्हाला कळले असेलच आता त्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुमच्या हाडांना बळकटी देण्याचे कामही बदाम करतात. 
  3. तुम्हाला पचनाचा त्रास असेल तर मग तुम्ही भिजवलेले बदाम खायला हवे कारण अशा पद्धतीने बदाम खाल्ल्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते आणि तुम्हाला आवश्यक पोषक घटक मिळतात.
  4. बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन E आणि कॅल्शिअम तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यास मदत करते.
  5. बदाम खाल्ल्यामुळे तुमची बुद्धा तल्लख होते असे म्हणतात. बदामामध्ये असलेले पोषक घटक तुमच्या मेंदूला चालना देतात. अल्झायमर बळावण्याची शक्यताही बदामामुळे कमी होते. 
  6. बदामामध्ये प्रोटीन,  पोटॅशिअम आणि मोनोसॅच्युरेडेट फॅट तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते. त्यामुळे हृदयविकाराचा त्रास होत नाही.

फक्त खाण्यासाठीच नाहीतर अक्रोड आहे सौंदर्यदायी (Benefits Of Walnut In Marathi)

बदाम भिजत घालण्याची ही आहे योग्य पद्धत

shutterstock

बदामाचे फायदे पाहता जर तुम्हाला जर बदाम खायचा विचार करत असाल तर तुम्हाला बदाम भिजत घालण्याची योग्य पद्धत माहीत हवी. दररोज तुम्ही किमान दोन बदाम तरी खायला हवेत. तुम्ही दररोज रात्री बदाम भिजत घाला. चांगल्या प्रतीचे बदाम तुम्ही वापरले तर फार उत्तम. साधारण 8 ते 9 तास तुम्हाला बदाम भिजत घालणे आवश्यक असते. सकाळी उठून बदामाच्या साली काढून तुम्हाला हे बदाम खायचे असतात. अशा पद्धतीने बदाम खाल्ल्यामुळे तुम्हाला भरपूर फायदे मिळतील. त्यामुळे रोज रात्री बदाम भिजत घालायला विसरु नका. तुम्हीच नाही तर संपूर्ण कुटुंबाने भिजलेल्या दोन बदामाचे दररोज सेवन करा.

आता जर तुम्ही बदाम खात असाल तर बदाम भिजत घालून मगच खा आणि फायदेच फायदे मिळवा.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

Read More From आरोग्य