तुतीचे फळ तुम्ही नक्कीच खाल्ले असेल. आंबटगोड चवीचे हे फळ लहानपणी तुमचे फेव्हरेटही असेल. तुतीचे फळ खाणं चवीप्रमाणेच आरोग्यासाठीही चांगले असते. तुती खाण्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते, ह्रदय समस्या आटोक्यात राहतात, रक्ताभिसरण सुधारते. एवढंच नाही तर या झाडाची पानेही औषधी असतात. तुतीच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याचा वापर तुम्ही अनेक आरोग्य समस्यांवर करू शकता. या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, कॅल्शिअम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे या पानांचा वापर करून तुम्ही त्वचेच्या समस्यादेखील दूर करू शकता. जर तुम्ही पिंपल्सने हैराण असाल तर तुतीच्या पानांचा वापर तुम्ही सौंदर्योपचाराप्रमाणे करायला हवा. यासाठी जाणून घ्या तुतीच्या पानांचा तुमच्या त्वचेवर काय परिणाम होतो.
पिंपल्स दूर करण्यासाठी कसा करावा वापर –
पिंपल्स येण्याची कारणे अनेक असली तरी किशोरवयीन मुलींमध्ये पिंपल्स येण्याचे प्रमाण जास्त आढळते. जर तुम्ही पिंपल्सच्या समस्येने हैराण असाल तर तुम्ही तुतीच्या पानांचा वापर यासाठी करू शकता. बऱ्याचजणींना पिंपल्स आल्यामुळे चेहऱ्यावर सूज येते. अशा पिंपल्सवर तुतीच्या पानांचा रस लावण्यामुळे तो भाग लवकर बरा होतो. पानाचा रस काढण्यासाठई तुतीची कोवळी पाने मिक्सरमध्ये वाटून त्याचा लेप तयार करा आणि तो पिंपल्सवर लावा.
रक्त शुद्ध होते –
जर तुमचे रक्त शुद्ध नसेल तर तुम्हाला सतत त्वचेच्या समस्या जाणवतात. शिवाय रक्त शुद्ध नसल्यास काही आरोग्य समस्यांचा धोकाही सतत असतो. मात्र जर तुम्ही तुतीचे फळ आणि तुतीच्या पानांचे नियमित सेवन केले तर तुमचे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. तुतीची पाने तुम्ही चहासोबत उकळून पिऊ शकता. कारण या मुळे तुमचे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. रक्त शुद्ध असेल तर पिंपल्स येणे आपोआप कमी होते. असे घालवा शरीरावर आलेले बारीक चामखीळ
त्वचेचे इनफेक्शन रोखले जाते –
त्वचेला सतत खाज अथवा पुरळ येत असेल तर त्यातून आराम मिळण्यासाठी तुम्ही तुतीच्या पानांचा वापर करू शकता. जखम, इनफेक्शन, पुरळ यावर तुम्ही तुतीची पाने वाटून त्याचा लेप लावला तर त्याभागावरील दाह कमी होतो. या लेपमध्ये जखम भरून काढण्याची आणि जळजळ कमी करण्याची क्षमता असते. शिवाय यामुळे त्वचेवर जुनाट व्रणही राहत नाहीत. तोंडावर बारीक पुळ्या येतात, जाणून घ्या कारण
रक्तातील साखर नियंत्रित राहते –
जर तुम्ही मधुमेही असाल तर रक्तातील साखर वाढल्यास तुमच्या त्वचेवर खाज येते. बऱ्याचदा अशी त्वचा खाजवल्यास अंगावर नखांचे ओरखडे येतात. नखांच्या ओरखड्यामुळे झालेली जखम लवकर बरी होत नाही. मात्र तुतीच्या पानांमुळे तुमच्या रक्तातील साखर कमी होते. तुतीच्या पानांमध्ये असलेल्या अल्फा ग्लबकोसाइडेज या गुणधर्मामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. यासाठीच तुतीच्या पानांचा काढा अथवा चहासोबत तुतीची पाने सेवन करण्याची सवय स्वतःला लावा. बदाम तेलापासून अशी बनवा नाईट क्रिम, त्वचा दिसेल चमकदार