पावसाळ्यातील वातावरणाचा आपल्या आरोग्य आणि जीवनशैलीवपर परिणाम होताना दिसतो. एवढंच नाही तर या काळात तुमच्या फॅशन आणि स्टाईलमध्ये अनेक बदल होतात. पावसाळ्यात मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जसं की तुमची लिपस्टिक नेहमी वॉटरप्रूफ असायला हवी. शिवाय लिपस्टिकचे शेडही तुमची बाहेरील वातावरणाशी मिळते जुळते असावेत. यासाठी पावसाळ्यासाठी निवडा या खास रंगाच्या लिपस्टिक
पावसाळ्यासाठी खास लिपस्टिकच्या शेड –
पावसाळ्यात खास दिसण्यासाठी वापरा या शेडच्या लिपस्टिक
मॅटेलिक शेड –
पावसाळ्यात तुम्ही खास मॅटलिक शेडच्या लिपस्टिक तुमच्या ओठांसाठी निवडू शकता. कारण या काळात सर्वत्र वातावरण फ्रेश असते. अशा वातावरणात थोड्या बोल्ड शेड ओठांवर चांगल्या दिसतात. ओठ हायलाईट करण्यासाठी मॅटेलिक शेड तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. जर तुम्ही या शेडच्या लिपस्टिक निवडणार असाल तर लक्षात ठेवा ओठांना लिपस्टिक लावण्याआधी कन्सिलर अवश्य लावा. ज्यामुळे तुमचा लुक परफेक्ट दिसेल.
नॅचलर न्यूड शेड –
जर तुम्हाला साधा आणि नैसर्गिक लुक आवडत असेल तर पावसाळ्यात तुम्ही न्यूड शेड नक्कीच निवडू शकता. मात्र त्यासाठी तुमच्या कपड्यांची रंगसंगती तुमच्या मेकअपला साजेशी असावी. नॅचरल न्यूड लिपस्टिक लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा लिप कलर कधीच ओव्हर कोट करू नका. त्याऐवजी अशा शेडमध्ये तुम्ही एखादी ग्लॉसी शेड वापरू शकता.
ब्राऊन शेडच्या लिपस्टिक –
कोको अथवा चॉकलेट रंगाच्या ब्राऊन शेडमधील लिपस्टिक पावसाळ्यात खूप छान दिसतात. कारण या लिपस्टिक कोणत्याही स्किन टोनसोबत मॅच होतात. अशा शेड निवडताना तुमची लिपस्टिक वॉटरप्रूफ असेल याची काळजी घ्या. ज्यामुळे या शेड लावून तुम्ही मस्त पावसात भिजण्याचा आनंद घेऊ शकता. ऑफिस अथवा दैनंदिन वापरासाठी या रंगाच्या शेड खूप सोयीच्या असतात.
लाल रंगाची शेड –
लाल रंगाची लिपस्टिक असा एक रंग आहे जो तुम्ही कोणत्याही स्टाईलवर आणि वर्षभरात कधीही वापरू शकता. ऑफिस, पार्टी, सणसमारंभ, लग्न अशा कोणत्याही कार्यक्रमासाठी तु्म्ही लाल रंगाच्या शेड निवडू शकता. लाल रंगामध्ये खूप शेड आहेत त्यामुळे जरी हा रंग बोल्ड असला तरी तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार या रंगाची निवड करू शकता. लाल रंग हा प्रेम आणि आत्मविश्वास दर्शवणारा असल्यामुळे तुमच्याकडे या रंगाची लिपस्टिक असायला हवी.
पिंक शेड –
पिंक, जांभळा, लव्हेंडर अशा शेड खास प्रसंगी खूप छान दिसतात. कारण पावसाळी वातावरण हे रोमॅंटिक असतं अशा वातावरणात अशा रंगाच्या शेड नक्कीच खुलून दिसू शकतात. विशेष म्हणजे या रंगाची शेड लावल्यामुळे तुमचा लुक पूर्ण बदलून जातो. त्यामुळे पावसाळ्यात डेटवर जाताना गुलाबी रंगाच्या शेड नक्की ट्राय करा.
अधिक वाचा
चेहरा धुताना फॉलो करा या स्किन केअर टिप्स
चेहऱ्यावर कसे लावायचे हायलायटर, सोपी पद्धत
गुलाबी लिपस्टिक करायची असेल खरेदी तर हे शेड्स आहेत बजेटमध्ये