Oily Skin

तेलकट त्वचेसाठी उत्तम सनस्क्रिन | Best Sunscreen For Oily Skin

Trupti Paradkar  |  Mar 19, 2019
Best Sunscreen For Oily Skin In Marathi

प्रखर उन्हापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणं फार गरजेचं आहे. यासाठी सोपा उपाय म्हणजे उन्हाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रिन लोशन लावणे. पण जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्हाला त्यासाठी कोणतं सनस्क्रिन निवडावं हा प्रश्न नक्कीच पडला असेल. एकतर घामामुळे उन्हाळ्यात त्वचा नेहमीपेक्षा अधिक तेलकट दिसते. शिवाय या काळात चेहऱ्यावर पिंपल्स आणि इतर त्वचा समस्यादेखील निर्माण होतात. सहाजिकच उन्हाळ्यात तेलकट त्वचेची इतर त्वचा प्रकारापेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तेलकट त्वचेच्या लोकांनी योग्य प्रकारचं सनस्क्रीन निवडणं फारच गरजेचं आहे.

Table of Contents

  1. मनीष मल्होत्रा सॅंडलवूड एसपीएफ 25 जेल – Manish Malhotra Sandalwood SPF 25 Gel
  2. मायग्लॅम सुपरफूड्स किवी अँड कोकोनट सनस्क्रिन – Myglamm Superfood Kiwi and Coconut Sunscreen
  3. ऑर्गेनिक हार्वेस्ट सनस्क्रिन विथ एसपीएफ 60 – Organic Harvest Sunscreen with SPF 60
  4. ऑर्गेनिक हारवेस्ट सनस्क्रिन – Organic Harvest Sunscreen Acne/Oily Skin – SPF 30
  5. लोटस हर्बल सेफ सन युव्ही स्किन मॅट जेल – Lotus Herbals Safe Sun Uv Screen Matte Gel
  6. न्युट्रोजिना अल्ट्राशीअर ड्राय टच सनब्लॉक एसपीएफ 50 + – Neutrogena UltraSheer Dry Touch Sunblock SPF 50+
  7. लॉरिअल पॅरीस युव्ही परफेक्ट अॅक्वा इसेंस एसपीएफ 50 – L’Oreal Paris UV Perfect Aqua Essence SPF 50
  8. रिक्विल अल्ट्रा मॅट ड्राय – टच सनस्क्रिन जेल – Re’equil Ultra Matte Dry-Touch Sunscreen Gel
  9. कामा आयुर्वेदा नॅचरल सन प्रोटेक्शन – Kama Ayurveda NATURAL SUN PROTECTION
  10. अवेन व्हेरी हाय प्रोटेक्शन सनस्क्रिन इम्युलशन एसपीएफ – Avene Very High Protection Sunscreen Emulsion SPF
  11. तेलकट त्वचेसाठी सनस्क्रिन प्रश्न – FAQs

वास्तविक बाजारात अनेक प्रकारचे सनस्क्रिन लोशन उपलब्ध असतात. मात्र यातून तेलकट त्वचेसाठी योग्य सनस्क्रिन निवडणं तसं थोडं कठीणच आहे. कारण काही उत्पादनांवर नॉर्मल टू ऑईली स्कीनसाठी असं लिहीलेलं असतं. ज्याचा अर्थ नॉर्मल, संवेदनशील, कोरडी आणि तेलकट अशा सर्वच त्वचेसाठी हे लोशन वापरता येऊ शकतं. त्यामुळे तेलकट त्वचेसाठी हे लोशन चालेल का हा प्रश्न तुमच्यापैकी अनेकींना पडला असेल. उन्हाळ्यात सुर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. मात्र सनस्क्रिन तुमच्या त्वचेचं या किरणांपासून संरक्षण करतं. बाजारात सनस्क्रिन नेहमी एसपीएफ 15 ते 60 मध्ये उपलब्ध असतं. मात्र उन्हाळ्यात सनस्क्रिन निवडताना ते  एसपीएफ 30+ असलेलं घ्यावं ज्यामुळे ते परिणामकारक ठरू शकतं. आम्ही तुम्हाला तेलकट त्वचेसाठी काही उत्तम सनस्क्रिन लोशन सूचवत आहोत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार यातील तुमच्यासाठी योग्य सनस्क्रिनची निवड करू शकता. यासोबतच तेलकट त्वचेसाठी बेस्ट वाईप्स (Best Wipes For Oily Skin In Marathi) शिवाय तेलकट त्वचेसाठी बेस्ट फाऊंडेशन (Best Foundation For Oily Skin In Marathi) आणि तेलकट त्वचेसाठी बेस्ट क्लिंझर (Best Cleanser For Oily Skin In Marathi) देखील अवश्य ट्राय करा.

मनीष मल्होत्रा सॅंडलवूड एसपीएफ 25 जेल – Manish Malhotra Sandalwood SPF 25 Gel

तेलकट त्वचेसाठी बेस्ट सनस्क्रिन शोधताय, मग तुमच्याजवळ असायलाच हवं हे मायग्लॅमचं मनीष मल्होत्रा सॅंडलवूड एफीएफ जेल कारण यामध्ये नैसर्गिक चंदन, हळद, नारळाचे तेल, ऑलिव्ह आईल आणि कोरफडीच्या गराचा वापर करण्यात आलेला आहे. जेल स्वरूपात असल्यामुळे हे सनस्क्रिन तुमच्या त्वचेत सहज मुरतं आणि चिकटपणा जाणवत नाही.त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी यात खास घटक वापरण्यात आलेले आहेत.यामुळे तुमचं सूर्यकिरणांपासून संरक्षण होतंच, शिवाय तुमची त्वचा मऊ आणि मुलायम राहण्यास मदत होते.

फायदे –

तोटे – 

मायग्लॅम सुपरफूड्स किवी अँड कोकोनट सनस्क्रिन – Myglamm Superfood Kiwi and Coconut Sunscreen

त्वचा तेलकट असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या उत्पादनांचा वापर करायला हवा. यासाठी आम्ही तुम्हाला मायग्लॅमचं आणखी एक सनस्क्रिन सुचवत आहोत. ज्यामध्ये किवी आणि नारळाच्या तेलाचा वापर करण्यात आलेला आहे. सनस्क्रिन लावल्यानंतर तुमची त्वचा चिकट होत नाही शिवाय यात लाईटवेट फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे. याचा वापर तुम्ही पावसाळ्यात अथवा पाण्यात देखील करू शकता. या सनस्क्रिनचा नियमित वापर केल्यास तुमच्या चेहऱ्यावरील वयाआधीच दिसणाऱ्या एजिंगच्या खुणा कमी होतात

फायदे –

तोटे –

ऑर्गेनिक हार्वेस्ट सनस्क्रिन विथ एसपीएफ 60 – Organic Harvest Sunscreen with SPF 60

सनस्क्रिनची सर्वात जास्त गरज लागते ती उन्हाळ्यामध्ये,  कारण या काळात सूर्याची किरणं खूप प्रखर असतात. सूर्य किरणांमधील अतिनील किरणांचा तुमच्या त्वचेसोबत संपर्क झाला तर सनबर्न, सनटॅन होण्याची शक्यता असते. मात्र या काळात त्वचेवर सतत घामदेखील येत असतो. यासाठीच तेलकट त्वचेच्या लोकांना चिकटपणा कमी असलेलं सनस्क्रिन हवं असतं. ऑर्गेनिक हारवेस्टचं हे सनस्क्रिन पुरूष आणि महिला असं कोणलाही वापरता येतं. त्वचेत ते पटकन मुरतं आणि त्वचा जास्तीत जास्त हायड्रेट ठेवतं.

फायदे-

तोटे – 

ऑर्गेनिक हारवेस्ट सनस्क्रिन – Organic Harvest Sunscreen Acne/Oily Skin – SPF 30

ऑर्गेनिक हारवेस्टचे हे सनस्क्रिन खास तेलकट आणि एक्ने असलेल्या त्वचेसाठी बनवण्यात आलेलं आहे. एसपीएफ 60 आणि ब्लू लाईट टेक्नॉलॉजीचा वापर केलेला असल्यामुळे ते प्रखर सूर्यकिरण आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या लाईटपासून तुमचं संरक्षण करतं. चिकटपणा कमी व्हावा यासाठी त्यामध्ये नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आलेला आहे. 

फायदे –

तोटे –

लोटस हर्बल सेफ सन युव्ही स्किन मॅट जेल – Lotus Herbals Safe Sun Uv Screen Matte Gel

सूर्यकिरणांपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला अशा एका सनस्क्रिनची गरज असते, जे तुमच्या त्वचेवर भक्कम कवच निर्माण करेल. लोटसचं हे जेलबेस सनस्क्रिन तुम्ही यासाठी निवडू शकता. कारण यामध्ये सूर्यकिरणांच्या हानिकारक घटकांपासून संरक्षण करणारा फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे. यासोबत तुमचं या क्रिममुळे एजिंग मार्क्स, पिगमेंटेशन अशा त्वचेच्या अनेक समस्यांपासूनदेखील संरक्षण होतं.  यात खास नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आलेला आहे. शिवाय ते लाईटवेट असून त्वचेत चांगलं मुरतं.

फायदे –

तोटे –

न्युट्रोजिना अल्ट्राशीअर ड्राय टच सनब्लॉक एसपीएफ 50 + – Neutrogena UltraSheer Dry Touch Sunblock SPF 50+

न्युट्रोजिनाचे हे सनस्क्रिन त्वचेमध्ये व्यवस्थित मुरतं ज्यामुळे तुमची त्वचा मऊ होते. उन्हाळ्यात त्वचेच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी या क्रिमचा चांगला उपयोग होऊ शकतो. शिवाय हे तेलकट अथवा चिकट नसल्यामुळे तुम्हाला ते आवडू शकते. पुरूष आणि महिला दोघांसाठी उपयुक्त असलेलं हे सनस्क्रिन लाईटवेट आहे. वॉटरप्रूफ आणि स्वेटप्रूफ असल्यामुळे उन्हाळ्यात अथवा पाण्यात पोहताना तुम्ही ते नक्कीच वापरू शकता.

फायदे – 

तोटे –

लॉरिअल पॅरीस युव्ही परफेक्ट अॅक्वा इसेंस एसपीएफ 50 – L’Oreal Paris UV Perfect Aqua Essence SPF 50

उन्हाळ्यात घामामुळे त्वचेवरील तेलकटपणा जास्त वाढतो. यात जर तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने तेलकट असेल तर सनस्क्रिनमुळे अधिक चिकट दिसते. सनस्क्रिनमुळे होणारा चिकटपणा टाळण्यासाठी जर तुम्ही सनस्क्रिन लावणं टाळत असाल, तर असं मुळीच करू नका. अशा वेळी तुम्हाला गरज आहे वॉटर बेस सनस्क्रिन लोशनची…यासाठी हे सनस्क्रिन अगदी परफेक्ट आहे. कारण हे लोशन तुमच्या त्वचेत सहज मुरतं आणि सूर्य किरणांपासून तुमच्या त्वचेचं संरक्षण करतं. 

फायदे –

तोटे –

रिक्विल अल्ट्रा मॅट ड्राय – टच सनस्क्रिन जेल – Re’equil Ultra Matte Dry-Touch Sunscreen Gel

तुम्हाला सतत घाम येत असेल ज्यामुळे तुम्ही तुमची त्वचा कोरडी ठेवणाऱ्या सनस्क्रिनच्या शोधात असाल, तर हे सनस्क्रिन तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरेल. कारण यामुळे तुमच्या त्वचेचं सूर्यकिरणांपासून संरक्षण तर होतंच मात्र त्वचा कोरडीदेखील राहते. जेलबेस आणि मॅट फिनिशचं असल्यामुळे ते त्वचेत लगेच मुरतं. असं असलं तरी सर्व प्रकारच्या त्वचेवर हे सनस्क्रिन वापरता येतं. वॉटरप्रूफ आणि स्वेट प्रूफ असल्यामुळे उन्हाळ्यात आणि पाण्यात तुम्ही ते वापरू शकता.

फायदे –

तोटे –

कामा आयुर्वेदा नॅचरल सन प्रोटेक्शन – Kama Ayurveda NATURAL SUN PROTECTION

त्वचेचं नुकसान होऊ नये यासाठी जर तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक उत्पादनाच्या शोधात असाल, तर कामाचं हे सन प्रोटेक्शन तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरेल. यात नैसर्गिक ग्लिसरिन, शीया बटर, ऑलिव्ह ऑईल अशा उत्पादनांचा वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुम्ही त्वचेचं प्रोटेक्शन करत मस्त उन्हात फिरण्याचा आस्वाद घेऊ शकता. शिवाय यात नैसर्गिक घटक असल्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान न होता त्वचेची योग्य निगा राखली जाते. 

फायदे – 

तोटे – 

अवेन व्हेरी हाय प्रोटेक्शन सनस्क्रिन इम्युलशन एसपीएफ – Avene Very High Protection Sunscreen Emulsion SPF

जर तुम्ही असं एखादं सनस्क्रिन लोशन शोधत आहात जे तुम्हाला कोणत्याही ऋतूत वापरता येईल, तर या सनस्क्रिनची निवड करा. कारण हे सनस्क्रिन तुम्ही उन्हाळ्याप्रमाणेच पावसाळ्यातही वापरू शकता. समुद्र किनारी फिरताना आणि समुद्राच्या पाण्यात डुंबताना तुमच्या त्वचेचं यामुळे चांगलं रक्षण होईल. मात्र यासाठी तुम्हाला हे सनस्क्रिन दर दोन तासांनी लावायला हवं. यातील वॉटर प्रूफ फॉर्मुला तुमची बीच जवळील अथवा पूल जवळील पिकनीक सुसह्य करेल.

फायदे –

तोटे – 

तेलकट त्वचेसाठी सनस्क्रिन प्रश्न – FAQs

प्रश्न –तेलकट त्वचेसाठी कोणतं सनस्क्रिन चांगले ?

उत्तर – जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही 50 पेक्षा जास्त एसपीएफ असलेलं आणि त्वचेचं टॅनिंग, पिगमेंटेशनपासून संरक्षण देणारं सनस्क्रिन निवडायला हवं.

प्रश्न – तेलकट त्वचेवर सनस्क्रिन लावण्यााधी मॉईस्चराईझर लावणं गरजेचं आहे का ?

उत्तर – जर तुम्हाला मॉईस्चराईझर वापरायचं नसेल तर असं सनस्क्रिन निवडा ज्यामध्ये मॉईस्चराईझर करणारे घटक असतील. ज्यामुळे तुमची त्वचा जास्त तेलकट दिसणार नाही.

प्रश्न – सनस्क्रिनमुळे पोअर्स ब्लॉक होतात का ?

उत्तर – सनस्क्रिन लावत असाल तर वेळोवेळी त्वचा स्वच्छ आणि नितळ करणं गरजेचं आहे. कारण जास्त जाड आणि चिकट सनस्क्रिनमुळे तुमच्या त्वचेचे पोअर्स ब्लॉक होण्याची शक्यता असते. 

आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेले हे सनस्क्रिन तुम्हाला कसे वाटले आणि त्यातील कोणते सनस्क्रिन तुम्ही तुमच्यासाठी निवडले हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

Read More From Oily Skin