मनोरंजन

अखेर भारती सिंहने दाखवला आपल्या लेकाचा चेहरा

Leenal Gawade  |  Jul 12, 2022
भारतीने दाखवला मुलाचा चेहरा

लाफ्टरक्वीन भारती सिंह ( Bharti Singh) अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. सध्या ती तिच्या लहान बाळाच्या संगोपनामध्ये इतकी व्यग्र आहे की, तिच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ती तिच्या मुलाचा म्हणजेच ती लाडाने गोला म्हणते त्याचा उल्लेख करत असते. पण आतापर्यंत तिने आपल्या मुलाचा चेहरा कोणालाही दाखवला नव्हता. आता तिच्या बाळाला तीन महिने झाले असून अखेर भारतीने तिच्या मुलाचा गोंडस चेहरा दाखवला आहे. तिच्या युट्युब चॅनेलवर तिने त्याचा चेहरा दाखवला असून या व्हिडिओला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत असलेल्या तिच्या चाहत्यांची प्रतिक्षा आता या फोटोमुळे संपली असून त्याला अधिकाधिक पाहण्याची इच्छा नक्कीच वाढली आहे.

भारतीने दाखवला लक्ष्यचा चेहरा

भारती आणि हर्ष यांचा लक्ष्य

भारतीने तीन महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला. पण तिने ही आनंदवार्ता देताना मुलाचा फोटो कुठेही शेअर केला नव्हता. अनेकांनी तिला चेहरा रिव्हेल करण्यासाठी अनेकदा रिक्वेस्ट केली होती. पण तिने तीन महिन्यांचा कालावधी घेतला.तिने अखेर त्याचा चेहरा दाखवण्याचा निर्णय घेतला. या व्हिडिओमध्ये तिने त्याच्या खास शूटचेही काही क्षण लावले आहेत. शिवाय लक्ष्यचा प्रत्येक महिन्याचा वाढदिवसासाठी खास तयारी केली जाते हे देखील या व्हिडिओवरुन दिसत आहे. भारतीने त्याचा चेहरा दाखवण्यासोबतच तिने गोलाचा रुम दाखवला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अधिक चांगला झाला आहे. भारतीने लक्ष्यचा चेहरा रिव्हेल करताना थोडी नाट्यमय परिस्थिती निर्माण केली असली तरी ही दोघं स्क्रिनवर अगदी रिअल वावरताना दिसतात. 

भारतीने केले होते वजन कमी

नव्या रुपातील भारती

भारती आणि हर्षचे लग्न हे आजही अनेकांना माहीत असेल. शानदार आणि रॉयल अशा सेलिब्रिटी लग्नाची सुरुवात त्यांनीच केली होती. त्यानंतर अनेक मोठ्या सेलिब्रिटींची लग्ने झाली. भारतीला लग्नानंतर अनेकांनी गुडन्यूज कधी देशील या संदर्भात विचारणा केली होती. लग्नाच्या दोन ते तीन वर्षानंतर तिने गुडन्यूज देण्याचा विषय फारच गंभीर घेतला. तिने तिचे वजन कमी केले.सध्या इंडस्ट्रीमध्ये वजन कमी करणे हे फॅड आहे. पण तिने आई होण्यासाठी हा निर्णय घेतला असे दिसत आहे. हेल्दी लाईफस्टाईलसाठी तिने हा निर्णय घेतल्याचे कळत आहे. वजन कमी केल्यानंतर भारतीच्या प्रसिद्धीत कोणताही फरक पडला नाही. उलट तिला या रुपातही अनेकांनी चांगलीच पसंती दिली.

शेवटच्या क्षणापर्यंत केले काम

अत्यंत सामान्य घरातून आलेली ही टॅलेंटेड लाफ्टरक्वीन आपल्या कामाशी फारच प्रामाणिक आहे. तिच्यासारखा शो होस्ट कोणीही करु शकत नाही. गरोदर असतानाही तिने तिचे काम सगळ्या काळजी घेऊन सुरु ठेवले होते. तिने कधीही त्यात ब्रेक घेतला नाही. कामाच्या वेळा, आहार याकडे अधिक लक्ष देत तिने तिचे काम केले. इतकेच नाही तर तिने नवव्या महिन्यापर्यंत आपले काम सुरु ठेवले होते. ज्यामुळे तिचे खूपच जास्त कौतुक झाले होते. 

आता लक्ष्यचा चेहरा दाखवून तिने चाहत्यांचे अधिक प्रेम मिळवले आहे. तुम्हाला भारतीला गोला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. 

Read More From मनोरंजन