Bigg Boss 13 ची स्पर्धक अभिनेत्री रश्मी देसाई सध्या चर्चेत आहे ती तिच्या ब्रेकअपमुळे. अरहान खानसोबत नॅशनल टेलिव्हिजनवर ब्रेकअप केल्यानंतर अरहानने तिच्यासोबत जे काही केलं त्याची अद्दल तिने त्याला घडवली आहे. रश्मीच्या प्रसिद्धीचा फायदा घेत अरहानने जे काही तिच्या पाठीमागून केलं हे सलमानने शो दरम्यान सांगितल्यानंतर तिने या शो मधूनच त्याच्याशी नाते तोडले आणि आता रश्मीने तिच्यापर्यंत पोहोचण्याचे सगळे दरवाजेदेखील बंद करुन टाकले.
Bigg Boss 13: रश्मी देसाईने केलं अरहान खानबरोबर ब्रेकअप, हिमांशीकडून घरच्यांना निरोप
सगळीकडून केले ब्लॉक
रश्मी देसाईचा फायदा घेत अरहान खान तिचेच पैसे उडवत असल्याचे ज्यावेळी सलमानने रश्मीला सांगितले त्यावेळी रश्मीला काही काळ विश्वास बसला नाही. पण या सगळ्याचे गांभीर्य लक्षात येताच तिने लगेचच काही निर्णय घेतले आहे. रश्मी बिग बॉसमध्ये आल्यानंतर तिच्या नात्याविषयी अनेक चर्चा होत होत्या. या स्पर्धेमध्ये अरहान खान हा सुद्धा स्पर्धक म्हणून आला होता. पण तो शोमध्ये जास्त काळ टिकला नाही. पण या शो दरम्यान त्यांचे नाते सगळ्यांनाच कळले. पण रश्मीसोबतचे नाते वगळता त्याचे खूप महिलांसोबत संबंध आहेत. हे देखील तिला कळले. त्यामुळे त्यांच्या नात्यात थोडे चढ उतार सुरु होते. पण अरहान घराच्या बाहेर गेल्यानंतर सगळ्या गोष्टी जास्त त्रासदायक होत गेल्या.त्याच्याबद्दल अशा काही गोष्टी कळल्या की, रश्मीने त्याला सगळ्यामधून बेदखल करुन टाकले आहे. रश्मीच्या घरात तो सध्या राहात होता. त्या घरातून त्याला बाहेर काढण्यासाठी अरहानला नोटीसही पाठवली. अरहानचा रश्मीशी आणि रश्मीच्या परिवाराशी कोणत्याही प्रकारने अरहान संपर्क साधू शकणार नाही यासाठी तिने सगळे प्रयत्न केले आहेत. सोशल मीडिया अकाऊंटसचे सगळे पासवर्डदेखील तिने बदलले आहेत.
Bigg Boss 13: एक्स बॉयफ्रेंडसोबत बेड शेअर करण्यास रश्मीने दिला नकार
नेमकं झालं काय?
Bigg Boss च्या घरात नात्याची नेहमीच गुंतागुंत असते हे सांगायला नको. रश्मी सध्याच्या घडीला अरहान खान नावाच्या अभिनेत्याला डेट करत आहे. या रिअॅलिटी शोमध्ये आल्यानंतरच ही गोष्ट समोर आली. त्यानंतर सलमानने अरहानला अनेकदा त्याच्या कुटुंबात कोण कोण असल्याचे विचारले. त्यावर तो खरे उत्तर देत नसल्याचे सलमानने रश्मीसमोर सांगितले. पण तरीही काही दिवस Bigg Boss च्या घरात काढल्यानंतर ज्यावेळी तो घराबाहेर पडला. त्यावेळी रश्मीच्या खात्यातून एक मोठी रक्कम काढली गेली. जी रश्मीला माहीत असणे गरजेचे होते. अरहान बाहेर पडल्यानंतर रश्मीला काही लागले तर अरहान तिला पाठवेल या विश्वासावर तिने तिचे बँकेचे व्यवहार त्याला सुपूर्त केले. पण त्याने त्याचा गैरफायदा घेत स्वत:साठी पैसे काढले आणि ते खर्च केले.हे सलमानने तिला सांगितले.शिवाय अरहानचे लग्न झाले असून त्याला बाळ असल्याचे सांगितल्यानंतर रश्मीच्या पायाखालील जमीन सरकली आणि तिने त्याक्षणी अरहान खानसोबत ब्रेकअप केले.
रश्मी देसाईचेही झाले होते लग्न
आता अरहान खानचे लग्न झाले या विषयी रश्मीला कल्पना होती. नाती विस्कटतात याचा अनुभव तिला होता. कारण तिने उतरन या मालिकेतील सहकलाकार नंदीश संधूसोबत धुमधडाक्यात लग्न केले. पण काहीच वर्षांनी त्यांचा संसार मोडला. त्यामुळे अरहानच्या लग्नाला तिचा विरोध नव्हता. पण मुलाबद्दल तिला काहीच कल्पना नव्हती.
आता अरहानसाठी सगळेच ब्लॉक झाल्यानंतर पुढे त्याला संधी मिळणार की नाही ते पाहावे लागेल.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade