सध्या ‘मुझसे शादी करोगे’ या शो मध्ये दिसलेली जसलीन माथरू सतत कोणत्या ना कोणत्या चर्चेत असते. केवळ तीच नाही तर अगदी बिग बॉसमध्ये आल्यापासून तिचे कुटुंबही चर्चेत असते. प्रसिद्ध गायक अनुप जलोटा यांच्यावर प्रेम असल्याचे सांगून बिग बॉसमध्ये जोडी म्हणून जसलीन माथरूने प्रवेश केला होता. मात्र त्यांचे हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. तर आता पारस छाब्राशी लग्न करण्यासाठी म्हणून ती ‘मुझसे शादी करोगे’ या शो मध्ये सध्या झळकत होती. मात्र पारसने दुसऱ्याच मुलीची निवड केली असल्याचे समोर आले आहे. Corona Virus मुळे हा शो देखील लवकर गुंडाळण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र जसलीन माथरू आता वेगळ्याच कारणासाठी पुन्हा चर्चेत आली आहे. तेदेखील तिच्या कुटुंबामुळे.
CoronaVirus: चित्रीकरण बंद असूनही कर्मचाऱ्यांना देण्यात येणार वेतन
जसलीनच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी
जसलीन माथरूने वडील केसर माथरू यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. केवळ एकदाच नाही तर असे कॉल बरेचदा आल्याने त्यांनी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असून संपूर्ण कुटुंब सध्या या धमकीच्या दहशतीखाली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने केसर माथरूकडून पैशांची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास, संपूर्ण कुटुंबाला मारून टाकण्याची धमकी फोनवरून देण्यात आली आहे. मात्र हे फोन कॉल्स जसलीनला आले नसून तिच्या वडिलांना आले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इतकेच नाही तर संपूर्ण कुटुंबालाच मारून टाकण्याची धमकीही देण्यात आली असल्याचे जसलीनचे वडील केसर यांनी स्पष्ट केले आहे.
रणबीर-आलियाच्या नात्याबाबत नेटीझन्समध्ये कुजबूज
जसलीनच्या वडिलांनी केले स्पष्ट
जसलीनच्या वडिलांनी नक्की काय घडले हे स्पष्ट सांगितलं आहे, ‘पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर माझ्या इमारतीची सुरक्षा व्यवस्था तपासण्यात आली. तो व्यक्ती मला आणि माझ्या कुटुंबाला मारून टाकण्याची आणि नुकसान पोहचवण्याची धमकी देत होता’ तसंच त्यांनी एकापेक्षा अधिकवेळा कॉल आल्याचेही सांगितले. घाबरून सध्या माथरू कुटुंब कुठेही बाहेर जात नसल्याचेही सांगण्यात येत आहे. जसलीनदेखील सध्या घराबाहेर पडत नाही. काही दिवसांपूर्वीच ती ‘मुझसे शादी करोगे’ या शोमधून एलिमिनेट झाली होती. जसलीन बिग बॉसमध्ये आल्यापासूनच चर्चेत होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या शो मध्येही तिचे लहान कपडे घालण्यावरून अनेक वाद झाले होते. तसेच तिचे अनुप जलोटा यांच्याशी असलेल्या संबंधांवरूनही अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र ते आपले गुरू आणि मित्र असून आपले त्यांच्यावर अतिशय प्रेम असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
जय-वीरुची जोडी पुन्हा दिसणार पडद्यावर तेही मराठी चित्रपटात
पोलिसांचा तपास चालू
हा धमक्यांचा फोन नक्की कोणी केला आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर आता त्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र नक्की हे कोणी केले आहे याचा तपास अजून लागलेला नाही. तोपर्यंत माथरू कुटुंबीय मात्र दहशतीखालीच आहे असं सांगण्यात आले आहे. सध्या कोरोना व्हायरसचा गोंधळ चालू असताना आता हे धमक्यांच्या फोनचे नवे प्रकरण अजूनच त्रासदायक ठरणार असे दिसत आहे. पण जसलीनच्या वडिलांना नक्की असा फोन का आला? याबद्दल मात्र चर्चा सुरू झाल्या आहेत.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade