बॉलीवूड

Bigg Boss फेम निकी तांबोळीचे एका मागोमाग म्युझिक अल्बम रिलीज

Leenal Gawade  |  Jun 22, 2021
Bigg Boss फेम निकी तांबोळीचे एका मागोमाग म्युझिक अल्बम रिलीज

सगळ्यात मोठा रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जाणारा Bigg Boss हा शो अनेकांसाठी फारच फायद्याचा ठरला आहे. काल परवा काहीच ओळख नसलेल्या एखाद्याला या शो मुळे अशी काही प्रसिद्धी मिळाली आहे की त्याच्या करिअरची चांदीच चांदी झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात आलेला Bigg Boss 14 हा सीझन चांगलाच गाजला. यामध्ये आलेल्या अनेक सेलिब्रिटींना पुन्हा एकदा एक नवी ओळख आणि प्रसिद्धी मिळाली. याच सीझनचा भाग असलेल्या निकी तांबोळीच्या करिअरलाही चार चाँद लागले असे म्हणायला हवेत.कारण निकी सध्या अनेक ठिकाणी दिसून येते. तिच्या हाती अनेक प्रोजेक्ट लागले असून सध्या तिची एकामागोमाग एक अशी पॉप गाणी येत आहेत. ज्यामुळे ती सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. निकीचे करिअर एखाद्या रॉकेटप्रमाणे सध्या सुस्साट उडू लागले आहे.

साथ निभाना साथिया फेम ‘ही’ अभिनेत्री होणार दुसऱ्यांदा आई

निकी तांबोळीचे करिअर सुस्साट

Bigg Boss मध्ये आल्यानंतर निकी तांबोळी ही साऊथ चित्रपटातील एक नटी आहे इतकीच तिची ओळख होती. तिच्या नाही साऊथमधील दोन ते तीन मोठे चित्रपट असले तरी देखील तिला इतकी प्रसिद्धी मिळाली नव्हती. पण Bigg Boss मध्ये आल्यानंतर तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली काहीही करायला तयार असणारी निकी सगळ्या टास्कमध्ये आणि इंटरटेन्मेंटमध्ये खूपच चांगली होती. त्यामुळे ती या शो मध्ये शेवटपर्यंत होती.  आता घरातून बाहेर पडल्यानंतर तिला लगेच खतरों के खिलाडी या शोची देखील ऑफर मिळाली. ती या शोमध्ये देखील दिसली होती. आता तिची दोन गाणी रिलीज झाली आहे. टोनी कक्करसोबत ‘नंबर लिख’ आणि आता मिलिंद गाबासोबत ‘शांती’ हे साँग आलेले आहे. ज्यामुळे सगळ्या युट्युबवर ही गाणी फारच धुमाकूळ घालताना दिसत आहेत. या गाण्यामुळे निकीला नक्कीच चांगली प्रसिद्धी मिळाली आहे. 

#KKK11 प्रेक्षकांना खिळवून ठेवायला तयार, राहुल वैद्यचा पहिला प्रोमो

निकी तांबोळीची चर्चा

निकी तांबोळीची या गाण्यांमुळे खूपच चर्चा होताना दिसत आहे. तिच्या या अल्बममुळे तिला भविष्यात आणखी काही प्रोजेक्टस मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तिची सतत चर्चा होत असल्यामुळेच निकी सध्या चांगलीच गाजत आहे. तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सचा आकडाही चांगलाच वाढत आहे. त्यामुळे निकीच्या करीअरचे सोने झाले असेच म्हणावे लागेल आणि Bigg Boss हा शो तिला लाभला असेच म्हणावे लागेल. 

निकीला मिळाली खूपच प्रसिद्धी

निकी तांबोळी हा यंदाच्या Bigg Boss  चा हॉट असा चेहरा होता. तिने या घरात अनेक धुमाकूळ घातला. राहुल वैद्यसोबत मैत्री आणि त्यांच्याशीच भांडणं असे करुन तिने या घरातील डबलढोलकीचा टॅगही मिळवला. पण मित्रांसाठी अगदी काहीही करणारी निकीसुद्धा यामध्ये दिसून आली. त्यामुळे तिला या सगळ्याचा फायदा होणार हे अगदी स्पष्टच होते.  आता निकीच्या करिअरचा वेग पाहता ती कोणत्या नव्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याची प्रतिक्षा आहे. 


जर तुम्ही हे गाणं पाहिलं नसेल तर नक्की हे गाणं पाहा. 

आमच्यात तसं काहीही नाही तेजश्रीने केला त्या फोटोवरुन खुलासा

Read More From बॉलीवूड