बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवरच्या लग्नाला गुरुवारी 4 वर्षे पूर्ण झाली. त्यांचा लग्नाचा वाढदिवस त्यांनी अगदी खास पद्धतीने साजरा केला आहे. लॉकडाऊनमध्ये घरीच राहात त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसाठी एक छान रोमँटिक पोस्ट लिहिली आहे. त्यामुळे त्यांचा हा दिवस अगदी खास झाला. या शिवाय बिपाशा बासू आणि करण सिंहला त्यांच्या खास मित्रांनी त्यांच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. #monkeylove हा हॅशटॅगही या दोघांमुळे पुन्हा एकदा ट्रेंड होऊ लागला आहे.
साजिदसोबतच्या लग्नाला दिव्याभारतीच्या पालकांचा होता विरोध
2016 रोजी अडकले विवाहबंधनात
टीव्ही स्टार करण सिंह ग्रोवर आणि बिपाशा बासू यांनी 2016 साली लग्न केले. त्यांच्या लग्नाचा ग्रँड सोहळा अनेकांनी पाहिला असेल. त्यांच्या लग्नाची बातमी ही अनेकांसाठी धक्कादायक होती. एका चित्रपटात काम करत असताना त्यांना लव्ह अॅट फर्स्ट साईट झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाबद्दल अनेक उलट-सुलट गोष्टीही समोर आल्या पण तरीही त्यांचे नाते आजही अगदी व्यवस्थित टिकून आहे. त्यांच्या या अॅनिव्हर्सरीजच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांचे अनेक फोटो वायरल होऊ लागले आहेत.
शेअर केला एक रोमँटिक व्हिडिओ
बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोव्हरने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या रोमँटिक आयुष्याची साक्ष देणार असा हा व्हिडिओ आहे. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी हा खास व्हिडिओ The wedding filmer ने एडिट केला असून यामध्ये लग्नाचे काही खास क्षण टिपण्यात आले आहेत. एक प्रकारे त्यांच्या लग्नाची ही एक छोटीशी झलक होती असे म्हणायला काहीच हरकत नाही.
“व्हायरस मराठी” आयोजित लॉकडाउन फिल्म फेस्टिव्हल
करणने लिहिली भावूक पोस्ट
करण सिंह ग्रोवरने बायको बिपाशासाठी एक खास पोस्ट देखील लिहिली आहे. या पोस्टमध्ये बिपाशावर असलेले प्रेम व्यक्त करताना त्याने त्याच्या आयुष्याला आलेली स्थिरता बिपाशा असल्याचे म्हटले आहे. त्याने त्याच्या आयुष्यातील एक महत्वाचा आणि चांगला निर्णय घेतला असल्याचे त्याने यामध्ये म्हटले आहे. माझ्या कठीण काळात अशीच माझ्या पाठिशी राहा आणि चुका झाल्यास मला नक्कीच सुधार वेळ प्रसंगी मार, हे लिहायलाही करण विसरला नाही. त्याच्या या पोस्टमुळे बिपाशाचा दिवस नक्कीच चांगला गेला असणार यात काही शंका नाही.
अजून एक स्टार किडची बॉलीवूडमध्ये येण्याची तयारी सुरू, व्हिडिओ होत आहेत व्हायरल
प्रेमात दोघांनी घेतला चान्स
करण सिंह ग्रोवरचे लवलाईफ नेहमीच चर्चेत राहिले. कारण त्याने आतापर्यंत त्याने दोन लग्न केली. अत्यंत घाईत आणि को स्टारसोबत त्याने लग्न केले. पहिले लग्न त्याने श्रद्धा निगम (2008-2009), जेनिफर विंगेट (2012-2014) त्याचे लग्न फार काळ टिकले नाही. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये त्याचे नाव रिलेशनशीपच्या बाबतीत फार चांगले नव्हते. दुसरीकडे बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम यांच्या नात्याची आणि ते लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा झाली. पण जॉनने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. त्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाल्याचे सिद्ध झाले. दोघांचेही हार्टब्रेक झालेले असताना ‘अलोन’ या चित्रपटादरम्यान बिपाशा- करणची ओळख झाली. त्यांना प्रेम झाले आणि त्यांनी लग्न केले.
बिपाशा आणि करणच्या आयुष्यातम असाच आनंद टिकू दे. त्या दोघांनाही Happy wedding anniversary
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade