आरोग्य

शरीरावर येणारे पिंपल्स आरोग्यासंदर्भात देतात हे संकेत

Leenal Gawade  |  Sep 21, 2021
शरीरावर येणारे पिंपल्स

पिंपल्स हे केवळ चेहऱ्यावर येतात असा तुमचा समज असेल तर असे मुळीच नाही कारण पिंपल्स हे तुमच्या संपूर्ण शरीरावर येऊ शकतात. गळा, मान, छाती, पाठ, नितंब अशा वेगवेगळ्या भागांवर पिंपल्स येतात. अशा वेगवेगळ्या भागांवर पिंपल्स येणे म्हणजे ते केवळ सौंदर्यामुळे आले असे अजिबात होत नाही. वेगवेगळ्या भागात पिंपल्स येण्याची कारणं ही वेगवेगळी असतात. काही कारणं ही आरोग्याशी निगडीत असतात. तुम्हाला शरीराच्या कोणत्या भागावर पिंपल्स येतात त्यावर तुमच्या आरोग्याच्या तक्रारी अवलंबून असतात. जाणून घेऊया शरीरावर येणारे पिंपल्स नेमक्या आरोग्याच्या कोणत्या तक्रारीचे संकेत देतात.

छातीवर येणारे पिंपल्स

 खूप महिला आणि पुरुषांना छातीवर अगदी हमखास पिंपल्स येतात. चेहऱ्यावर ज्या प्रमाणे पिपंल्स येतात अगदी तसेच मोठे पिपंल्स त्यांना छातीकडे येतात. हे पिंपल्स आकाराने खूप मोठेही आणि दुखणारेही असू शकतात.  छातीवर येणाऱ्या पिंपल्ससाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरु शकता. पण सर्वसामान्यपणे छातीवर येणाऱ्या पिंपल्ससाठी स्वच्छता ही सगळ्यात जास्त कारणीभूत ठरतात.  जर तुम्हाला खूप घाम येत असेल आणि तुम्ही वर्कआऊट करत असाल आणि त्यानंतर मुळीच स्वच्छता बाळगत नसाल तर तुम्हाला छातीवर पिंपल्स येऊ शकतात. जर तुम्हाला असे छातीवर पिंपल्स येत असतील तर तुम्ही घामासंदर्भात इलाज करायला हवा.

चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी करण्यासाठी वापरा देशी शुद्ध तूप

पाठीवर येणारे पिंपल्स

Instagram

सुंदर पाठ हे कित्येकांचे स्वप्न असते. पण खूप जणांना नेमके पाठीवर पिंपल्स येतात.  पाठीवर पिंपल्स सतत येत असतील तर तुमच्या आरोग्याविषयक नक्कीच काहीतरी तक्रारी आहेत हे नक्की होते.  पाठीवर येणाऱ्या या पिंपल्सला बॅक्ने असे देखील म्हणतात. ज्यांना जास्त मसालेदार पदार्थ खाण्याची सवय असेल किंवा मासिक पाळीमुळे तुमचे रुटीन बदलले असेल तर अशावेळी तुमच्या पाठीवर पिंपल्स येऊ शकतात. इतकेच नाही तर पाठीवर येणाऱ्या पिंपल्ससाठी अपुरी झोप, ताणतणाव हे देखील कारणीभूत ठरु शकतात. तुमचे रोजचे रुटीन कसे आहे ? हे जाणून घेत तुम्ही त्यामध्ये बदल करायला हवा.

बर्फाच्या पाण्याने धुवा चेहरा, जाणून घ्या फायदे

नितंबावर येणारे पिंपल्स

खूप जणांना नितंबावर खूप मोठे मोठे  पिंपल्स येतात. पण  नितंबावर येणाऱ्या पिंपल्सला पिंपल्स  म्हणत नाही. तर केस तुटल्यामुळे हे फोड बरेचदा नितंबावर येत असतात. नितंबावर आलेल्या पिपंल्समुळे अनेक तक्रारी निर्माण होतात. धड बसता येत नाही. शिवाय शौचाल गेल्यावर देखील अशा पिंपल्स येण्याची शक्यता असते. पण या शिवाय जर खूप ताण झाला असेल जागरण झाली असतील तर तुम्हाला अशी बटअॅक्ने येण्याची शक्यता असते. त्यामुळे वेगवेगळ्या भागांवर येणारे पिंपल्स हे असे संकेत देत असतात. त्याकडे दुर्लक्ष करु नका. 

तुम्हालाही वेगवेगळ्या भागांवर पिंपल्स येत असतील तर तुम्ही तुमच्या शरीरात होणारे बदल जाणून घ्या

स्ट्रेच मार्क घालविण्यासाठी 5 सोपे आयुर्वेदिक घरगुती उपाय

Read More From आरोग्य