Mental Health

शरीराची प्रतिमा (Body Image) ठरतेय मानसिक तणावाला कारणीभूत

Dipali Naphade  |  Mar 18, 2021
शरीराची प्रतिमा (Body Image) ठरतेय मानसिक तणावाला कारणीभूत

प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, वागणूक कशी आहे यावरून नव्हेतर ती व्यक्ती दिसायला सुंदर आहे का? यावरून तिची प्रतिमा ठरत असते. व्यक्ती चांगली असल्यापेक्षा तिचं दिसणं जास्त महत्त्वाचे समाजामध्य समजण्यात येते. म्हणून सुंदर दिसण्यासाठी आजकाल प्रत्येक जण प्रयत्न करतोय. त्यात लठ्ठ व्यक्तींचाही समावेश आहे. बरेचदा लठ्ठपणामुळे लोक चेष्टेचा विषय बनतात. त्यामुळे वजन जास्त असणाऱ्या व्यक्ती या समाजात मानसिक दडपणाखाली वावरताना दिसून येतात. याचसंदर्भात आम्ही डॉ. अपर्णा गोविल भास्कर, बॅरिएट्रिक आणि लेप्रोस्कोपिक सर्जन, सैफी रूग्णालय – मुंबई यांच्याशी चर्चा केली. पण त्याआधी शरीराची प्रतिमा म्हणजे नक्की काय ते आपण पाहू. 

लठ्ठपणा कमी करण्यासाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेआधी आणि नंतर काय काळजी घ्याल

शरीराची प्रतिमा (Body Image) म्हणजे नक्की काय?

freepik.com

शरीराची प्रतिमा (बॉडी इमेज) व्यक्तिमत्वाची प्रतिमा आहे, जी लोकांना स्वतःच्या शरीराची असते, जी त्यांचे शरीर प्रत्यक्षात कसे दिसते. हे ठरवले जाते. आपल्या शरीराची प्रतिमा ही विश्वास, विचारधारणा, भावना आणि वर्तणुकीपासून बनलेली असते. इतकंच नाहीतर आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर शरीराची प्रतिमा प्रभाव पाडत असते. नकारात्मक शरीराची प्रतिमा असल्यास त्याचा आपल्या मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्याचा नकारात्मक मार्गाने इतरांशी असलेल्या संबंधांवरही परिणाम होऊ शकतो. नकारात्मक शरीराची प्रतिमा असलेले लोक आरशात स्वतःकडे पाहणे टाळतात. कारण, या लोकांमध्ये आत्मविश्वास कमी झालेला असतो. हे लोक अनेकदा शरीराचा एखादा भाग लपवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान करतील. विशेषतः असे अनेक मानसिक रूग्ण आहेत, अतिरिक्त व्यायाम करून स्वतःला इजा करून घेतात.

दैनंदिन जीवनातील विविध कारणांमुळे येणारे नैराश्य वजन वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे. अतिलठ्ठ व्यक्तींकडे समाज एक वेगळ्याच नजरेनं पाहतो. व्यक्तीच्या स्वभावापेक्षा त्याच्या बाह्य रूपावरून लोक त्याच्याशी कसं वागायचं हे ठरवतात आणि त्या पद्धतीने त्याला वागणूक देतात. लठ्ठपणामुळे अनेक लोकांना घराबाहेर पडणे अवघड होते. लोक त्यांची खिल्ली उडवतात म्हणून लठ्ठ व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. यासाठी काही लोक वजन कमी करण्यासाठी आणि शरीराच्या आकाराबद्दल कोणाकडूनही सल्ला घेतात. याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर पडतो. आपण इतरांसारखे नाही किंवा आपल्यात कमतरता आहे. या विचारांनी त्यांच्यामध्ये नैराश्य हा आजार अधिक दिसून येतो.

लठ्ठपणा ठरतोय वंधत्वाचे मुख्य कारण, जाणून घ्या तथ्य

शरीराची नकारात्मक प्रतिमा कशी सुधाराल….

शरीराची प्रतिमा आणि आरोग्य

Shutterstock

मानवी शरीरात सतत बदलत होत असतात. त्यामुळे शरीर स्वास्थ्य राहण्यासाठी शरीराच्या प्रतिमेवर जास्त लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. त्यातच वजन वाढीवरही नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. लठ्ठपणामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळते. यात लठ्ठ व्यक्तींमध्ये टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, हृदयरोग, मूत्रपिंड विकार, फुफ्फुस आणि यकृता संबंधित विकार वाढताना दिसून येत आहेत. हे आजार टाळण्यासाठी वजन कमी करणं महत्त्वाचे आहे.

मानसिक आजाराची लक्षणे, मानसिक आजार उपाय मराठीत (Mental Illness In Marathi)

लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय करावे

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Mental Health