चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या एकापेक्षा एक आयडीया लढवल्या जातात. कधी कलाकर सुई धागा ओवताना दिसतात तर कधी आपला गेट अप बदलून रिक्षातून फिरताना दिसातात. पण आपल्या आगामी चित्रपटासाठी रिचा चढ्ढाने (Richa Chadha) एक वेगळीच ट्रीक केली आहे. आपला पुढचा चित्रपट ‘शकीला – नॉट अ पॉर्न स्टार’(Shakeela- Not A Porn Star) साठी रिचाने वेगळंच डोकं लढवलं आहे. रिचाने नुकतंच एक कॅलेंडर लाँच केलं आहे. प्रत्येक महिन्यामध्ये तिचा लुक बदलता दाखवता आहे. या कॅलेंडरच्या प्रत्येक महिन्यावर चित्रपटाचं एक फिक्शनल मुव्ही पोस्टर डिझाईन करण्यात आलं असून याला देण्यात आलेलं प्रत्येक टायटल हे अतिशय बोल्ड आहे. त्यामुळे हे एक वेगळ्या तऱ्हेने चित्रपटाचं प्रमोशन करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.
कोण आहे शकीला?
दाक्षिणात्य अभिनेत्री आणि साऊथ सेक्स सायरन म्हणून ओळखली जाणारी शकीला (Shakeela) ही मूळची केरळची होती. तिने मल्याळम, तामिळ, तेलुगू आणि कन्नड या भाषांमधील अॅडल्ट (adult) चित्रपटांमध्ये काम केलं. तसंच ती केवळ वीस वर्षांची होती तेव्हा तिने ‘प्लेगर्ल्स’ (Play Girls) या चित्रपटात प्रसिद्ध अॅडल्ट अभिनेत्री सिल्क स्मिताबरोबरही काम केलं. बॉलीवूडमध्ये सिल्क स्मितावर आधारित ‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट येऊन गेला असून विद्या बालनने तिची भूमिका साकारली होती. आता शकीलावर ‘शकीला – नॉट अ पॉर्न स्टार’(Shakeela- Not A Porn Star) हा चित्रपट बनवण्यात येत आहे. यामध्ये शकीलाची व्यक्तिरेखा रिचा साकारत आहे. या चित्रपटामध्ये नव्वदच्या दशकातील पल्प मुव्हीज (pulp movies) दाखवण्यात येणार असून या काळामध्ये शकीलाचा दबदबा होता. पुरस्कार विजेता दिग्दर्शक इंद्रजित लंकेश या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून त्याकाळच्या अॅडल्ट फिल्मस्टारचं जीवनपट या चित्रपटातून उलगडून दाखवण्यात येणार आहे.
वाचा – वर्ष 2019 मध्ये बॉलीवूडमध्ये धडकणार महिला बायोपिक
कॅलेंडर गर्ल रिचा चढ्ढा
हा चित्रपट साधारणतः एप्रिल ते मे दरम्यान प्रदर्शित होणार आहे. मात्र आतापासूनच या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळेच प्रेक्षकांमध्ये अधिक क्रेझ निर्माण होण्यासाठी हे कॅलेंडर बनवण्यात आलं आहे. शकीला नक्की कशी होती याचा अंदाज येण्यासाठी हे कॅलेंडर बनवण्यात आलं आहे. शिवाय यावर प्रत्येक महिन्यासाठी बोल्ड टायटल देण्यात आलं आहे. यामधील टॅगलाईन्सवर प्रचंड मेहनत करण्यात आल्याचंही जाणवतं आहे. टायटलबरोबरच प्रत्येक महिन्याच्या ठिकाणी रिचाचा वेगवेगळा लुक ठेवण्यात आला आहे. शिवाय हे टायटल आणि फोटो पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीची उत्सुकता अजून वाढेल हे नक्की. असा प्रयोग याआधी करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा प्रयोग अगदीच वेगळा आहे. त्यामुळे आता हे कॅलेंडर नक्की चाहत्यांना आणि प्रेक्षकांना आवडतं का हे पाहावं लागेल.
जानेवारी – शकीला : वह शिकार करने आ रही है – मैनईटर (ती शिकार करायला येत आहे – मॅनइटर)
फेब्रुवारी – शकीला : पापी पप्पी – किसर कुसुम
मार्च – शकीला : जंगल में मंगल
एप्रिल – शकीला : क्यों? गिर गया क्या ? – कम राइज़ इन लव (काय झालं? पडलास का? – कम राईज इन लव्ह)
मे – शकीला : हसीना का पसीना – गांव में गर्मी बहोत है
जून – शकीला : कमसिन जवानी इन पानी – इच्छाधारी नागिन
जुलै – शकीला : छतरी के पीछे क्या है – सलमा
ऑगस्ट – शकीला : रोज़ का डोज़ – विटामिन डीडी
सप्टेंबर – शकीला : मर्द को होगा दर्द – एक कातिल नर्स की कहानी
ऑक्टोबर – शकीला : ठरकी स्कूटर – हसीना
नोव्हेंबर – शकीला : एक GUNदी लड़की – गन लेडी
डिसेंबर – शकीला : पहन के लूंगी, सबकी बैंड बजा दूंगी – डोंट एंग्री हर
या कॅलेंडरवर अतिशय मजेशीर हॅशटॅग #2019ShakeelaKeNaam देण्यात आलं आहे. ज्यामुळे या चित्रपटासाठी नक्कीच प्रेक्षकांची उत्सुकता वाढेल.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade