मनोरंजन

अभिनेता राहुल खन्नाचे न्यूड फोटोशूट, सेलिब्रिटीही थक्क

Dipali Naphade  |  Jul 17, 2022
bollywood-actor-rahul-khanna-shared-nude-photo-actress-celebrities-shocked-and-commented-on-social-media-in-marathi

बॉलीवूडमधील अनेक कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. काही कलाकार हे तर वाढत्या वयानुसार अधिक सुंदर होत असल्याचे आणि फिट होत असल्याचे दिसून येते. यातील एक नाव म्हणजे राहुल खन्ना (Rahul Khanna). राहुल खन्ना तसं तर लाईमलाईटपासून खूपच दूर असतो. पण आता अचानक पुन्हा एकदा राहुल खन्ना चर्चेत आला आहे तो म्हणजे त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे (Rahul Khanna Nude Photo). राहुलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोवर अनेक मोठ्या सेलिब्रिटी कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकलेल्या नाहीत. राहुल खन्नाचे व्यक्तिमत्व हे अप्रतिम आहे आणि राहुल एक मॉडेल म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्याने नुकताच एक असा फोटो पोस्ट केला आहे ज्यावर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. सध्या राहुल खन्नाचा हा फोटो व्हायरल होत असून या फोटोची चर्चा होताना दिसून येत आहे. 

सोफ्यावर बसून दिली पोझ 

राहुल खन्ना सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह आणि त्याचे अनेक फॉलोअर्स आहेत. या फॉलोअर्समध्ये नक्कीच मुलींची संख्या जास्त आहे. राहुलचा हॉटनेस अनेक मुलींना आवडतो आणि आता तर राहुलने सोशल मीडियावर असा फोटो पोस्ट केला आहे ज्यामुळे अभिनेत्रीदेखील स्वतःला कमेंट्स देण्यापासून रोखू शकलेल्या नाहीत. राहुल सोफ्यावर बसला आहे आणि राहुलने केवळ मोजे आणि शूज घातले आहेत आणि केवळ प्रायव्हेट पार्ट (Private Part) झाकण्यापुरती उशी समोर ठेवली आहे आणि समोरच्याला घायाळ करेल असं हास्य त्याच्या चेहऱ्यावर आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने लिहिले आहे, ‘अशी कोणती तरी गोष्ट आहे जी मी लपवत आहे. पण आता ती गोष्ट जगासमोर आणण्याची वेळ आली आहे. मोठ्या खुलाशासाठी उद्या तयार व्हा’. हा फोटो पोस्ट केल्यानंतर अनेकांनी कमेंट्स करायला सुरूवात केली आहे. तर नक्की राहुल आता कोणत्या अवतारात समोर येणार आणि असं कोणते प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये राहुल काम करणार आहे याचीही सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

सेलिब्रिटींनी दिली प्रतिक्रिया 

राहुलने फोटो पोस्ट केल्यानंतर अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) त्याला प्रतिक्रिया देत म्हणाली की, ‘सोफा चांगला आहे’ तर मलायका अरोरानेदेखील (Malaika Arora) राहुलला अप्रतिम सोफा @mrkhanaa असे म्हटलं आहे. तर अनेकांनी इमोजी देत राहुल खन्नाने मीडियावर आग लावली असल्याचेही म्हटले आहे. नेहा धुपिया (Neha Dhupia) राहुल खन्नाला म्हणाली की, ‘Nice…Socks’ तर अनेकांनी त्याला हॉट असंही म्हटलं आहे. पण या सगळ्यात अनेक महिला सेलिब्रिटीच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राहुलचा हा फोटो म्हणजे सध्या मीडियावर आग लावणारा फोटो असल्याचे दिसून येत आहे.  पण यामागे नक्की आता राहुलचा कोणता चित्रपट येत आहे अथवा अजून कोणते नवे प्रोजेक्ट येत आहे हे समजून घेण्यासाठी प्रेक्षक आणि त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत. 

राहुल खन्नाचे चित्रपट करिअर 

राहुल खन्ना हा प्रसिद्ध अभिनेता विनोद खन्ना (Vinod Khanna) यांचा मुलगा असून अभिनेता अक्षय खन्ना (Akshay Khanna) याचा लहान भाऊ आहे. 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या 1947 अर्थ या चित्रपटातून राहुलने चित्रपटात पदार्पण केले. पण चित्रपटातून राहुल अधिक नाव कमावू शकला नाही. पण मॉडेलिंगच्या दुनियेत राहुलचे खूपच नाव आहे. टॉप मॉडेल (Top Model) म्हणून राहुल खन्नाने आपली ओळख निर्माण केली. याशिवाय त्याने लव आजकल, वेकअप सिड यासारख्या चित्रपटातून काम केले. तर वेबसिरीज ‘लीला’ मध्येदेखील राहुल खन्नाने काम केल्याचे दिसून आले आहे. पण त्याहीपेक्षा राहुलने आपली ओळख मॉडेलिंग क्षेत्रात केल्याने आता हा फोटो त्याच्याशी निगडीत आहे का असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन