बॉलीवूड

मलायका अरोराने हिऱ्याची अंगठी दाखवल्यामुळे साखरपुडा झाल्याच्या बातम्यांना ऊत

Dipali Naphade  |  Apr 13, 2021
मलायका अरोराने हिऱ्याची अंगठी दाखवल्यामुळे साखरपुडा झाल्याच्या बातम्यांना ऊत

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जिने काहीही केले तरी त्या गोष्टीची चर्चा होते. आपल्या फिटनेसमुळे तर मलायका चर्चेत असतेच. पण अर्जुन कपूरसह नात्यात असल्यापासून मलायका आणि अर्जुनची नेहमीच चर्चा होत असते. ही जोडी नक्की कधी लग्नबंधनात अडकणार आहे याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. त्यामुळे गेले दोन वर्ष यांच्या लग्नाच्या वावड्या बरेच वेळा उठल्या आहेत. मलायका नेहमीच सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. आपले वेगवेगळे फोटो शेअर करत ती तिच्या चाहत्यांना नेत्रसुखही देत असते. नुकताच मलायकाने केलेले फोटो व्हायरल झाला असून मलायका आणि अर्जुनने साखरपुडा तर केला नाही ना अशी चर्चा आता रंगली आहे. त्याला कारणही तसंच आहे. साखरपुड्याप्रमाणेच हिऱ्याची अंगठी बोटात घालून मलायकाने फोटो पोस्ट केल्यामुळे ही चर्चा रंगली असून बरेच जणांनी तिचे अभिनंदनही केले आहे आणि काहींनी तर अर्जुनला या फोटोमध्ये टॅग केले आहे. 

महात्मा जोतीराव फुलेंचा ‘सत्यशोधक’ रुपेरी पडद्यावर

मलायकाला मिळत आहेत शुभेच्छा

मलायकाने नुकतेच आपले फोटो शेअर केले. त्यामध्ये तिच्या बोटात हिऱ्याची अंगठी घातलेली दिसत आहे. खरं तर हे फोटो मलायकाने एका कंपनीच्या जाहिरातीसाठी पोस्ट केले आहेत. मात्र तिच्या हातात हिऱ्याची अंगठी पाहून नेटकरी मात्र उत्साहित झाले. अनेकांनी तर तिला तिच्या साखरपुड्यासाठी शुभेच्छाही देऊन टाकल्या. तर काही जणांनी अर्जुन कपूरचे नाव घेत मलायकाला शुभेच्छा दिल्या आहेत. लेटेस्ट फोटोशूट मलायकाने पोस्ट केल्यानंतर तिला या फोटोवर अनेक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ही हिऱ्याची अंगठी खूपच मोठी असून जर कोणालाही साखरपुड्यासाठी अंगठी निवडायची असेल तर त्यांनी या कंपनीकडून अंगठी घ्यावी असं कॅप्शन खरं तर मलायकाने आधीच फोटोखाली लिहिलं आहे. तरीही तिचा हा रॉयल लुक पाहून मलायका आणि अर्जुनचा साखरपुडा झाला आहे असा समज अनेकांनी करून घेत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मलायका अरोराचे हे फोटो व्हायरल झाले असून या फोटोंची जबरदस्त चर्चा रंगली आहे. या फोटोबाबत अनेकांनी मलायकाच्या सौंदर्याची स्तुती केली आहे, तर काहींनी हातातील अंगठी अत्यंत सुंदर असल्याचेही म्हटले आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त कलाकारांची मानवंदना

अर्जुनला केले अनेकांनी टॅग

हा फोटो पोस्ट केल्यानंतर अर्जुन कपूरला अनेकांनी टॅग केले आहे. दोघांनाही अभिनंदन करत लवकर लग्न करा असे सल्लेही काहींनी दिले आहेत. काही जणांना वाटले की, मलायका आणि अर्जुनने साखरपुडा उरकला आहे. त्यामुळे मलायकाने अंगठीचे फोटो पोस्ट करताच साखरपुडा झाल्याच्या बातम्यानाही ऊत आल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी तिला साखरपुडा केलास का? असा प्रश्नही कमेंटबॉक्समध्ये विचारला आहे. मात्र या कोणत्याही गोष्टीवर मलायकाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर केवळ फोटो पोस्ट करून मलायका सध्या आपल्याला मिळणाऱ्या प्रसिद्धीची मजा घेत असावी असा अंदाजही तिचे चाहते काढत आहेत. तर एका बाजूला मलायका आणि अर्जुन नक्की कधी लग्नबंधनात अडकणार असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे. पण या सगळ्याची उत्तरं या दोघानाही कधीच दिलेली नाहीत. 

लॉकडाऊन उत्तर नाही’असे ट्विट करणाऱ्या महेश कोठारेंवर नेटीझन्सची टीका

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड