आपल्या देशात अनेक रॉयल फॅमिलीज आहेत. ज्यांच्याबाबत तुम्ही ऐकलं असेलच. या रॉयल कुटुंबातील काही सदस्य असेही आहेत ज्यांनी बॉलीवूडमध्ये नाव कमावलं. या अभिनेत्रींच्या नावावरून आणि वावरण्यावरून तुम्हाला कळणारही नाही की, त्या रॉयल फॅमिलीशी निगडीत आहेत. इतक्या त्या डाऊन टू अर्थ स्वभावाच्या आहेत. आज आपण याच सेलिब्रिटीजबाबत जाणून घेणार आहोत.
अदिती राव हैद्री
‘पद्मावत’ चित्रपटात उत्तम भूमिका साकारलेली बॉलीवूड अभिनेत्री अदिती राव हैद्रीला कोण ओळखत नाही. ती बॉलीवूडच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये दिसते. पण तुम्हाला माहीत आहे का, अदिती राव हैद्री एक नाहीतर दोन रॉयल फॅमिलीजशी संबंधित आहे. अदिती ही अकबर हैद्रीची पणती आहे. देशामध्ये जेव्हा ब्रिटीश शासन होतं तेव्हा अकबर हैद्री हे हैद्रराबादचे पंतप्रधान होते. तर अदितीचे आजोबा राजा जे.रामेश्वर होते. ब्रिटीश शासनकाळात ते तेलंगणातील वनापर्थीचे राजा होते.
सागरिका घाटगे
‘चक दे इंडिया’ या चित्रपटातून लाईमलाईटमध्ये आलेली बॉलीवुड अभिनेत्री सागरिका घाटगेला आज प्रत्येकजण ओळखतो. तिने मराठी चित्रपटातही काम केलं आहे. तिने भारतीय क्रिकेटर जहीर खानशी लग्न केलं. सागरिकाही एका राजघराण्याची सदस्य आहे. तिचे वडील कागल राजघराण्याचे आहेत. ही जागा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आहे. सागरिकाची आजी सीता राजे इंदोरचे महाराजा तुकोजीराव होळकर यांची तिसरी मुलगी होती.
परवीन बॉबी
80 च्या दशकात टॉप बॉलीवूड अभिनेत्रींपैकी एक परवीन बॉबीचा मृत्यू हा रहस्यमयरित्या झाला होता. तिच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात ती पूर्णतः एकटी झाली होती. न तिचं कधी कोणाशी लग्न झालं ना तिचे कोणी नातेवाईक तिच्यासोबत राहत होते. तुमच्या माहितीसाठी परवीन बॉबी ही एका रॉयल फॅमिलीतील होती. तिचे वडील मोहम्मद बॉबी हे गुजरातमधील जुनागढचे नवाब होते. तर त्यांंचे पूर्वज गुजरातचे पठाण होते आणि बॉबीचं नातं हे राजवंशाशी होतं.
सोहा अली खान
सैफ अली खानची बहीण सोहा अली खानच्याबाबत सगळ्यांनाच माहीत आहे. दोघांचंही नातं रॉयल फॅमिलीशी आहे. तिची आजी भोपाळचे नवाब हमीदुल्ला खां यांची मुलगी होती. तर दादा पतौडी हे नवाब होते. त्यामुळे सोहा अली खानचं नातं दोन्ही राजघराण्यांशी आहे. सोहा अली खानचे वडील मंसूर अली खान पतौडी हे शेवटचे नवाब होते. कारण नंतर भारत सरकारने नवाब हे पदचं रद्द केलं.
भाग्यश्री
‘मैंने प्यार किया’ या 90 च्या दशकात सुपर डुपर हिट ठरलेल्या चित्रपटातील अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री. या चित्रपटाने तिने फिल्मी करियरला सुरूवात केली. तिचा अभिनय सर्वांनाच आवडला होता. पण ती जास्त काळ बॉलीवूडमध्ये टिकली नाही. तीही एका रॉयल कुटुंबातील आहे. तिचे वडील विजय सिंग राव माधवराव पटवर्धन हे राजा होते आणि त्यांच्या मुलीने चित्रपटात काम करणं त्यांना अजिबात पसंत नव्हतं. एवढंच नाहीतर भाग्यश्रीच्या लग्नाबाबतही त्यांनी विरोध दर्शवला होता.
रिया सेन आणि रायमा सेन
बॉलीवूड अभिनेत्री रिया सेन आणि रायमा सेन या दोघीही बहिणीसुद्धा रॉयल कुटुंबातील आहेत. या दोघी त्रिपुराच्या रॉयल फॅमिलीतील आहेत. त्यांची आजी इला देवी कूच बिहारची राजकुमारी होती. तर इला देवी यांची छोटी बहीण गायत्री देवी या जयपूरच्या महाराणी होत्या. तर रिया आणि रायमाची पणजी महाराजा सयाजीराव तिसरे यांची मुलगी होती.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा –
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje