बॉलीवूड

बॉलीवूडच्या ‘मास्टरजी’ सरोज खान यांचे निधन

Leenal Gawade  |  Jul 2, 2020
बॉलीवूडच्या ‘मास्टरजी’ सरोज खान यांचे निधन

बॉलीवूडला एका मागून एक दु:खद बातम्यांचा सामना करावा लागत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येतून बाहेर पडत नाही तोच आज सकाळी बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध कोरिओग्राफर अर्थात ‘मास्टरजी’ यांच्या निधनाची बातमी समोर आली.त्या 71 वर्षांच्या होत्या. सरोज खान यांना साधारण महिन्याभरापासून श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळेच त्यांना वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण अचानक गुरुवारी रात्री त्यांची परिस्थिती खालावली त्यांना तीव्र ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण बॉलीवूड हळहळले. जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी

रितेश आणि जेनेलियाचा आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय, सोशल मीडियावर केले शेअर

वयाच्या 13 व्या वर्षी झाले लग्न

Instagram

सरोज खान यांच्या आयुष्यातील स्ट्रगल तसा काही कमी नव्हता. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले आहेत. त्यांनी त्यांच्या नृत्याचे ट्रेनिंग बी सोहनलाल यांच्याकडून घेतले. डान्स शिकत असताना या दोघांची मनेही जुळली. त्यावेळी सोहनलाल हे 43 वर्षांचे होते आणि सरोज केवळ 13 वर्षांच्या. त्यांच्या लग्नाबाबत त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. त्यांना सोहनलाल विवाहित आहे हे माहीत नव्हते. सोहनलाल यांनी त्यांच्या गळ्यात काळा दोरा बांधत लग्न केले. सरोज खान यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मावेळी त्यांना ही गोष्ट कळली. आपल्या मुलांना सोहनलाल यांनी त्यांचे नाव लावण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्यात दुरावा आला. सरोज वेगळ्या राहू लागल्या. पण काही दिवसातच सोहनलाल यांचा ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्यासोबत राहण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी कुकु नावाची मुलगी झाली. त्या सोहनलाल यांच्या सोबत राहात असल्या तरी त्यांच्या मुलांचा सांभाळ त्यांनी एकट्याने केला. सोहनलाल यांच्या निधनानंतर त्यांनी मुलांची सर्वजबाबदारी पार पाडली.

सरोज नाही तर हे त्यांचे खरे नाव

सरोज खान या नावाने जरी त्या प्रसिद्ध असल्या तरी त्यांचे खरे नाव निर्मला नागपाल असे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव किशनचंद सिंह आणि आई नोनी सिंह. भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान सरोज खान यांचे संपूर्ण कुटुंब पाकिस्तानातून भारतात आले. सरोज खान यांनी त्यांच्या बॉलीवूडमधील करिअरची सुरुवात वयाच्या तिसऱ्या वर्षापासून केली. त्यांनी ‘नजराना’ नावाच्या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली. लग्न करण्यासाठी त्यांनी मुस्लिम धर्म स्विकारला.

अभिनेत्री अवनीत कौरची इमोशनल गुडबाय नोट, अलाद्दीन मालिकेतून घेतली एक्झिट

अशी झाली कोरिओग्राफीला सुरुवात

Instagram

सरोज खान यांनी सोहनलाल यांच्याकडून नृत्याचे धडे घेतल्यानंतर साहाय्यक नृत्य दिग्दर्शिक म्हणून काम केले. त्यानंतर स्वतंत्र स्वरुपात त्यांनी  ‘गीता मेरा नाम’(1974) या चित्रपटापासून कोरिओग्राफीला सुरुवात केली. त्यांना प्रकाशझोतात येण्यासाठी बराच वेळ लागला. ‘मिस्टर इंडिया’ (1987) या चित्रपटातील श्री देवी यांच्यावर चित्रित झालेल्या ‘हवा हवाई’ आणि ‘चांदनी’ या गाण्याने त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर ‘तेजाब’ या चित्रपटात माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित झालेल्या ‘एक दो तीन’ या गाण्याने त्यांना कोरिओग्राफीमध्ये उच्चांक पदाला नेवून ठेवले. माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित झालेल्या अनेक गाण्यांची कोरिओग्राफी त्यांनी केली आहे

Instagram

हळहळले बॉलीवूड

सरोज खान यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांना धक्का बसला आहे. त्यांनी सरोज खान वरील असलेले प्रेम आणि श्रद्धांजली सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

सरोज खान यांच्या जाण्याने बॉलीवूडला नक्कीच धक्का बसला आहे. पण त्यांना आत्म्यास शांती मिळोच हीच आम्हा सगळ्यांची इच्छा

सुशांत सिंह राजपूतचा हा फोटो तुम्हालाही करेल भावुक

Read More From बॉलीवूड