मनोरंजन

बॉलीवूड कपल्सचं जोरदार न्यू ईयर सेलिब्रेशन

Aaditi Datar  |  Jan 1, 2019
बॉलीवूड कपल्सचं जोरदार न्यू ईयर सेलिब्रेशन

 

2018 हे साल बॉलीवूड आणि इतर सेलिब्रिटीजच्या लग्नांनी गाजवल्यानंतर, बॉलीवूडमध्ये जोरदार प्रेमाचे वारे वाहात आहेत. याचाच अर्थ की, 2019 मध्येही बॉलीवूडमध्ये बरीच शुभमंगल होणार हे नक्की. जी बॉलीवूड कपल्स एरवी मीडियाला टाळतात त्यांनी न्यू ईयरच्या निमित्ताने आपणहून फोटोज पोस्ट केले आहेत.
रणबीर कपूर – आलिया भट्टच्या नात्यावर शिक्कामोर्तब?

आलिया भट्ट ही खास रणबीर आणि त्याच्या कुटुंबियांना भेटण्याकरता न्यूयॉर्कमध्ये दाखल झाली आणि न्यू ईयरच्या निमित्ताने कपूर कुटुंबियांबरोबर डीनर केला. या प्रसंगी हॅपी न्यू ईयर विश करताना अभिनेत्री नीतू कपूर यांनी हा खास फोटो इन्स्टावर शेअर केला. या फोटोत दिसत असल्याप्रमाणे आलिया आणि रणबीर एकमेकांच्या बाजूला बसले असून रणबीर बहीण रिधीमा कपूर साहनीही तिचा नवरा आणि मुलीसोबत दिसत आहे. आता हा परफेक्ट फॅमिली(?)फोटो बघितल्यावर रणबीर-आलियाच्या प्रेमावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हणायला हरकत नसावी.  

सध्या अभिनेते ऋषी कपूर कॅन्सरच्या उपचारासाठी न्यूयॉर्कमध्ये असल्याने त्यांचे कुटुंबियही तिकडे आहेत.   

तर दुसरीकडे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा फोटो ही अभिनेता संजय कपूरने फॅमिली फोटो म्हणून इ्न्स्टावर शेअर केला.

प्रियांका चोप्रा – निक जोनास आणि सासरच्या मंडळीबरोबर स्वित्झर्लंडमध्ये आहे. 

तर अनुष्का शर्मा-विराट कोहली यांना ऑस्ट्रेलियामध्ये न्यू ईयरचं स्वागत केलं.

दीपिका पदुकोण – रणवीर सिंह हे नवविवाहीत कपल ही त्यांच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून हनीमून आणि न्यू ईयर सेलिब्रेशन करता रवान झालं.

करीना कपूर आणि सैफ अली खानही सध्या क्यूट तैमूर अली खानबरोबर स्वित्झर्लंडमध्ये सुट्टया एन्जॉय करत आहेत. 

2018 प्रमाणेच 2019 मध्येही असेच प्रेमाचे वारे वाहोत आणि अनेक शुभमंगल पार पडोत. सर्वांना पुन्हा एकदा नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 

Read More From मनोरंजन