त्वचेची काळजी

प्रौढ व्यक्तींनी बेबी प्रॉडक्ट वापरणं योग्य की अयोग्य

Trupti Paradkar  |  Oct 23, 2020
प्रौढ व्यक्तींनी बेबी प्रॉडक्ट वापरणं योग्य की अयोग्य

कोरोनाच्या काळात सौंदर्यावर घरगुती प्रयोग करणं सर्वांचा नित्यक्रमच झाला आहे. आता घरात राहून लोकांना स्वयंपाकाप्रमाणेच निरनिराळे फेसपॅक तयार करता येऊ लागले आहेत. इंन्स्टाग्राम आणि युट्यूबवर पाहून असे नवनवीन प्रयोग करणं ही सध्या तर एक सोपी गोष्ट झाली आहे. युट्यूबवर अनेक लोक आपलं कौशल्य पणाला लावून अशा ब्युटी टिप्स देत असतात. आजकाल युट्यूबवरील या ब्युटी ट्युटोरिअल्सवर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे हे युट्यूबर घरीच असलेले प्रॉडक्ट वापरून सुंदर कसं दिसायचं हे शिकवतात. यासाठी बऱ्याचदा काही लोक बेबी प्रॉडक्टचा वापर करतानाही आढळतात. जसं की बेबी ऑईल, बेबी पावडर, बेबी क्रिम आणि बेबी वाईप्स. हे पाहुन तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल असं मोठ्यांनी बेबी प्रॉडक्ट वापरणं योग्य आहे की अयोग्य… म्हणूनच त्वचेची निगा राखण्यासाठी ही माहिती अवश्य वाचा.

Shutterstock

मोठ्यांनी बेबी प्रॉडक्ट वापरावे योग्य आहे का

बेबी प्रॉडक्टचा वापर मोठ्यांनी करावा की नाही याबाबत अनेक समज आहेत. मात्र या बेबी प्रॉडक्टचा तुमच्या त्वचेवर नेमका काय परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का 

बेबी प्रॉडक्ट मोठ्यांच्या त्वचेसाठी सुरक्षित असतात

बेबी प्रॉडक्ट हे लहान मुलांच्या नाजूक त्वचेचा विचार करूनच तयार केलेले असतात. त्यामुळे ते मोठ्यांनी वापरणे नक्कीच सुरक्षित असते. ज्या लोकांची त्वचा फार संवेदनशील आहे अशांनी बेबी प्रॉडक्ट वापरण्यास काहीच हरकत नाही. जर बेबी प्रॉडक्ट नियमित आणि सातत्याने वापरले तर त्याचा चांगला परिणाम तुमच्या त्वचेवर दिसू शकतो. बेबी प्रॉडक्ट वापरण्यामुळे तुमची त्वचा मॉईस्चराईझ, हायड्रेट आणि मऊ राहते.

Shutterstock

बेबी प्रॉडक्टमध्ये कृत्रिम घटक नसतात

लहान बाळांच्या त्वचेवर दुष्परिणाम होऊ नयेत यासाठी बेबी प्रॉडक्टमध्ये नैसर्गिक आणि उपयुक्त घटक वापरले जातात. बेबी प्रॉडक्टमध्ये कृत्रिम रंग, केमिकल्स नसल्यामुळे ते तुमच्या त्वचेवर दुष्परिणाम करत नाहीत. जर तुम्हाला स्किन केअर प्रॉडक्टची अॅलर्जी असेल तर तुम्ही बिनधास्त बेबी स्किन केअर प्रॉडक्ट वापरू शकता. 

बेबी प्रॉडक्टचा वापर तुम्ही निरनिराळ्या पद्धतीने करू शकता

बेबी प्रॉडक्टचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ते अत्यंत सॉफ्ट असतात. ज्यामुळे मोठ्यांच्या त्वचेसाठी तुम्ही त्यांचा वापर निरनिराळ्या पद्धतीने करू शकता. जसं की बेबी ऑईल तुम्ही त्वचेला मसाज करण्यासाठी, मेकअप काढण्यासाठी, त्वचा हायलाईट करण्ययासाठी करू शकता. अशाच प्रकारे बेबी क्रीम, पावडर यांचा वापर तुम्ही तुमच्या  त्वचेवर निरनिराळ्या पद्धतीने केला तरी तुमच्या त्वचेचं  नुकसान होत नाही. थोडक्यात बेबी प्रॉडक्ट मोठ्यांसाठी वापरणं यात काहीच चुकीचं नाही. शिवाय ते कोणत्याही त्वचेच्या प्रकारावर सूट होतात आणि जास्त खर्चिकदेखील नसतात. तुम्हाला खात्री वाटत नसेल तर तुम्ही बेबी प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी  पॅच टेस्ट घेऊ शकता. जर जळजळ अथवा दाह झाला तर साध्या पाण्याने त्वचा धुवून टाका. पण आम्हाला खात्री आहे असं काहीच होणार नाही आणि तुम्ही तुमच्या स्किन केअर रूटिनमध्ये बेबी प्रॉडक्टचा नक्कीच समावेश कराल. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

फाऊंडेशन आणि कन्सिलरची शेड निवडताना काय घ्यावी काळजी

खरेदी करत असलेले मेकअप उत्पादन बनावट तर नाही, कसे ओळखावे

या फेस्टिव्ह सीझनसाठी आयशॅडोचा गोल्डन रंग आहे पुरेसा, असा करा वापर

Read More From त्वचेची काळजी