त्वचेची काळजी

तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे खरंच येतात का पिंपल्स, जाणून घ्या सत्य

Leenal Gawade  |  Sep 24, 2021
पिंपल्स आणि तेलकट पदार्थ

त्वचेबद्दल फारच आग्रही असलेल्यांसाठी आज आमच्याकजे आहे अशी माहिती जी ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल. पण प्रत्येकीसाठी हे जाणून घेणे फारच गरजेचे आहे. असे म्हणतात चांगला आहार घेतला तर त्वचा चांगली राहते, आहारात रक्ताचा पुरवठा करणारे घटक वाढले की, त्वचा चांगली राहते. भरपूर फायबरयुक्त पदार्थ खाल्ले की त्वचा चांगली राहते. असे आपण अनेकदा ऐकतो. आरोग्य आणि त्वचेवर पिंपल्स आणण्यासाठी आपण खात असलेले तेलकट पदार्थ नक्कीच कारणीभूत असतात का ? चला जाणून घेऊया काय आहे यामागील सत्य

रात्रीच्या जेवणात हे पदार्थ खाल तर व्हाल लठ्ठ

तेलकट पदार्थांमुळे येतात का पिंपल्स?

नाही, तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे पिंपल्स येत नाहीत असे डॉक्टरदेखील सांगतात.  असे सांगितले जाते की, तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे तुम्हाला पिंपल्स येतात. त्यामुळे शरीरात अधिक प्रमाणात तेल जाते. तेलाच्या अति सेवनामुळे त्वचेवरील पोअर्समध्ये तेल जाते आणि त्यामुळे त्वचेवर पिंपल्स येतात. असे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात पिंपल्स आणि तेलकट पदार्थ यांचा कोणताही संबंध नाही.  तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे पोटात अनहेल्दी पदार्थ जातात. जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक किंवा कोणत्याही प्रकारच्या फायद्याच्या नसतात. त्यामुळे तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे पिंपल्स मुळीच येत नाही.

पिंपल्स येण्याची खरी कारणे

Instagram

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तुमच्या त्वचेवर पिंपल्स येण्याची कारणे ही तेलकट पदार्थ नाहीत तर वेगळी आहेत.  डॉक्टर नेमकं पिंपल्स येण्याची कोणती कारणे सांगतात ते जाणून घेऊया. 

  1. स्वच्छता ही पिंपल्ससाठी कारणीभूत ठरते. जर तुम्ही त्वचेची स्वच्छता राखत नसाल तर तुम्हाला अगदी हमखास पिंपल्स येऊ शकतात. 
  2. हार्मोन्समध्ये होणारे बदल हे देखील पिंपल्ससाठी कारणीभूत ठरतात. जर शरीरात जरासा बदल झाला तरी देखील तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात.
  3. फायबर युक्त पदार्थांचे सेवन योग्य प्रमाणात नसेल तर पिंपल्स येऊ शकतात 
  4. पिरेड्सच्या तारखा मागे पुढे झाल्या तरी देखील पिंपल्स किंवा त्वचेवर पुरळ येऊ शकतात.
  5. जर तुम्ही एखाद्या औषधांचे सेवन करत असाल तर तुम्हाला त्याच्या उष्णतेमुळे पिंपल्स येण्यास कारणीभूत ठरते. 
  6. जर तुम्ही कोणत्या ताणतणावखाली असाल तरी देखील तुम्हाला पिंपल्स येण्याची शक्यता असते. 

 सर्वसाधारणपणे ही काही कारणे पिंपल्स येण्यामागे सांगितली जातात. 

अशी घ्या काळजी

तुम्हाला पिंपल्स येण्याचा त्रास सतत होत असेल तर तुम्ही त्वचेची योग्य काळजी घ्यायला हवी.

तुम्हाला सतत पिंपल्स येत असेल तर तुम्ही  काही चाचण्या करुन घ्यायला हव्यात. तुम्हाला नेमके पिपंल्स  हार्मोन्समुळे येत असतील तर त्याबद्दलही योग्य माहिती तुम्हाला असायला हवी. 

आता तेलकट पदार्थांमुळे तुम्हाला नक्कीच पिंपल्स येते का हे वाचून तुम्ही माहिती शेअर करा.

चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी करण्यासाठी वापरा देशी शुद्ध तूप

Read More From त्वचेची काळजी