बाळाचा जन्म झाल्यावर बाळाला स्तनपान देताना पहिले काही दिवस त्रास होणे ही एक सामान्य बाब आहे. कधी कधी स्तनाचा संसर्ग देखील होतो ज्यासाठी त्वरित आणि योग्य उपचार आवश्यक आहेत. कारण स्तनदाह किंवा Mastitis होणे ही सामान्य बाब नाही. या स्थितीत स्तनांवर सूज येऊ शकते, स्तनांचा दाह होतो किंवा ते दुखतात आणि तो बॅक्टेरियाचा संसर्ग असू शकतो. यावर वेळेत योग्य उपचार झाले नाही स्तनदाहामुळे स्तनपान थांबू शकते. तसेच स्तनांमध्ये पस होऊ शकतो. जसे बाळासाठी स्तनपान आवश्यक आहे तसेच आईलाही स्तनपान फायदेशीर आहे. यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो. त्यामुळे स्तनदाह यांसारख्या अडचणींवर मात करण्यासाठी आईला मदत करणे आणि स्तनपान चालू ठेवणे महत्त्वाचे आहे.
स्तनदाह किंवा Mastitis म्हणजे काय
स्तनदाह किंवा Mastitis मध्ये स्तनाच्या ऊतींना सूज येते. तसेच स्तनाच्या टिश्यूजना कधीकधी संसर्ग होतो. संसर्ग झाल्यामुळे स्तन दुखणे, सूज येणे, स्तनांचे तापमान वाढणे आणि लालसरपणा येणे ही लक्षणे जाणवतात. जर स्तनांना संसर्ग झाला असेल तुम्हाला थंडी वाजून ताप येऊ शकतो. स्तनदाह बहुतांश वेळेला स्तनपान करणार्या स्त्रियांनाच होतो पण स्तनपान न करणाऱ्या महिलांना देखील स्तनदाहाचा त्रास होऊ शकतो.
बाळाला स्तनपान देताना स्तनदाहाचा त्रास होत असेल तर तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. तसेच या त्रासामुळे बाळाची काळजी घेणेही कठीण होते. काहीवेळा स्तनदाहामुळे आईला इच्छा नसतानाही बाळाचे स्तनपान सोडवावे लागते. म्हणूनच स्तनदाहावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. स्तनदाहावर उपचार करण्यासाठी अँटीबायोटिक घेत असताना स्तनपान थांबवण्याची गरज नसते. तेव्हाही स्तनपान देणे सुरू ठेवणे आईसाठी आणि बाळासाठी चांगले आहे. त्याने सामान्यपणे बाळाला त्रास होत नाही.
अधिक वाचा – जाणून घ्या स्तनपान देणाऱ्या नवमातांनी कोणती फळे खावी
स्तनदाह होण्याची कारणे
जेव्हा स्तनांमध्ये जास्त प्रमाणात दूध निर्माण होते आणि बाळ तेवढे दूध पीत नसेल किंवा बाळाने बराच काळ स्तनपान केले नाही तर स्तनांमध्ये दूध साचून राहते व त्याने स्तनदाहाचा धोका निर्माण होतो. तसेच स्तनपान करताना बाळाने कमी दूध प्यायले तर स्तन पूर्णपणे रिकामे होत नाही आणि त्यामुळे दुधाची एखादी नलिका (मिल्क डक्ट) बंद होऊ शकते. त्याठिकाणी ब्लॉकेज तयार होते व ब्लॉकेजमुळे दुध साचून राहते. यामुळे स्तनाचा संसर्ग होतो. तुमच्या त्वचेच्या पृष्ठभागावरील आणि बाळाच्या तोंडातील बॅक्टेरिया तुमच्या स्तनाग्रांच्या त्वचेतील क्रॅकद्वारे किंवा दुधाच्या नलिका उघडताना दुधाच्या नलिकांमध्ये प्रवेश करू शकतात. ब्लॉकेज मध्ये साचून राहिलेले हे दूध मग बॅक्टेरियांना प्रजननासाठी जागा प्रदान करते. आणि स्तनांना बॅक्टरीयाचा संसर्ग होतो व स्तनदाहाचा त्रास होतो.
स्तनदाहाची लक्षणे
- स्तन नाजूक होतात. धक्का लागला की त्रास होतो.
- स्तनांचे तापमान वाढते. तिथे स्पर्श केल्यास ताप आल्यासारखे गरम लागते.
- स्तनांना सूज येते.
- स्तनाचे टिश्यू जाड होतात.
- कधी कधी स्तनांमध्ये गाठी निर्माण होतात.
- सतत किंवा बाळ स्तनपान करत असेल तेव्हा वेदना किंवा जळजळ होते.
- तिथली त्वचा नाजूक व लालसर होते.
- साधारणपणे आजारी असल्यासारखे वाटते.
- 101 F किंवा त्याहून जास्त ताप येतो.
ही लक्षणे स्तनदाह झाला असेल तर जाणवतात. त्यामुळे ही लक्षणे जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांना संपर्क करा. कारण हे वाढले तर त्याचा गंभीर त्रास होऊ शकतो.
फोटो क्रेडिट – istockphoto
अधिक वाचा – प्रत्येक होणाऱ्या आईला माहीत असावेत ‘हे’ ब्रेस्टफिडींग सिक्रेट्स
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक