मनोरंजन

Love is in the air: चारू आणि राजीव पुन्हा एकत्र, प्रेमाच्या वर्षावाचे व्हिडिओ व्हायरल

Dipali Naphade  |  Sep 7, 2020
Love is in the air: चारू आणि राजीव पुन्हा एकत्र, प्रेमाच्या वर्षावाचे व्हिडिओ व्हायरल

गेल्या काही महिन्यांपासून दुरावा आलेले राजीव सेन आणि चारू असोपा पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. हे पाहून त्यांच्या चाहत्यांनाही खूपच आनंद झाल्याचे सोशल मीडियावर दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्येही दुरावा आल्याचे म्हटले जात होते. इतकंच नाही तर चारूने आपल्या सोशल मीडियावरूनही राजीववर नाराज असल्याचे सांगितले होतं. या काळात आपल्याला एकटीला सोडून राजीव दिल्लीला का गेला आहे आणि आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होत असल्याचेही तिने म्हटले होते. मात्र आता शेवटी पुन्हा एकदा राजीव सेन आणि चारू असोपा हे एकत्र आल्याचे दिसून येत असून दोघांचाही एकमेकांच्या मिठीतील आणि प्रेमाचा वर्षाव करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अरिजित सिंगच्या ‘सुकून मिला’ या गाण्यावर चारूने स्वतः हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

कॅन्सरवरील उपचार चालू असूनही संजय दत्त पूर्ण करणार ‘शमशेरा’चे चित्रीकरण

अखेर लव्हबर्ड्स आले एकत्र

कोणत्याही प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी एकमेकांच्या बरोबर असणं ही अत्यंत आनंदाची बाब असते आणि त्यापेक्षा जास्त काहीच नको असतं. अशीच काहीशी भावना चारू असोपाचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून चारू आणि तिचा पती राजीव सेन (सुष्मिता सेनचा भाऊ) हे एकमेकांपासून दूर होते. त्यामुळे आता जवळजवळ पाच महिन्यांनी राजीवची भेट झाल्यानंतर चारूच्या चेहऱ्यावरील ओसंडून जाणारा आनंद बघून त्यांचे चाहतेही खूष झाले आहेत. चारू आणि राजीव यांनी पुन्हा एकत्र यावं यासाठी अनेक चाहते सोशल मीडियावरही मेसेज करत होते. शेवटी या दोघांमधील भांडण संपून हे लव्हबर्ड्स पुन्हा एकत्र आल्याचे दिसून येत आहे. आपल्यातील असलेला दुरावा दोघांनीही सोशल मीडियाद्वारे सांगितला होता. मात्र आता पुन्हा एकदा हे दोघे एकत्र आल्याचेही सोशल मीडियावर सांगितले आहे. जे झालं ते झालं या उक्तीनुसार एका मुलाखतीमध्ये चारूने सांगितले की, ‘आम्ही एकमेकांशी खूप स्पष्टपणे बोललो आणि अशी परिस्थिती उद्भवली तर नक्की काय करायचं आणि काय नाही करायचं हेदेखील एकमेकांना सांगितलं. मी तर राजीवकडून पत्रावर सही करून घेतली आहे. तो कधीही मला सोडून जाणार नाही यासाठी त्याने सही केली आहे आणि ते पत्र मी माझ्याकडे सुरक्षित ठेवलं आहे.’ चारूने अत्यानंदाने हे सांगितले. तर राजीवनेही आपली बाजू मांडली, ‘जेव्हा तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम करता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसाठी गुंता सोडवायचा नक्कीच प्रयत्न करता. माझं चारूवर अत्यंत मनापासून प्रेम आहे आणि म्हणूनच मी माझ्या पत्नीजवळ परत आलोय. कोणत्याही परिस्थिती अथवा संकटामध्ये खरे प्रेम हे नेहमी जिंकतेच.’ 

बॉलीवूड कलाकार ज्यांचे परदेशातही आहे स्वतःचे घर

काही दिवसांपूर्वीच राजीवने चारूच्या फोटोवरही केली होती कमेंट

वास्तविक चारू सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर आपले फोटो चारू नेहमीच शेअर करत असते आणि नेहमीच आपल्या भावना शायरीच्या माध्यमातून मांडत असते. नुकतेच चारूने दोन हॉट फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आणि ‘खैरीयत नहीं पूछते मेरी, मगर खबर रखते हैं, मैंने सुना है की वो मुझ पर नजर रखते है’ अशी कॅप्शन दिली. चारूने पोस्ट केलेल्या या फोटोवर राजीव कमेंट करण्यास स्वतःला रोखू शकला नाही. आपल्या बायकोच्या फोटोवर कमेंट करताना राजीवने लिहिले, ‘काय करणार तुझ्याबद्दल जाणून तर घ्यावंच लागणार, इतकी चंचल आहेस तू चारू असोपा’. या राजीवच्या कमेंटवर चारूनेही रिप्लाय देत दोघांमधील दुरावा हळूहळू कमी होत चालला असल्याची जाणीव करून दिली आहे. चारू यावर म्हणाली, ‘जाणून घेणं नक्कीच चांगली गोष्ट आहे मिस्टर ब्योमकेश बक्षी…पण कधीतरी काळजी पण करत जा’. आता पुन्हा या दोघांमध्ये दुरावा येऊ नये अशीच प्रार्थना त्यांचे चाहते आणि कुटुंबीयदेखील करत आहे. 

‘या’ कपलमधील दुरावा होतोय कमी, सोशल मीडियावर एकमेकांना रिप्लाय

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

Read More From मनोरंजन