त्वचेची काळजी

अभिनेत्री दीपिका कक्कड शिजलेल्या भाताने करते फेशिअल, जाणून घ्या पद्धत

Trupti Paradkar  |  Oct 29, 2020
अभिनेत्री दीपिका कक्कड शिजलेल्या भाताने करते फेशिअल, जाणून घ्या पद्धत

नितळ आणि सुंदर त्वचेसाठी महिला अनेक ब्युटी ट्रिटमेंट करत असतात. पार्लर आणि स्पामध्ये यासाठी महागडे आणि विविध प्रकारचे फेशिअल ट्रिटमेंट उपलब्ध असतात. मात्र बऱ्याचदा आपल्या घरातच अशा अनेक वस्तू आणि पदार्थ असतात ज्यांचा वापर आपण आपली त्वचा चमकदार करण्यासाठी वापर करू शकतो. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री दीपिका कक्कडनेही असाच एक घरगुती उपाय चाहत्यांसोबत शेअर केला होता. दीपिका तिच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी घरी शिजलेल्या तांदूळ म्हणजेच भातापासून फेशिअल करते. दीपिकाला या भातापासून तयार केलेल्या फेसपॅकचा खूप चांगला फायदा होतो. यासाठीच जाणून घेऊया हा फेसपॅक नेमका कसा तयार करायचा आणि त्याचा त्वचेवर काय परिणाम होतो.

Instagram

शिजलेल्या तांदळापासून असा तयार करा फेसपॅक –

फेशिअल घरीच करण्यासाठी चेहरा व्यवस्थित क्लिन आणि स्क्रब करणं गरजेचं आहे. यासाठी फेसपॅक चेहऱ्यावर लावण्याआधी या दोन्ही स्टेप करून घ्या. या दोन्ही स्टेपसाठी तुम्ही तुमच्या घरातील नैसर्गिक वस्तू जसं की कच्चं दूध, गुलाबपाणी, लिंबू, साखर, मध, तांदळाची पिठी यांचा वापर करू शकता. क्लिंझिंग आणि स्क्रबिंग केल्यावर चेबरा स्वच्छ करण्यासाठी तांदूळ धुतलेले पाणी वापरा.  चेहरा पूर्ण क्लिन केल्यावर त्यावर भाताने तयार केलेला हा फेसपॅक लावा. 

फेसपॅक साठी लागणारे साहित्य –

फेसपॅक तयार करण्याची कृती –

फेसपॅक लावण्याची पद्धत –

फेशिअल करताना क्लिंझिंग आणि स्क्रबिंग केल्यावर चेहरा स्वच्छ करा आणि चेहरा आणि मानेवर भाताचा हा फेसपॅक लावा. तीन ते पस्तीस मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. मास्क काढण्यासाठी तुम्ही तांदूळ धुतलेले पाणी वापरू शकता. सर्वात शेवटी चेहरा स्वच्छ करण्यासाठी साध्या पाण्याचा वापर करा. 

Instagram

भाताचा फेसपॅक लावण्याचे फायदे –

भाताच्या फेसपॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरील धुळ, प्रदूषण, मेकअपचे साहित्य, डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ आणि तजेलदार दिसू लागेल. या पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरील टॅनिंग आणि काळपटपणा कमी होऊन चेहरा चमकदार दिसू लागेल. जर तुमच्याकडे शिजलेला भात नसेल तर तुम्ही तांदळाचे पीठदेखील वापरू शकता. तेलकट त्वचेवर भाताचा अथवा तांदळाच्या पीठाचा फेसपॅक लावण्यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाते.  तांदळामध्ये तुमच्या त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेण्याची क्षमता असते. शिवाय यामुळे त्वचेला घट्टपणा मिळतो. ज्यामुळे सैल त्वचा पूर्ववत होते आणि सुरकुत्या, फाईन लाईन्स कमी होतात. चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी तिशी अथवा पस्तिशीच्या महिलांनी हा उपाय नियमित केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. भाताने फेशिअल करण्यासाठी तुम्ही तांदूळ धुतलेले पाणी, शिजलेला भात, शिजलेल्या भातातील पाणी आणि तांदळाचे पीठ अशा सर्व वस्तूंचा वापर करू शकता. तेव्हा हा उपाय करा आणि तुम्हाला त्याचा काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट मध्ये कळवा. 

Shutterstock

सणासुदीला असं फेशिअल करून तयार झाल्यावर मेकअपसाठी मायग्लॅमचे प्रॉडक्ट वापरायलाच हवेत. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

थकलेला चेहरा बनवा 5 मिनिट्समध्ये तजेलदार, वापरा या टिप्स

DIY : मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी लागणारं सोल्युशन असं करा स्वतःच तयार

फाऊंडेशन आणि कन्सिलरची शेड निवडताना काय घ्यावी काळजी

Read More From त्वचेची काळजी