टीव्ही अभिनेत्री आणि युट्युबर छवी मित्तलने (Chhavi Mittal) आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer) झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. पण सुरूवातीच्या दिवसातच हे कळल्यामुळे त्यावर उपचार करता येतील याबाबत छवी सकारात्मक आहे. 41 वर्षीय टीव्ही अभिनेत्री छवी मित्तलने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या या आजाराबाबत भावनिक पोस्ट केली आहे. तिच्या या आजाराबाबत कळल्यानंतर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
छवी झाली व्यक्त
छवीने आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग) झाल्याचे कळल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, ‘गेल्या काही दिवसांपासून मी खूप रडले आहे पण आता मात्र हे आनंदाचे अश्रू आहेत. मागच्या 24 तासांपासून मला खूप मेसेज आणि इच्छा येत आहेत आणि येतच आहेत आणि सर्वांचेच असे म्हणणे आहे की, मी एक भक्कम, सुपरवूमन, प्रेरणात्मक, लढाऊ आणि अशी अनेक विशेषणे देत असणारी महिला आहे. अनेकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आहे. अनेक धर्माच्या व्यक्ती ज्या नमाज करत आहेत, शंकराची प्रार्थना करत आहे अथवा आपल्या आराध्याकडे प्रार्थना करत आहेत. लोक मला वेगवेगळ्या थेरपी, पुस्तके, गट इत्यादी मला प्रेरणात्मक गोष्टींबाबत सांगत आहेत. त्यांच्या ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रवासाबाबत सांगत आहेत. हे सर्व पाहून मला भावनिक व्हायला झालं आहे आणि सर्वांच्या पाठिंब्यासाठी मी खूपच आनंदी आहे’ छवीला अचानक याबाबत माहीत झाल्यामुळे तिला पहिले तर यातून बाहेर पडायला वेळ लागला. पण आता छवी या आजाराशी दोन हात करण्यास सज्ज झाली आहे.
कसे कळले कॅन्सरबाबत
छवीला कॅन्सर झाला आहे हे कसे कळले असा प्रश्न विचारला असता ती म्हणाली की, कदाचित देवाचा तिला आशीर्वाद आहे, कारण अगदी योगायोगाने कॅन्सरच्या बाबतीत मला कळले. तिने सांगितले की, ‘मी स्वतःला खूपच नशीबवान समजते कारण मला अगदी पहिल्या स्टेजलाच याबाबत कळले. मी डॉक्टरांकडे जीममध्ये छातीला लागल्यामुळे दाखवायला गेले होते आणि त्याचवेळी स्तनांमध्ये गाठ सापडली. याबाबत अधिक परीक्षण केल्यानंतर रिझल्ट पॉझिटिव्ह आला. मी सगळ्यांना सांगू शकते की माझ्या जिमिंगच्या सवयीमुळे मला हे लवकर कळले. तर कॅन्सर रूग्णांना कमीत कमी सहा महिन्यांसाठी PET स्कॅन करून घेत राहिली पाहिजे. स्वतःला कॅन्सरपासून वाचविण्यासाठी नियमित स्वरूपात स्वपरीक्षण करत राहायला हवे आणि तुम्हाला गाठ जाणवली तर अजिबातच दुर्लक्ष करू नका.’
यापूर्वी एका पोस्टमध्ये अभिनेत्रीने आपल्या ब्रेस्ट कॅन्सरबाबत पहिली रिअॅक्शन दिली होती आणि सांगितले की, मला एक समस्या आहे आणि सध्या त्यावर उपाय शोधण्याचे काम चालू आहे. अनेक चाहत्यांप्रमाणे छवी लवकरच बरी व्हावे यासाठी आम्हीही प्रार्थना करत आहोत आणि कॅन्सरला लढा देण्यासाठी तिला बळ मिळू दे अशीच इच्छा आहे. छवीला लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी तिचे चाहते तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कमेंट्स करत आहेत.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade