बॉलीवूड

साठच्या दशकात या जुन्या अभिनेत्रींनी सिल्व्हर स्क्रिनवर बिकिनी घालून तोडले नियम

Dipali Naphade  |  Apr 20, 2020
साठच्या दशकात या जुन्या अभिनेत्रींनी सिल्व्हर स्क्रिनवर बिकिनी घालून तोडले नियम

पन्नास आणि साठच्या दशकात चित्रपटात मुलींनी काम करणं हेदेखील तसं खास मानलं जात नसे. मात्र पन्नास आणि साठचे दशक हे  भारतीय सिनेमामधील क्लासिक दशक मानण्यात येते. या दरम्यान अनेक कौटुंबिक आणि सामाजिक चित्रपट निर्माण केले जात होते. यामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री या बोल्ड नसून अगदी साध्या सुध्या, साडीमध्ये असणाऱ्या, भारतीय आदर्श महिला अशाच दाखवण्यात येत होत्या. त्यावेळी स्लिव्हलेस कपडे, शॉर्ट स्कर्ट घालणं हेदेखील बोल्ड मानण्यात येत होते. पण त्यावर अशा काही अभिनेत्री होत्या ज्यांनी हे सर्व नियम तोडून आपल्या अभिनयाने, सौंदर्याने आणि अगदी आपल्या बोल्ड अवतारानेही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. त्यावेळी सिल्व्हर स्क्रिनवर बिकिनी घालून या अभिनेत्रींनी अक्षरशः प्रेक्षकांची झोप उडवली होती. कोण होत्या अशा अभिनेत्री जाणून घेऊया. 

नर्गिस दत्त

राज कपूर आणि नर्गिस ही त्यावेळची सर्वात लोकप्रिय जोडी. दोघांची अफलातून केमिस्ट्री ही आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. नर्गिस ही अत्यंत प्रभावी कलाकार होती आणि राज कपूरबरोबर तिची केमिस्ट्री आजतायगायत विसरली जात नाही. आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जादूसह नर्गिसने ‘आवारा’ या चित्रपटात राज कपूरसह बिकिनीमध्ये केलेला वावर हा आजही न विसरता येण्याजोगा विषय आहे. त्यावेळी बिकिनी घालणे म्हणजे अतिशय बोल्डपणाचे लक्षण होते आणि नर्गिसने हे काम अगदी कोणतीही लाज न बाळगता केले. मात्र त्यामध्ये कोणताही व्हल्गरपणा कधीही दिसून आला नाही हे नर्गिसच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे श्रेय म्हणावे लागेल. 

नूतन

अभिनेत्री शोभना समर्थचा संपूर्ण परिवारच या चित्रपटसृष्टीमध्ये दिसून आला. स्वतः शोभना समर्थ या त्याकाळच्या बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या दोन्ही मुलींनी बॉलीवूडवर राज्य केलं.  त्यापैकी मोठी मुलगी नूतनने तर प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं. नूतनच्या चेहऱ्यावरील निरागसपणा हेच तिचं वैशिष्ट्य होतं. नूतननेदेखील बिकिनी घातली होती हे फारच कमी लोकांना माहीत आहे. ‘दिल्ली का ठग’ या चित्रपटात नूतने बिकिनी घालून आपला बोल्ड  अंदाज दाखवून दिला होता. 

टीव्हीवरील या जोड्यांनी केले लपूनछपून लग्न, चाहत्यांना दिला धक्का

तनुजा

तनुजा ही सुरुवातीपासूनच बोल्ड होती. शिवाय तनुजा अतिशय बडबडी आणि सर्वांमध्ये मिसळणारी अशी अभिनेत्री असल्याचं म्हटलं जातं. तनुजाने अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिले असून तिनेही बिकिनी अवतार प्रेक्षकांना दाखवला होता. तनुजा अगदी बिनधास्तपणे बिकिनीमध्ये वावरल्याचे दिसून येत आहे. 

ट्रक ड्रायव्हर्समध्ये आजही प्रसिद्ध आहेत ही अजय देवगणची गाणी

नलिनी जयवंत

नूतन आणि तनुजाची मावशी असणारी नलिनी जयवंतनेही त्यावेळी बिकिनी घालून प्रेक्षकांमध्ये हाहाःकार माजवला होता. नलिनी जयवंत आपल्या अभिनयासह सौंदर्यासाठीही तितकीच प्रसिद्ध होती. साठच्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून नलिनी जयवंतचे नाव प्रसिद्ध होते. ‘संग्राम’ चित्रपटात अशोक कुमारला सिड्युस करताना नलिनी जयवंतने बिकिनी घातली होती. 

रामायणातील क्लायमॅक्स सीन पाहून चाहते का झाले निराश

शर्मिला टागोर

शर्मिला टागोर ही त्या काळातील सर्वात स्टायलिश अभिनेत्री मानण्यात येत होती. आपल्या खासगी आयुष्यातही शर्मिला टागोर तितकीच स्टायलिश होती. आपली अदा, सौंदर्य आणि भारतीय महिलेच्या स्वरूपात शर्मिलाने एक वेगळीच ओळख मिळवली होती. मात्र ‘इव्हिनिंग  इन पॅरिस’ या चित्रपटात शर्मिला टागोरने बिकिनी घालूनच नाही तर पहिल्यांदाच डबल रोल करत नकारात्मक भूमिका करत प्रेक्षकांना धक्का दिला होता. तसंच शम्मी कपूरसह आसमान से आया फरिश्ता या गाण्यात शर्मिला टागोर बिकिनी घालूनही एखाद्या बाहुलीसारखी दिसत होती. तिच्या  फिगरला बिकिनी सूट होत होती. 

Read More From बॉलीवूड