धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे (Dharmveer Mukkam Post Thane) हा चित्रपट सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. शिवसेनेचे लोकप्रिय नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपट आवडल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य प्रेक्षकांकडून येतच आहेत, अशातच आता एक विशेष प्रतिक्रिया आली आहे ज्यामुळे चित्रपटाच्या टीमचा उत्साह दुणावला आहे. सध्या प्रसाद ओकची (Prasad Oak) मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट गाजत आहे. प्रसादच्या कामाचे अनेकांनी कौतुक केले असून प्रसाद ओकसाठी ही अप्रतिम संधी आहे असंही म्हटलं जात आहे. नुकताच प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’देखील (Chandramukhi) जगभर गाजत आहे. तर आता आनंद दिघेच्या भूमिकेनंतर प्रसाद ओकची पाक चक्क महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही थोपटली आहे.
उद्धव ठाकरेंनी केले भरभरून कौतुक
राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी नुकताच हा चित्रपट पाहिला आणि आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली आहे. हा चित्रपट बघितल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वसामान्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने ‘आनंद’ घेऊन येणारे व्यक्तिमत्व म्हणजे आनंद दिघे ! गुरुप्रति, पक्षाप्रति निष्ठा म्हणजे आनंद दिघे ! गुंडावरती वचक, दरारा म्हणजे आनंद दिघे. त्यांच्या या कर्तृत्वामुळेच प्रत्येक शहरात एक आनंद दिघे असावा असं मनोमन वाटत आहे. हा चित्रपट बघून मी अतिशय भारावून गेलो आहे. प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा, त्यांच्या लकबी, बारीक सारीक गोष्टी एवढ्या उत्तमरीत्या साकारल्या आहेत की पडद्यावर चित्रपट बघतोय असं वाटतच नाही. प्रसाद यांनी आपल्या भूमिकेतून आनंद दिघे यांना जणू काही पुन्हा एकदा जिवंत केलं आहे. आनंद दिघे यांचं शिवसेनेवर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर असणारं प्रेम, या दोन्हीप्रति असणारी निष्ठा, त्या दोघांचं गुरुशिष्याचं नातं हे सगळं मी जवळून बघितलं आहे, अनुभवलं आहे. चित्रपटात या सर्व गोष्टी प्रभावीपणे मांडल्या आहेत.” आजच्या पिढीला आनंद दिघे कळण्यासाठी सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
तब्बल 9.08 कोटी कमाई
मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजची (Zee Studios निर्मिती असलेल्या, प्रविण तरडे (Pravin Tarade) लिखित दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल 9.08 कोटी कमाई केली आहे. धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल दोन कोटी पाच लाखाची घसघशीत कमाई करत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
तब्बल चारशेहून अधिक चित्रपटगृहे आणि 10 हजारांहून अधिक शोज्सह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि प्रेक्षकांनी त्याचे दमदार स्वागत केले आहे. ठाण्यात तर काही थिएटर्सबाहेरील त्यांच्या कटआऊटचा दुग्धाभिषेक केला तर काही ठिकाणी प्रेक्षक बँड बाजा घेऊन वाजत, गाजत, नाचत पोहचले. आपल्या लोककारणी नेत्याला चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर बघायला प्रेक्षक आतुर होते. चित्रपट बघून अनेकजण भावूकही झाले. अभिनेते प्रसाद ओक यांनी साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली. प्रविण तरडे यांच्या लेखणीने सज्ज या चित्रपटातील आनंद दिघे यांच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्या शिट्यांचा प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. विविध थिएटर्समध्ये जणू उत्साहाने भरलेलं उत्सवी वातावरण बघायला मिळालं आहे. दुसरीकडे सिने समीक्षकांचाही अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद मिळाला आहे. अनेक मान्यवर समीक्षकांनी 4 स्टार अशी रेटिंग देऊन चित्रपटाच्या दर्जेदारपणावर शिक्कामोर्तब केलंय. मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या काही दिवसांत लोकप्रियतेचे आणि कमाईचे नवे शिखर गाठेल असा अंदाज सिनेतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade