बॉलीवूड

लग्नाच्या काही दिवसानंतर कॉमेडियनला जाणवले लग्नाचे साईड इफेक्टस, व्हिडिओ व्हायरल

Leenal Gawade  |  May 5, 2021
लग्नाच्या काही दिवसानंतर कॉमेडियनला जाणवले लग्नाचे साईड इफेक्टस, व्हिडिओ व्हायरल

कॉमेडियन संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा यांचे काहीच दिवसांपूर्वी शुभमंगल सावधान झाले आहे. अत्यंत साधेपणाने आणि कोरोना असल्यामुळे त्याने त्याचे लग्न आटोपले. पण लग्नाच्या काहीच दिवसानंतर त्याला या लग्नाचे साईड इफेक्टस जाणवू लागले आहेत. लग्नानंतर त्याने काही विनोदी व्हिडिओ शेअर केले आहेत. पण आता नवा शेअर केलेला हा व्हिडिओ त्याची लग्नानंतर झालेली अवस्था दाखवत आहे. कॉमेडियनचे कामच आहे हसवणे ते डॉ. संकेतने या व्हिडिओमधून करण्याचे काम केले आहे. संकेतचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होतोय. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर आता बघायलाच हवा.

कंगनाचं ट्विटर अकाऊंट झालं बॅन,सोशलवर मीम्सचा पाऊस

‘जाओ’ची केली सीरिज

एकुलता एक मुलगा ज्यावेळी घरी सून आणतो. त्यावेळी तिचे लाड होणे हे अत्यंत स्वाभाविक असते. आता संकेतच्या घरी सून म्हणून आलेल्या सुगंधाचेही घरात खूप लाड होताना दिसत आहे. आता या व्हिडिओमध्ये संकेतची आई दिसत आहे. जी लाडकी सून सुगंधाला तिचे जेवण झाल्यानंतर ताट द्यायला सांगत आहे. सुगंधा अगदी आदर्श सून असल्याप्रमाणे नाही नाही करते. तर संकेत आईला आपे ताट घेऊन जा असे सांगतो. त्यावर त्याची आई त्याला तूच जाऊन ठेव असा सल्ला देते. आता अर्थात आपलीच आई आपले लाड करत नाही म्हटल्यावर याला लग्नाचे साईड इफेक्टसच म्हणावे लागणार ना!  संकेतने दोन दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करत सगळ्यांना हसवण्याचे काम केले आहे. त्याच्या या व्हिडिओ खाली अनेकांनी कमेंट देऊन ही तर फक्त सुरुवात आहे असे देखील म्हटले आहे. पण या कोरोना काळात ओठांवर दोन सेकंज हसू आणेल असा हा व्हिडिओ नक्कीच आहे. 

लवकरच येणार ‘दृश्यम 2’ चा हिंदी रिमेक, अजयचा दिसणार नवा अंदाज

लग्नाचे व्हिडिओ केले शेअर

सुगंधा आणि संकेतच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. तिने मेंदीचे काही फोटो शेअर केल्यानंतर तिच्या घरी सनईचौघड्यांची तयारी सुरु झाली हे सगळ्यांच्याच लक्षात आले होते.  पण कोरोनाकाळामुळे कमीत कमी लोकांमध्ये त्यांचा हा विवाहसोहळा संपन्न झालेला दिसत आहे. लग्नाचे काही व्हिडिओ संकेतने त्याच्या अकाऊंटवरुन शेअर केलेले दिसत आहे. वरमाला घालतानाचा त्याचा  व्हिडिओ आणि लग्नातील काही खास क्षण त्याने त्याच्या फॅन्ससाठी पोस्ट केलेले आहे. इतकेच नाही तर त्याने अधूनमधून लग्नासंदर्भातील काही विनोदी व्हिडिओही पोस्ट केले आहेत. ज्यामुळे त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सध्या खूप जणांचे लक्ष आहे असेच म्हणायला हवे. 

बाबा की चौकी सुपरहिट

संकेत हा शिक्षणाने डॉक्टर असून तो उत्तम कॉमेडियन आणि मिमिक्री आर्टिस्ट आहे. त्याने वेगवेगळ्या अभिनेत्यांची उत्तम अशी मिमिक्री केलेली आहे. पण संजय दत्तची त्याने केलेली मिमिक्री ही एकदम सुपरडुपर हिट आहे. त्याने बाबा की चौकी नावाचा एक कार्यक्रम देखील सुरु केला होता. जो तो संजू स्टाईल होस्ट करतो आणि सेलिब्रिटींना बोलावतो.  त्याच्या या शोा चांगला प्रतिसाद मिळतो. खुद्द संजय दत्तने देखील त्याची खूप तारिफ केली होती. 

संकेतचा व्हिडिओ जर तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल तर हा त्याचे हे व्हिडिओ नक्कीच बघा. 

दीपिका पादुकोणच्या संपूर्ण कुटुंबाला करोनाची लागण

Read More From बॉलीवूड