निरोगी राहण्यासाठी संतुलित आहारासोबत नियमित व्यायामदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. योगासनांचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. यासाठी आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस तरी योगासनांचा सराव करणं गरजेचं आहे. जाणून घ्या निरोगी आरोग्यासाठी योगासनाचे प्रकार | Types of Yoga For Health In Marathi मात्र यासाठी जर तुम्ही नव्याने योगासने शिकत असाल तर, योगासनांचा सराव करताना कधीच या चुका करू नका. कारण या छोट्या छोट्या चुका केल्याने तुम्हाला योगसनांचा हवा तसा फायदा मिळणार नाही.
घट्ट कपडे घालणे
योगासने करताना शरीर आरामदायक आणि शिथिल अवस्थेत असायला हवं. यासाठीच योगाचा अभ्यास करताना नेहमी आरामदायक आणि मोकळे-ठाकळे कपडे घालावे. शिवाय योगासने करताना तुमची शारीरिक हालचाल होत असल्यामुळे तुम्हाला सतत घाम येतो. जर अशा वेळी तुम्ही जर तुम्ही अति घट्ट कपडे परिधान केले तर तुमच्या शरीरातून घाम निघणं कमी होतं. कंबरेकडे योग्य प्रमाणात घट्ट असलेले कपडे तु्म्ही वापरू शकता. मात्र टी-शर्ट अथवा पॅंट अति घट्ट नसेल याची काळजी घ्या.
अति घाई करणे
योगासनांचा सराव करताना प्रत्येकाला वाटत असतं की मला प्रत्येक आसन नीट यायलाच हवं. मात्र योगा ही एक साधना आहे. एका दिवसांत तुम्हाला प्रत्येक आसन आदर्श स्थितीत करता येईलच असं नाही. यासाठीच योगाचा नियमित अभ्यास करायला हवा. ज्यामुळे तुमचे शरीर लवचिक होईल आणि तुम्हाला योगासनामधील आदर्श स्थिती गाठता येईल. म्हणून नव्याने एखादे योगासन शिकताना घाई करू नका. त्या आसन स्थितीतील श्वास आणि शारीरिक स्थिती नीट समजून घ्या. त्यानंतरच हळू हळू आसन स्थितीत जाण्याचा प्रयत्न करा.
ऑनलाईन योगासने शिकताना
आजकाल सर्व काही ऑनलाईन झालं आहे. कोरोनाच्या काळात ऑनलाईन योगा क्लासेसमुळे अनेकांना घरी बसून व्यायाम करता आला. आजही तुम्ही ऑनलाईन योगाभ्यास करत असाल तर काही गोष्टींमध्ये मात्र नेहमी सावध राहा. समोर लॅपटॉप ठेवून योगा शिकताना आसन स्थितीत अचानक स्क्रीनकडे बघू नका. अशामुळे तुमचा तोल जाण्याची शक्यता जास्त आहे. आधी आसन बघून घ्या आणि मग त्या पद्धतीने ते करण्याचा सराव करा.
एकाच आसनाचा वारंवार सराव करणे
शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी बऱ्याचदा एकाच व्यायामाचा सराव करण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे तुमचं शरीर बळकट होतं आणि व्यायामाची योग्य पद्धत अंगवळणी पडते. मात्र योगाभ्यासामध्ये मात्र सतत एकच आसन वारंवार करू नका. तज्ञ्जांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास केल्यास ते तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवावर ताण येईल अशा पद्धतीने योगासनांचा सराव तुमच्याकडून करून घेतात. यासाठीच नव्याने सुरवात करत असाल तज्ञ्जांच्या देखरेखीखालीच योगासने शिका.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक