प्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम यांची तब्बेत गंभीर असून 5 ऑगस्टपासून चेन्नईमधील एजीएम रूग्णालयात भरती होते. 74 वर्षीय गायक बालासुब्रमण्यमय यांची तब्बेत ढासळली असून याबाबत रूग्णालयाने गुरूवारी संध्याकाळी हेल्थ बुलेटिन जारी केले होते. रूग्णालयाच्या सहाय्यक संचालक डॉ. अनुराधा बसणकरण यांनी सांगितले की, एस. पी. बालासुब्रमण्यम यांना ईसीएमओसह दुसऱ्या लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले . त्यामुळे त्यांची तब्बेत खूपच गंभीर असल्याचंही सांगण्यात येत होते. जवळजवळ दीड महिन्यापेक्षा जास्त गायक रूग्णालयात भरती असून सतत त्यांच्या तब्बेतीमध्ये चढउतार होत होते आणि अखेर बालासुब्रमण्यम यांनी अखेरचा श्वास घेतला.
दोन दिवसांपूर्वी रिकव्हरी होत असल्याचे मुलाने सांगितले होते
एसपी यांचा मुलगा चरण याने दोन दिवस आधी अर्थात 22 सप्टेंबरला आपल्या वडिलांची तब्बेत बरी असून त्यांच्या तब्बेतीत सुधारण होत असल्याचे चाहत्यांना सांगितले होते. ईसीएमओ, वेंटिलेटर, फिजिओ थेरपी चालू असल्याचंही त्याने यावेळी सांगितलं होतं. तसंच एसपी बालासुब्रमण्यम यांना ओरली लिक्विड देण्यात येत असून लवकरात लवकर त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होऊन घरी येतील असा विश्वासही त्याने व्यक्त केला होता. पण गेल्या 50 दिवसांपासून आजाराशी लढा देत असलेल्या बालासुब्रमण्यम यांची झुंज अखेर अयशस्वी ठरली.
Good News: अजून एका अभिनेत्रीने गरोदर असल्याचे केले जाहीर, फोटो व्हायरल
अधिक लाईफ सपोर्ट सिस्टिम देण्यात आली
रिपोर्टनुसार एसपी सुब्रमण्यम यांच्यावर डॉ. व्ही सबानायमगम हे उपचार करत आहेत. 5 ऑगस्टला कोरोना झाल्यामुळे त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले. 13 ऑगस्ट रोजी बालासुब्रमण्यम यांना आयसीयुमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना प्लाझ्मा थेरपी देण्यात आली. ब्लड क्लॉटिंग थांबविण्यासाठी त्यांना रेमडसिव्हिर, स्टेरॉईड्स देण्यात येत आहेत. ऑक्सिजनची पातळी राखण्यासाठी प्रोन पोझिशन अर्थात पोटावर झोपविण्यात आले आहे. तसंच त्यांना एक्स्ट्रा कॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजन सपोर्ट सिस्टिम देण्यात आली आहे. तरीही गेले 50 दिवस एसपी बालासुब्रमण्यम हे लढा देत होते.
कपिल शर्माने शेअर केला मजेशीर व्हिडिओ, असा घालावा मास्क
कोरोना झाल्याचे स्वतः सांगितले होते
एसपी बालासुब्रमण्यम यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये आपल्याला कोरोना व्हायरसचे अगदी माईल्ड लक्षणं असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी टेस्ट केल्यावर त्याचा परिणाम पॉझिटिव्ह आला होता. डॉक्टर्सनी त्यांना होम क्वारंटाईन व्हायला सांगितलं होतं. मात्र त्यांनी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी रूग्णालयात येण्याचा निर्णय घेतला होता. तसंच आपण दोन दिवसात घरी परत येऊन असंही सांगितलं होतं. रूग्णालयात मी आराम करण्यासाठी आलो असून कोणाचाही कॉल घेऊ शकत नाही आणि कोणीही चिंता करू नका असंही आवर्जून सांगितलं होतं.
NCBने समन्स बजावल्यानंतर दीपिका, सारा आणि रकुल प्रीत मुंबईत दाखल
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव
अभिनेता सलमान खानसाठी आपला आवाज देणारे एसपी बालासुब्रमण्यम हे प्रसिद्ध गायक असून त्यांचे पूर्ण नाव श्रीपती पंडितराध्युला बालासुब्रमण्यम असे आहे. तर बालू या उपनावाने प्रसिद्ध असणाऱ्या एसपीने 16 भारतीय भाषांमध्ये 40 हजारपेक्षा अधिक गाणी गाऊन रेकॉर्ड बनवला आहे. 2011 मध्ये पद्धभूषण या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही त्यांचे नाव आहे. सलमान खानच्या अनेक चित्रपटांमधून एसपी बालासुब्रमण्यम यांनी आवाज दिला असून सलमान खानसाठी त्यांचा आवाज परफेक्ट सूट होतो असं अनेकांचं म्हणणं होतं.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje