प्रत्येकीला वाटत असतं की आपण सर्वात सुंदर दिसावं. लग्न, सणासुदीचे दिवस, एखादा खास कार्यक्रम असेल तर छान दिसण्यासाठी स्पेशल मेकअप केला जातो. अशा वेळी मेकअप करताना त्वचेच्या समस्या लपवण्यासाठी स्कीन करेक्टर फायदेशीर ठरतात. मात्र स्कीन करेक्टरचा वापर करण्यापूर्वी प्रत्येकीला स्वतःचा स्कीन टोन माहीत असायला हवा. कारण स्कीन टोननुसार स्कीन करेक्टर वापरलं तरच तुमची त्वचा एकसमान दिसू शकते. यासाठी जाणून घ्या कोणत्या स्कीन टोनसाठी अथवा कोणत्या त्वचेच्या समस्येसाठी कोणतं स्कीन करेक्टर वापरावं. यासोबतच वाचा चेहऱ्यावर असतील वांग तर असा करा मेकअप | Face Makeup For Freckles In Marathi, Best Cruelty Free Makeup Brands In Marathi | बेस्ट विगन आणि क्रुअल्टी फ्री मेकअप ब्रॅंड, Simple Makeup Tips In Marathi – मेकअप न आवडणाऱ्या मुलींसाठी सोप्या मेकअप टिप्स
अशी करा स्कीन करेक्टरची निवड
स्कीन करेक्टरला कलर करेक्टर असंही म्हणतात. कन्सीलर आणि फाउंडेशन लावण्याआधी त्वचेला स्कीन करेक्टर लावलं जातं. ज्यामुळे तुमची त्वचा एकसमान दिसू लागते. बाजारात विविध प्रकारचे कलर करेक्टर मिळतात. यासाठीच जाणून घ्या तुमच्यासाठी कोणतं स्कीन करेक्टर परफेक्ट आहे.
पीच कलर करेक्टर
पीच कलरचं करेक्टर तुम्ही डार्क सर्कल्स अथवा चेहऱ्यावरील काळे डाग लपवण्यासाठी वापरू शकता. जर तुमची त्वचा लाइट स्कीन ते मीडियम स्कीन टोनची असेल तर तुमच्यासाठी पीच कलर करेक्टर परफेक्ट आहे. या करेक्टरने तुम्ही त्वचेवरील पिगमेंटेशनचे डागही मेकअपने लपवू शकता.
ऑरेंज कलर करेक्टर
डार्क स्कीन टोनच्या महिलांना जर डार्क सर्कल्स असतील तर चेहरा खूपच निस्तेज वाटू लागतो. अशा वेळी डार्क सर्कल्स आणि चेहऱ्यावरील काळे डाग तुम्ही ऑरेंज कलर करेक्टरने झाकू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील टॅनिंगचे डागही दिसेनासे होतात. मात्र यासाठी तुम्हाला ते खूप कमी प्रमाणात वापरावं लागेल. नाहीतर तुमच्या चेहऱ्याचा स्कीन टोनच बदलेला दिसेल.
ग्रीन कलर करेक्टर
जर तुम्ही खूप उजळ स्कीन टोनच्या असाल तर तुम्हाला चेहऱ्यावरील लालसरपणा अथवा पिंपल्सचे डाग लपवण्यासाठी ग्रीन कलर करेक्टर वापरावं लागेल.ग्रीन करेक्टरने चेहऱ्यावरील लालसरपणा कमी दिसून चेहऱ्याचा टोन एक समान दिसू लागतो.
यलो कलर करेक्टर
चेहऱ्यावर ग्लो दिसण्यासाठी साधारणपणे यलो कलर करेक्टरचा वापर केला जातो. पर्पल अंडरटोन असलेल्या स्कीन टोनसाठी हा चांगला पर्याय आहे. कारण यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स अथवा इतर डाग झाकले जातात. शिवाय चेहरा चमकदार आणि तजेलदार दिसू लागतो.
आम्ही शेअर केलेल्या या मेकअप टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय चांगला फायदा झाला हे आम्हाला कंमेटमध्ये कळवा.
Read More From मेकअप
भारतीय स्किन टोनवर शोभतात हे ब्लश
Dipali Naphade