मनोरंजन

Covid19 मधून बाहेर पडलेल्या या अभिनेत्याने सांगितला आपला अनुभव

Leenal Gawade  |  Apr 7, 2020
Covid19 मधून बाहेर पडलेल्या या अभिनेत्याने सांगितला आपला अनुभव

कनिका कपूर,शाजा मोरानी या सेलिब्रिटी कोरोन पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. पण आता यामध्ये आणखी एका सेलिब्रिटीचे नाव जोडले गेले आहे. तो म्हणजे रॉक ऑन चित्रपटातील अभिनेता पूरब कोहली. या अभिनेत्यालाही या भयकंर विषाणूची लागण झाली होती. इतकेच नाही तर त्याचे संपूर्ण कुटुंब या आजाराशी लढा देत होते. इतके दिवस ही माहिती आपल्या कोणापर्यंतच आली नाही. आता ही माहिती स्वत: पूरब कोहली याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली आहे. त्याहे ही पोस्ट शेअर करत सगळ्यांना घाबरु नका असे देखील सांगितले आहे. जाणून घेऊया पुरब कोहलीचा अनुभव

अखेर कनिका कपूरला मिळाला डिस्चार्ज, #isolation मध्ये राहण्याचा सल्ला

अशी दिसू लागली लक्षण

Inastagram

पूरब कोहलीने काल Covid 19 कोरोना व्हायरस संदर्भातील पोस्ट शेअर केली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. अनेकांनी याच्या ब्रेकिंग न्यूजही केल्या. अभिनेता पूरब सध्या त्याच्या कुटुंबासोबत लंडनला आहे.. अभिनेता पुरब कोहलीची पोस्ट नुसता त्याला कोरोना झाला अशी नाही तर तो त्या आजारातून बाहेर कसा पडला याची आहे. 

पूरब कोहलीने या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, मला काही दिवस तापाची लक्षण दिसत होती. या संदर्भातील माहिती मी यंत्रणेला कळवली. त्याला ताप, थंडी आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याची मुलगी इनाया हिला देखील हा त्रास होऊ लागला.तिला दोन दिवसांसाठी कफ आणि थंडी वाजत होती. त्यानंतर माझी पत्नी लुसी हिली ही लक्षण जाणवू लागली. तिला हा त्रास छातीत होत होता. त्यानंतर मला( पूरब) दोन दिवस ताप होता. आणि तो अचानक कमी झाला. यामध्ये आम्हाला तापासोबत कफसुद्धा झाला. आम्हाला 100-101 इतरा सर्वसाधारण फ्ल्यूप्रमाणे ताप होता. त्यामुळे आधी ही गोष्ट लक्षात आली नाही. पण आम्हाला कोरोनाची लागण झाल्याचे कळले.

अशी घेतली काळजी

कोरोना व्हायरसच्या लक्षणाबाबत फार काही ठाम सांगता येत नाही. प्रत्येकामध्ये ही लक्षण थोड्या फार प्रमाणात प्रत्येकाच्या बाबतीत वेगळी आहे. पूरब कोहलीलादेखील ही लक्षण सगळ्यात आधी सर्वसामान्य तापाची वाटली. पण त्यांनी योग्यवेळी काळजी घेतल्यामुळे त्यांना या व्हायरसची लागण झाल्याची कळले. वाहत नाक, श्वास घेण्यासाठी होणारा त्रास,ताप अशी लक्षण त्यांना चार ते पाच दिवसांसाठी दिसली.या दिवसामध्ये आम्हालाही #quarentine करण्यात आले होते. पण आम्ही आमची अगदी योग्य पद्धतीने काळजी घेतली. मिठाच्या गुळण्या, गरम पाणी पिणे, गरम पाण्याने आंघोळ करणे आणि आलं, हळदं  आणि मधाचे पाणी पिणे असे आम्ही करत होतो. आम्ही आमची योग्य काळजी घेतली आणि आता आम्ही यातून सगळे बाहेर पडलो आहोत. पण तरीही आम्ही अजूनही आमची काळजी घेत आहोत. अजूनही आम्हाला पूर्णपणे बरे व्हायचे आहे. पण आम्हाला विश्वास आहे की आम्ही लवकरच बरे होऊ. त्यामुळे या व्हायरसला घाबरु नका. उलट तुम्ही योग्य ती काळजी घ्या . 

Viral Video : शिल्पा शेट्टीने केलं सासूचं कौतुक

कनिका आणि शाजा मोरानीला कोरोना

देशात सगळ्यात पहिली सेलिब्रिटी केस बाहेर आली ती म्हणजे कनिका कपूरची. तिच्या चारही टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण होते. पण आता कनिका यातून बाहेर पडली आहे. तर शाजावर सध्या उपचार सुरु आहेत. 

एकूणच काय या आजाराशी लढा देण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. घराबाहेर पडू नका. घरातच राहून आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी घ्या.

यावर्षी ईदला प्रेक्षकांना भेटणार नाही सलमान खान, लॉकडाऊनमुळे घ्यावा लागला निर्णय

 घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.

 आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा.

Read More From मनोरंजन