मनोरंजन

अखेर कनिका कपूरला मिळाला डिस्चार्ज, #isolation मध्ये राहण्याचा सल्ला

Leenal Gawade  |  Apr 6, 2020
अखेर कनिका कपूरला मिळाला डिस्चार्ज, #isolation मध्ये राहण्याचा सल्ला

बेबीडॉल गर्ल कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्यानंतर बी टाऊनमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पण आता एक दिलासाजनक बातमीसमोर आली आहे ती म्हणजे कनिका कपूरची सहावी आणि अखेरची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. यामुळेतच तब्बल 15 दिवसांनी तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण तिला डिस्चार्ज जरी दिला असला तरी पुढील काही तिला पुन्हा एकांतात घालवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कनिकाला मिळालेल्या डिस्चार्जमुळे तिच्या कुटुंबालाही दिलासा मिळाला आहे. जाणून घेऊया कनिका कपूरचं हे कोरोना प्रकरण होतं तरी काय?

#CoronaVIrus: कनिका कपूरचा शहाणपणा सगळ्या देशवासियांसाठी ठरला तापदायक

आणि कनिकाला मिळाला डिस्चार्ज

Instagram

कनिकावर लखनऊ येथील संजय गांधी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिच्या पहिल्या चार टेस्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे अनेकांना भीती होती की, कनिका बरी होईल की नाही. मधल्या काळात कनिकाची परिस्थिती गंभीर असल्याचेही कळले होते. पण या सगळ्यावर कनिकाने मात केली आहे. कनिकाची पुन्हा एकदा चाचणी केल्यानंतर तिची दुसरी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे तिला डिस्चार्ज देण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. 

गायिका कनिका कपूरचा कोरोनाचा चौथा रिपोर्टही आला पॉझिटिव्ह

आता जाणून घेऊया कनिका कपूरचा कोरोना पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह प्रवास

Instagram

9 मार्च: कनिका लंडनहून लखनऊला परतली. सगळीकडे कोरोनाचा उद्रेक असताना कोणत्याही सूचनांचे पालन करता ती अनेक पार्ट्यांना हजर राहिली. अनेक बड्या लोकांशी तिचा संबंध आला. 

20 मार्च:  कोरोनाची लक्षण दिसून लागल्यानंतर 20 मार्च रोजी कनिकाला लखनऊच्या संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला बेजबाबदार वागण्यासाठी तिच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला. 

21 मार्च: कनिका गेलेल्या पार्टीतील अनेकांनी त्यांची कोरोना टेस्ट करुन घेतली. सुदैवाने कनिकामुळे कोणालाही त्याची लागण झाली नाही. या दरम्यान कनिकाने रुग्णालय प्रशासन चांगले जेवण देत नाही असा कांगावा करत तक्रार करायला सुरुवात केली. शिवाय तिने तिच्या जेवणासाठी आणि इतर सोयी सुविधांसाठी रुग्णालयाला त्रास द्यायला सुरुवात केली. तिच्या नखऱ्यांना कंटाळलेल्या रुग्णालय प्रशासनाने अखेर प्रेस कॉन्फरंस घेत या सगळ्या गोष्टीची माहिती दिली.

23 मार्च: कनिकाची दुसरी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. तिच्या मैत्रिणीचा शोध घेत तिची चाचणी करण्यात आली. पण तिची टेस्ट निगेटिव्ह आली. 

29 मार्च: कनिकाची तिसरी टेस्ट पॉझिटिव्ह आली. आतापर्यंत करण्यात आलेल्या तिच्या चारही टेस्ट  पॉझिटिव्ह आल्या होत्या 

30 मार्च:  कनिका फारच गंभीर असल्याच्या बातम्या ज्यावेळी बाहेर आल्या त्यावेळी अनेकांचा गोंधळ उडाला. पण तिने सोशल मीडियाचा आधार घेत या गोष्टी खोट्या असून मी बरी आहे असे सांगितले. 

3 एप्रिल: कनिकाबद्दल रुग्णालयाने केलेल्या तक्रारीवर पहिल्यांदा कपूर कुटुंबिय बोलले त्यांनी या सगळ्या गोष्टी खोट्या असल्याचे सांगितले. कनिकाने फक्त तिची खोली स्वच्छ करण्यास सांगितले होते. यामध्ये स्टारसारखी वागणूक असण्याचा काही संबंध नाही. 

4 एप्रिल:  कनिकाची पाचवी कोरोना टेस्ट निगेटिव्ह.

6 एप्रिल:  कोरोनाची सहावी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर अखेर डिस्चार्ज 

कनिकाला आता रुग्णालयातून दिलासा मिळाला असला तरी तिला बाहेर जाण्याची अनुमती नाही. तिला आणखी काही काळ #isolation मध्येच राहायचे आहे. तिने जर या नियमांचे उल्लंघन केले तर तिच्यावर कडक पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. 

 

चेन्नई एक्सप्रेसच्या निर्मात्याची मुलगी कोरोना पॉजिटिव्ह

Read More From मनोरंजन