यत्र नारायस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।
यत्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वस्तत्रफलः क्रियाः।।
खरंतर पूर्वी आपल्याकडे मातृसत्ताक समाज होता. ज्यामध्ये महिलांना पूजण्याची परंपरा होती. त्यातूनच वरील श्लोक रचला गेला. ज्याचा अर्थ आहे की, जिथे महिलांची पूजा म्हणजेच सन्मान जिथे होतो तिथे देवांचा वास असतो. जिथे स्त्रिया पूजनीय नसतात किंवा जिथे त्यांचा सन्मान केला जात नाही. तिथे केली जाणारी सर्व काम निष्फळ ठरतात.
तसंच आपल्याकडे सध्या सगळ्यांचच आवडतं गाणं म्हणजे ‘नवराई माझी लाडाची लाडाची गं’ जे प्रत्येक मुलीच्या लग्नात आवडीने म्हटलं जातं किंवा त्यावर डान्स केलाच जातो. असं म्हणतात की, मुली आपलं नशीब स्वतः लिहीतात कारण त्या त्याचं नशीब सोबतच घेऊन येतात. तेव्हाच तर घरी मुलगी झाली की, लोक म्हणतात, अभिनंदन तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे. खरंतर प्रत्येक आईवडिलांचा दिवस हा आपल्या मुलीच्या नावे असतो. पण तरीही मुलींसाठी खास एक दिवस साजरा करण्यात येतो. जो जागतिक कन्या दिनाच्या (daughters day 2021) नावाने ओळखला जातो. जसं आपल्याकडे मदर्स डे, शिक्षक दिन किंवा फादर्स डे साजरा केला जातो. त्याचप्रमाणे जागतिक मुलगी दिवसही साजरा केला जातो.
कधी असतो जागतिक कन्या दिन
मुलगा हा नशिबाने जन्मतो तर मुलगीही सौभाग्याने असं म्हणतात. आपल्याकडे म्हणतात की, आईला मुलगा प्रिय असतो तर वडिलांना मुलगी प्रिय असते. पण मुलगी ही एक अनमोल खजिना आहे. मुली या आपल्यासोबत संपूर्ण कुटुंबाच नशीब बदलण्याची हिम्मत ठेवतात. त्यांना जर मोकळं आकाश मिळालं तर त्या उंच झेप घेतात. आज मुली या मुलांपेक्षा कमी नाहीत. अशाच मुलींसाठी खास दरवर्षी 26 सप्टेंबरला म्हणजचे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी जागतिक कन्या दिवस साजरा केला जातो. या दिवशी आवर्जून कन्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात.
डॉटर्स डे चा इतिहास
भारतामध्ये मुलगी होणं हा कलंक किंवा अशुभ मानलं जायचं. हे अविचार दूर करण्यासाठी सर्वात आधी कन्या दिन साजरा करण्याची सुरूवात झाली. हे तर आपल्याला माहीत आहेच की, आजही जगभराप्रमाणे भारतातील मुलींसोबत अजूनही समान व्यवहार किंवा त्यांना समान वागणूक दिली जात नाही. तर त्यांना अनेक वेळा ओझं समजलं जातं. पण त्यांना ओझं समजू नका. त्याचा आधार बना. त्यांना सन्मान द्या. भारतातलं मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचं चित्र बदललं पाहिजे.
कारण दुसऱ्या देशांमध्ये या दिवसाला आशिर्वादाच्या रूपात साजरं केलं जातं. भारतात मुख्यतः मुलगी होणं हा कलंक मानणाऱ्या समाजाच्या प्रबोधनासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली. ज्यामुळे आता वातावरण आणि समाजातील मुलींबाबतचा विचार बदलताना दिसत आहे. ज्यामुळे आज त्यांना समान वागणूक, शिक्षण किंवा इतर बाबतीत हक्क मिळत आहेत.
कन्या दिनाचं महत्त्व
मुलगा असो वा मुलगी असो, त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी खास दिवसाची गरज नाही. त्यांचा वाढदिवसच पुरेसा असतो. पण भारतामध्ये अनेक अन्यायपूर्ण पितृसत्ताक समज आजही मुलीला मुलांपेक्षा कमी मानतात. त्यामुळे सरकारने समानतेचा विचार प्रोत्साहीत करण्याच्या हेतूने डॉटर्स डे ला राष्ट्रीय स्तरावर मान्यता दिली. हा दिवस रविवारी येत असल्यामुळे हमखास आईवडील आणि मुलींकडून तो साजरा केला जातो.
मग तुम्हीही तुमच्या लाडक्या परीसोबत येत्या रविवारी जागतिक कन्या दिन नक्की साजरा करा आणि आपल्या आयुष्यात आलेल्या या परीचं आवर्जून कौतुक करा.
हेही वाचा –
अशा द्या तुमच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Daughters Day Gift Ideas In Marathi