मेष- आर्थिक संकट येईल
आज दिवसभर पैशाची तणतण जाणवेल. वाद-विवादापासून दूर रहा. कोणतीतरी मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. जपून चाला. वाहनेही जपून चालवा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.
कुंभ- जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता
पैशाच्या कमतरतेमुळे जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता. कुटुंबापासून वेगळं होण्याचे विचार येतील. आई-वडिलांच्या सल्ला घेऊन कलह दूर करा. रागावर नियंत्रण ठेवा. धंद्यात होणाऱ्या नवीन ओळखी भविष्यात फायद्याच्या ठरतील.
मीन- निराशा आणि चिडचिड होईल
आजच्या दिवशी तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. निराशा आणि चिडचिड होईल. अशक्तपणा जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवा. शंका आणि तणावामुळे मनस्वास्थ बिघडेल. खाण्यापिण्याची काळजी घ्या. देवाची उपासना करा.
वृषभ- कामाची क्षमता वाढेल
तब्येत ठणठणीत असल्यामुळे सगळ्या कामात हिरहिरीने भाग घ्याल. तुमची कामाची क्षमता वाढेल. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. आनंदी वाटेल,लोकांच्या भेटीगाठी घडतील. जोडीदारासोबतचे क्षण छान जातील. मात्र कोणाशी तरी वाद होण्याची शक्यता आहे.
मिथुन- चांगल्या योजनेची सुरुवात होईल
आज कुठल्यातरी चांगल्या योजनेची सुरुवात होईल. प्रोफेशनल क्षेत्रात आणि कलात्मक कार्यात प्रगती कराल. ध्येयाकडे वाटचाल होईल. व्यापारात वृध्दी होईल. मित्रांसोबत फिरायला जाण्याचे प्लान कराल. कुटुंबात प्रॉपर्टीवरुन वाद होतील.
कर्क- होकार कळवा
तुमच्यावर जी व्यक्ती अव्यक्तपणे प्रेम करते, त्या व्यक्तीला होकार देण्याची हीच वेळ आहे. तुमचं लविंग आणि केयरिंग नेचरमुळे लोकांमध्ये उत्साह निर्माण होईल. मित्रांसोबत फिरण्याचे योग आहेत. जोडीदारासोबत मजेत वेळ घालवाल. आई-वडिलांचा सपोर्ट मिळेल. आपत्यांकडून आनंदाची बातमी कळेल.
सिंह- मोठी कामगिरी यशस्वीपणे पुर्ण कराल
आज तुमच्या सहकाऱ्यांच्या सहयोगाने एक मोठी कामगीरी यशस्वीपणे पुर्ण कराल. विद्यार्थ्यांची प्रोफेशनल आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. प्रोफेशनमध्ये आव्हानात्मत गोष्टी घडतील. कार्यक्षेत्रात चांगली परिस्थिती राहील. खेळीमेळीचं वातावरण तयार होईल.
कन्या- दिवस चांगला जाईल
तुमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या घराचा शोध पूर्ण होईल. ऐशो-आरामात दिवस जाईल. कुठेतरी अडकलेला पैसा मिळेल, त्यामुळे आर्थिक स्थिति सुधारेल. नोकरी-धंद्यात वृद्धि होईल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल.
तुळ- तब्येतीत सुधारणा होईल
आज तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. आजारी असाल तर तब्येतीत सुधारणा होईल. जोडीदारासोबतचं नात दृढ होईल तरीही कुरबुरीची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. व्यापारात नवीन ऋणानुबंध तयार होतील. नवे वाहन खरेदी कराल.
वृश्चिक-महत्त्वाच्या कामात यश मिळेल
कुठल्यातरी खास कामासाठी जवळच्या लोकांची साथ मिळेल. वैवाहिक नाते संबंधात ताण तणाव राहिल. आप्तेष्टांसोबत प्रवासाचा योग. आई कडून धन प्राप्ती होण्याचा योग. दिनक्रमात बदल करु नका. व्यापारात अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका.
धनु- भावडांमध्ये वाद संभवतात
आजचा दिवस आव्हानात्मक असेल. संपत्ती संदर्भात भावडांमध्ये विवाद संभवतात. जास्त कष्ट घेतले तरी त्याचा फायदा होणार नाही. खर्चावर ताबा ठेवा. अर्थिक चणचण निर्माण होऊ शकते. जोडदाराची काळजी घ्या.
मकर- अभ्यासात अडथळा निर्माण होईल
विद्यार्थांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होईल. महत्त्वाचं काम न झाल्याने त्रास वाढेल. धावपळीचा फायदा होणार नाही. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होतील. अपेक्षेपेक्षा कमी पगारवाढ होईल. व्यवसायात मनाजोगते काही होणार नाही.
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje