बॉलीवूड

दीपिका पादुकोणची कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरीपदासाठी निवड

Trupti Paradkar  |  Apr 27, 2022
Deepika Padukone to be part of Cannes Film Festival jury

जगभरातील सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा कान्स फिल्म फेस्टिव्हल हा एक व्यापक असा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील सर्वोत्कृष्ठ चित्रपटांचे प्रदर्शन केले जाते. चित्रपटसृष्टीचा विकास करण्यासाठी आणि ग्लोबल फिल्म इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी हा महोत्सव महत्त्वाचा समजला जातो. यंदा या फेस्टिव्हलचे 75 वे वर्ष आहे. विशेष म्हणजे ‘75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल’च्या आठ ज्युरींपैकी एक बॉलीवूडची दीपिका पादुकोण असणार आहे. आजवर कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरींच्या यादीत सहभागी होणारी दीपिका पहिली भारतीय अभिनेत्री आहे. ज्यामुळे ही भारतासाठी आणि बॉलीवूडसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.

कोण कोण आहे या ज्युरीपदी

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या आठ ज्युरींपैकी एक भारतीय सुपरस्टार दीपिका पादुकोण आहे. पण तिच्यासोबत आणखी सात जणं या ज्युरीपदी असणार आहेत. या ज्युरींच्या अध्यक्षपदी आहे फ्रान्सचा अभिनेता विसेंट लिंडन तर यासोबतच ईराणी फिल्म निर्माता असघर फरहादी, स्वीडिश अभिनेत्री नूमी रैपेस, अभिनेत्री, निर्माती आणि पटकथा लेखिका रेबेका हॉल, इटालियन अभिनेत्री जैस्मिन ट्रिंका, फ्रेंच दिग्दर्शक लादो ली, अमेरिकन दिग्दर्शक जेफ निकोल्स आणि नॉर्वेच दिग्दर्शक जोआचिम ट्रायर यांची नावे जाहीर झाली आहेत. 

दीपिकाच्या शिरपेचात मानाचा तुरा

दीपिका पादुकोण बॉलीवूडमध्ये तिच्या सौंदर्य, अभिनय आणि स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. बॉलीवूडला तिने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ज्यासाठी नेहमीच तिचं कौतुक झालं आहे. दीपिका बॉलीवूडमध्ये सध्या सर्वात जास्त कमाई करणारी एक श्रीमंत अभिनेत्री आहे. एवढंच नाही तर ती छपाक आणि 83 या चित्रपटांची निर्माती सुद्धा आहे. 2015 साली तिने लिव्ह, लव्ह, लाफ या फांऊडेशनतर्फे मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती केली होती. ज्याचप्रमाणे 2018 मध्ये तिला टाईम्स मासिकात जगभरातील शंभर प्रभावशाली लोकांमध्ये सहभागी करण्यात आलं होतं.  आता तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दीपिकाने स्वतः इन्स्टावर तिच्या कान्स फेस्टिव्हलच्या ज्युरीपदाची घोषणा शेअर केली आहे. दीपिका लवकरच पठाण या चित्रपटामधून सर्वांसमोर येणार आहे. पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तिच्याकडे फायटर आणि दी इंटर्न हे प्रोजेक्टदेखील आहेत. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड