मनोरंजन

छपाक’नंतर दीपिकाची लागली या रिमेक चित्रपटात वर्णी

Leenal Gawade  |  Jan 27, 2020
छपाक’नंतर दीपिकाची लागली या रिमेक चित्रपटात वर्णी

2020 ची सुरुवात दीपिकासाठी फार काही चांगली ठरली नाही. इतकी मेहनत करुनही तिचा ‘छपाक’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडलाच. अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ ला दीपिकाचा ‘छपाक’ हरवू शकला नाही. पण म्हणतात ना, ‘छोडो कल की बांते कल की बांत पुरानी’ अगदी तसाच विचार करत दीपिका आता पुढच्या कामाला लागली आहे. सध्या अशी माहिती येत आहे की, या पुढे दीपिका एका नव्या अवतारात लोकांपुढे येणार आहे. एका चित्रपटाच्या रिमेकसाठी दीपिकाची वर्णी लागली असून त्याच्या तयारीला दीपिकाने सुरुवात केली आहे. दरम्यान, हा चित्रपट कोणता? या चित्रपटामुळे दीपिकाला कसा फायदा होईल हे जाणून घेऊया.

सुहृद वार्डेकर-सायलीचा ‘दाह’ सिनेमा ‘व्हॅलेंटाईन डे’ला होणार प्रदर्शित

या चित्रपटात दिसणार दीपिका

Instagram

दीपिकाने आपल्या या चित्रपटाची घोषणा ट्विटरवर केली आहे. तिने या चित्रपटाचे पोस्टरसुद्धा शेअर केले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात दीपिकासोबत महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत ते म्हणजे ऋषी कपूर. कॅन्सरवर इलाज करुन परतल्यानंतर पहिल्यांदाच ते या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘The intern’ आता हे नाव ऐकल्यानंतर तुम्ही लगेचच गुगल केले असेल. अनेकांना हा चित्रपट हमखास पाहिला असेल. अॅनी हॅथवे आणि रॉबर्ट दे निरो यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 2015 साली रिलीज झाला होता. त्याला अनेक पुरस्कार मिळाले होते. ड्रामा आणि कॉमेडी असा हा चित्रपट असून यामध्ये रॉबर्ट यांनी एका निवृत्त माणसाची भूमिका निवडली आहे. पण निवृत्तीनंतरही ते सिनिअर इंटर्न म्हणून एका ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करतात. ते ज्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करतात ती एक फॅशनसंदर्भातील कंपनी असून तिथे अॅनी बॉस असते. अॅनीच्या हाताखाली काम करताना त्या एकमेकांना येणार अनुभव, एकमेकांच्या आयुष्यातील पोकळी असा काहीसा हा चित्रपट आहे. एकूणच मुलगी आणि बाबा यांच्याप्रमाणे नाते सांगणारा हा चित्रपट आहे. वॉरनर ब्रदर्स आणि के ए प्रोडक्शनचा हा चित्रपट आहे.

शेवंताला मिळणार का नाईकांच्या वाड्यात प्रवेश

दीपिकाला होईल का फायदा ?

बॉलीवूडमध्ये सध्या  पिरियॉडीक चित्रपटांची क्रेझ सुरु आहे.  छपाक सारखी चांगली गोष्ट असूनही दीपिकाचा हा चित्रपट चालला नाही. त्यात आता हा नवा प्रयोग दीपिका करु पाहतेय. हा चित्रपट तसा नवीनही नाही. आता या चित्रपटात आणखी काय इंडियन मालमसाला टाकला जाईल हे पाहावे लागेल. पण या चित्रपटात फार मोठे चढ-उतार नाही. अगदी छान शांत असा हा चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट भारतीयांच्या किती पचनी पडेल ते सुद्धा पाहावे लागेल. या शिवाय दीपिका ‘क्रिश 4’या चित्रपटातही दिसणार आहे.

ऋषी कपूर करत आहेत कमबॅक

Instagram

आता या चित्रपटाचे पोस्टर ऋषी कपूर यांनी देखील शेअर केले आहे. आकाशी रंगाचे हे पोस्टर असून त्यामध्ये ऋषी कपूर आणि दीपिका यांची नावे आहेत. हे पोस्टर शेअर करताना ऋषी कपूर यांनी एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे असे म्हटले आहे. त्यामुळे आता ऋषी कपूरच्या चाहत्यांना त्यांना आणखी एका नव्या अवतारात पाहायला मिळणार आहे. 

हा चित्रपट 2021मध्ये रिलीज होणार आहे. आता आणखी नव्या वर्षात दीपिकाला या चित्रपटामुळे फायदा होणार की नुकसान ते कळेलच. पण दीपिकाने नको त्या प्रसिद्धीपासून दूर राहावे हा सल्ला!

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा  POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

Read More From मनोरंजन