बॉलीवूडची सर्वात लोकप्रिय जोडी आता जाहिरात विश्वातही सर्वाधिक लोकप्रिय जोडी बनली आहे. लग्नाआधीपासूनच या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दिली होती आणि आता लग्न झाल्यावर तर त्याच्या प्रत्येक अपिअरन्स लोक पसंत करत आहेत. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सनुसार सेलिब्रिटी कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे टेलिव्हिजन कमर्शिअल्स म्हणजेच TVC जगतातले लोकप्रिय कपल बनले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, हे स्पष्ट झाले आहे की, जाहिरात विश्वातल्या लोकप्रिय जोड्यांमध्ये रणवीर-दीपिका नंबर १ तर वरूण-आलिया नंबर २ स्थानी आहेत.
हम साथ साथ है
लग्नानंतर चित्रपटात नाही पण जाहिरातीत मात्र #deepveerची जोडी एकत्र झळकली आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. रणवीर आणि दीपिका सध्या एका एसी कंपनीच्या जाहिरातीत एकत्र दिसत आहेत. लोकप्रियतेच्या चार्टवर १०० गुणांसह सध्या ते पहिल्या स्थानी आहेत. तर वरुण आणि आलियाची जोडी एका प्रसिद्ध फ्रूटी अॅड कॅम्पेनमध्ये दिसून येत आहे. ही जोडी ८६.०२ गुणांसह दुस-या स्थानी आहे.
आलियासोबतही गलीबॉय टॉपवर
गली बॉय फिल्ममध्ये झळकलेली जोडी रणवीर-आलियानेही बॉक्सऑफिसच्या आधी जाहिरात विश्वावर आपली जादू केली होती. एका ट्रॅव्हल कंपनीच्या जाहिरातीत दिसणा-या रणवीर-आलियाची केमिस्ट्री गेले कित्येक महिने जाहिरात विश्वात चर्चेचा विषय आहे. सध्या ४८.७८ गुणांसह या जोडीने तिसरं स्थान पटकावलं आहे.
तर, रणबीर-दीपिका या ओल्ड फ्लेम जोडीने नुकतीच एका रंगाच्या कंपनीची जाहिरात केली. ही जोडी १६.६६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
लेक कोमोला का जात आहेत रणबीर-आलिया
बॉलीवूडचं फेव्हरेट कपल #deepveer
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक, अश्वनी कौल यांनी याबाबत सांगितले की,“रणवीर-दीपिका जोडीने लागोपाठ तीन सुपरहिट चित्रपट दिले होते. त्यानंतर त्यांनी लग्न केले. बॉलीवूडमधले हे कपल सध्याचे सर्वाधिक चर्चित कपल आहे. त्यांचं खूप मोठं फॅन फॉलोइंगही आहे. तसंच वरुण आणि आलियाने चार सिनेमे एकत्र केलेत. तसेच काही अॅड कॅम्पेनमध्येही ते एकत्र दिसलेत. गेल्या ६ वर्षांपासून ही बॉलीवूडची फेवरेट जोडी आहे. वरूण-आलियाचा तरूण पिढीमध्ये चाहतावर्गही खूप आहे. ”
प्रेग्नन्सीबाबत दीपिका पदुकोणने केला ‘हा’ खुलासा
कसं ठरतं रँकींग
14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून हा डेटा गोळा केला जातो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश असतो. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममूळे या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत ठरवता येते.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje