DIY लाईफ हॅक्स

आनंदी राहण्यासाठी डोक्यातील ‘डिलीट’ बटणाचा करा वापर

Dipali Naphade  |  Sep 5, 2019
आनंदी राहण्यासाठी डोक्यातील ‘डिलीट’ बटणाचा करा वापर

कॉम्प्यूटरवर काम करताना बऱ्याचदा आपल्या मनात येतं की, आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंट्रोल (control), अन्डू (undo), डिलीट (delete) अशी बटन्स (buttons) अथवा कोणतीही कमांड का नाही? पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्याला हवं असेल तर आपण आपल्या आयुष्यावर या कमांड्सचा उपयोग करून घेऊ शकतो. न्यूरोसायन्सच्या मताने डोक्यातील जुन्या गोष्टी डिलीट करून आपण त्यामध्ये नव्या गोष्टींना नक्कीच जागा देऊ शकतो. हीच गोष्ट तुमच्या हृदयाच्या बाबतीतही लागू होते. तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर तुमच्या डोक्यात आणि मनात असलेल्या नको त्या त्रासदायक आठवणी बाहेर काढून टाकणंच गरजेचं आहे.

नकारात्मकतेला करा गुडबाय

Shutterstock

बऱ्याचदा आपल्या मनात अशा काही गोष्टी फीड होतात, ज्या वर्षानुवर्ष आपल्याला त्रास देत राहातात. काही लोकांच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की, त्याबद्दल ते कोणाशीच बोलू शकत नाहीत आणि त्याचा त्यांना त्रास होत राहातो अथवा कधीतरी कोणीतरी कोणाबद्दल तरी तुम्हाला सांगतं आणि तोच रोष तुमच्या मनात खदखदत राहातो. तुम्ही विसरू शकत नाही. त्यामुळे तुमच्या मनात नकारात्मकता येत राहाते. अशा नकारात्मक विचारांपासून दूर राहा. कारण अशा गोष्टी आपल्या मन आणि डोक्यावर वाईट परिणाम करत असतात. त्यामुळे शरीरावरही परिणाम होतो. खरं तर काही गोष्टी आपण मनातच ठेवतो आणि त्यामुळे अधिक त्रास होतो. तुम्हाला पण असंच वाटत असेल तर सर्वात पहिले तुमच्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना गुडबाय करा. कोणाशी बोलू शकत नसाल तर कोणत्या तरी डायरीमध्ये तुम्ही लिखाण सुरू करा. जेणेकरून तुमच्या मनातील विचारांना वाट मिळेल.

तुमची सकाळ बनवा अधिक सुंदर ‘शुभ सकाळ’ संदेशांनी

न बोलता येणं योग्य नाही

Shutterstock

कोणालाही आनंदी राहण्याचा सल्ला देणं आणि आपण आनंदी राहणं यामध्ये बराच फरक आहे. बऱ्याचदा आपण आपल्या अगदी जवळच्या आणि प्रिय व्यक्तींजवळही आपलं मन मोकळं करू शकत नाही. कारण आपण जरी त्यांना प्रिय मानत असलो तरीही त्या व्यक्ती आपल्याला प्रिय मानत नाहीत याचा अंदाज आपल्याला आलेला असतो. त्यामुळे त्यांच्याकडे आपलं मन मोकळं करायची आपली हिंमतच होत नाही. पण असं न बोलता येणं योग्य नाही. जे आपल्या मनात आहे ते आपल्या ओठांवर आणणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या मनात काही राहात नाही आणि सगळा मनातील सल निघून जातो. एकदाच बोलून टाकलं की मन देखील साफ राहतं आणि त्यामुळे त्रास न होता तुम्ही आनंदी राहू शकता.

कदाचित तुम्ही बोललात आणि त्यांना राग आला असं तुम्हाला वाटेल. तसं झालं तरी योग्य पण निदान तुम्हाला मन तरी खात राहणार नाही. कारण मनात गोष्टी साठल्या तर त्याचा तुमच्या नात्यांवर अधिक वाईट परिणाम होतो. त्यामुळे मनात कोणतीही गोष्ट ठेवण्यापेक्षा ती डिलीट करण्यासाठी तुम्ही वेळच्या वेळी समोरच्याला ती गोष्ट सांगून टाकायला हवी. डोक्यात अशा गोष्टी कधीही सेव्ह करून ठेऊ नका. खरं तर अशा गोष्टी तर तुम्ही रिसायकल बिनमधूनदेखील काढून टाकणं अत्यंत गरजेचं आहे.

यशस्वी जीवनासाठी प्रयत्नपूर्वक करा सकारात्मक विचार

स्वत:शी करा मैत्री

Shutterstock

आयुष्यात आपण प्रत्येक गोष्टीचा तणाव घेत असतो. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर होतो. आजकाल अगदी लहान वयातही बऱ्याच जणांना स्मरणशक्तीचा प्रॉब्लेम होतो. लहानपणापासूनच स्पर्धात्मक जगात उभं राहण्यासाठी अनेक तणाव असतात. असं असताना तुम्ही स्वत:शी मैत्री करून घेणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही स्वत:ला आनंदी ठेऊ शकला नाहीत तर दुसऱ्यांनाही तुम्हाला आनंदी ठेवता येणार नाही. जगण्याचं हेच एक गमक आहे.

लहान वयात अभ्यासाचा तणाव, मग प्रोफेशनल लाईफमध्ये स्वत:ला सेटल करण्याचा तणाव या सगळ्यात मैत्री आणि नात्यांवर तणाव येत राहातो. या सगळ्यात आपण स्वत:ला विसरतो. जे करणं योग्य नाही. आनंदी राहण्यासाठी आयुष्यात तणावाला डिलीट करण्याची गरज आहे. त्यामुळे दिवसातून काही वेळ स्वत:साठी काढा. स्वत:ला हसू द्या, आपल्या आवडीच्या लोकांना भेटा, त्यांच्याबरोबर फिरा. या सगळ्या गोष्टी करून तुम्ही आनंदी राहण्यासाठी आपल्या डोक्यातील गोष्टी काढण्यासाठी डिलीट बटणाचा वापर स्वत:च्या योग्य वागण्याने नक्कीच करू शकता.

घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी करा हे ‘5’ सोपे उपाय

Read More From DIY लाईफ हॅक्स